लेनोवो या संगणक उत्पादनाच्या क्षेत्रातील कंपनीने आता भारतातील स्मार्टफोनच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश केला आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या या लिनोवो स्मार्टफोन्समध्ये लिनोवो ए६०+ ते प्रिमियम क्वाड -कोअर लिनोवो के ८६० यांचा समावेश आहे.
‘‘स्मार्ट, वायरलेस तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या भारतात वाढत असून स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा आहे. लेनोवो स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांना योग्य मोबदल्यात सेवा देऊ करत असून आम्हाला विश्वास आहे की, आमचे ग्राहक आमच्या उत्पादनाचा निश्चितच विचार करतील,’’ असे लेनोवो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमर बाबू यांनी याप्रसंगी सांगितले. लेनोवोने चीनमध्ये केवळ पहिल्या १८ महिन्यांच्या कालावधीत स्मार्टफोन क्षेत्रात दुसरा क्रमांक पटकावल्याचा कंपनीचा दावा आहे.
गीक, स्टायलिश, प्रोफेशनल आणि अॅफॉर्डेबल अशा चार प्रकारांमध्ये लिनोवोने हे स्मार्टफोन्स बाजारपेठेत आणले आहेत. दीर्घ काळ चालणारी बॅटरी तसेच ड्युअल सिम क्षमता हे लिनोवोच्या स्मार्टफोन्सचे वैशिष्टय़ असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. लिनोवोचे चार स्मार्टफोन्स हे अॅन्ड्रॉईड व्हर्जन चारवर आधारीत असून ए ६०+ स्मार्टफोन हे अॅन्ड्रॉईड व्हर्जन २.३वर आधारीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा