कोन्का एक्स्पोज ९६०
सध्या एकापेक्षा एक अप्रतिम व आकर्षक स्मार्टफोन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत दररोज दाखल होत आहेत. ज्या कंपन्या ही मॉडेल्स बाजारपेठेत आणतात, त्या कंपन्यांचे नाव अनेकदा भारतात माहीतही नसते. पण तरीही या सर्व कंपन्यांना त्यांचे उत्पादन भारतात जबरदस्त खपणार, याची खात्री वाटत असते. असे काय आहे या भारतीय बाजारपेठेत की, त्यामुळे या सर्व कंपन्यांना ही खात्री वाटते आणि त्या आत्मविश्वासाने या क्षेत्रात उतरत आहेत?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, भारतीय बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठी मोबाइल बाजारपेठ आहे हे या कंपन्यांनी इथे येण्याचे एकमात्र कारण नाही. तर या बाजारपेठेत नानाविध प्रकारचा आणि आर्थिक क्षमता असलेला असा ग्राहक वर्ग आहे. यात मध्यमवर्ग हा खूप मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यातही एक निम्नमध्यमवर्ग असा आहे की, ज्याला मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गाकडून वापरल्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये अधिक रस आहे. पण हा उच्च मध्यमवर्ग जो ब्रॅण्डेड स्मार्टफोन वापरतो, तो त्यांना परवडणारा नाही. त्यामुळे त्यांना कमी किमतीत चांगला स्मार्टफोन हवा आहे. ही बाजारपेठ ब्रॅण्डेड स्मार्टफोनच्या बाजारपेठेपेक्षाही खूप मोठी आहे. त्यामुळेच भारतीयांना फारसे नाव माहीत नसलेल्या अनेक विदेशी कंपन्यांनी आता भारतामध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. कोन्का हीदेखील याच पठडीतील एक महत्त्वाची
कंपनी आहे.
त्यांनी अलीकडेच कोन्का एक्स्पोज ९६० आणि ९७० अशी दोन स्मार्टफोन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत दाखल केली. पूर्वी स्मार्टफोन म्हटले की, केवळ आयफोन किंवा ब्लॅकबेरी असे समीकरण होते. यातील ब्लॅकबेरीला आता जगभरात उतरती कळा लागली आहे आणि अँड्रॉइडने स्मार्टफोनची जगभरातील बाजारपेठ काबीज केली आहे. याच अँड्रॉइडच्या माध्यमातून कोन्कानेही भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.
कोन्का एक्स्पोज ९६० हा अँड्रॉइडवर आधारलेला कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनची खरेदी करताना त्याचा वापरकर्त्यांचा अनुभव आणि कॅमेरा या दोन बाबी प्रामुख्याने ग्राहकांकडून पाहिल्या जातात. फोन हातात घेताना क्षणभर आपल्याला शंका येते की, आपण नोकियाचा फोन तर हातात घेत नाही ना. कारण पटकन पाहिल्यानंतर तो नोकिया लुमियाच्या नवीन मॉडेल्ससारखा भासमान होतो. हे असे भासमान होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे फोनच्या वरच्या बाजूस कोन्का हे नाव आणि त्याचे डिझाइन हे दोन्ही नोकियाच्या डिझाइनप्रमाणेच करण्यात आले आहे. त्यामुळे कुणीतरी पटकन घाईघाईत फोन घेताना नोकिया समजून कोन्का घेतला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, एवढे हे दृश्यसाम्य जबरदस्त आहे.
४.३ इंचांचा स्क्रीन
ग्राहकांना सध्या मोठय़ा आकाराच्या स्क्रीनने घातलेली भुरळ लक्षात घेऊन कोन्काने त्यांच्या या स्मार्टफोनचा स्क्रीन १०.९२ सें.मी. म्हणजेच ४.३ इंचांचा ठेवला आहे. याचसारखे बाजारात असलेले दुसरे मॉडेल एक्स्पोज ९७०चा स्क्रीन हा .२ इंचांनी अधिक म्हणजेच ४.५ इंच आहे.
ओजीएस व आयपीएस
कोन्काचा हा स्मार्टफोन आकर्षक वाटण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे याचा स्क्रीन काळपट रंगाची झाक असलेला हा स्क्रीन वन ग्लास सोल्युशन अर्थात ओजीएस वर्गात मोडणारा आहे. त्यामुळेच आयपीएस डिस्प्लेसारखा दृश्यानुभव त्यावर घेता येतो. चित्रांची सुस्पष्टता हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. शिवाय कोणत्याही कोनातून पाहिल्यानंतर चित्र सुस्पष्टच दिसते. रंगांचा दृश्यानुभवही तेवढाच चांगला आहे. ही मजा एचडी चित्रण पाहताना अधिक भुरळ घालू शकते.
स्क्रीन रिझोल्यूशन
याचा स्क्रीन डब्लूव्हीजीए असून त्याचे रिझोल्यूशन ८०० गुणिले ४८० पिक्सेल्स एवढे आहे. याच एक्स्पोज ९६० बरोबर बाजारात आणलेल्या एक्स्पोज ९७०ला मात्र कंपनीने एचडी रिझोल्यूशन दिले आहे. ते ९६० गुणिले ५४० पिक्सेल्स एवढे आहे.
८ मेगापिक्सेल कॅमेरा
कंपनीने या मॉडेलचे वर्णन कॅमेराधारित स्मार्टफोन असे केले आहे. एक्स्पोज ९६०मध्ये मागच्या बाजूस ८ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरच्या बाजूस व्हिडीओ कॉलिंगसाठी २ मेगापिक्सेल कॅमेरा ठेवण्यात आला आहे. रिव्ह्य़ूदरम्यान वापरून पाहिला असता, याच्या ८ मेगापिक्सेल कॅमेऱ्याचे दिवसाढवळ्या स्वच्छ प्रकाशात काढलेले फोटो चांगले होते. मात्र कमी प्रकाश योजनेमध्ये काढलेल्या फोटोंमध्ये मात्र चित्राच्या सुस्पष्टतेमध्ये फरक पडलेला दिसला.
व्हिडीओ
याच्या व्हिडीओ चित्रणाचा रिव्ह्य़ूदरम्यान आलेला अनुभव हा स्थिर चित्रणाच्या अनुभवापेक्षा वेगळा आणि चांगला होता. कमी प्रकाशातही हा व्हिडीओ चांगले काम करतो. त्यावर केलेले चित्रण चांगलेच होते.
बूम बॉक्स
चांगल्या दर्जाचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी कंपनीने यामध्ये बूम बॉक्स तंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे आवाजाची सुस्पष्टता वाढली आहे. प्रत्येक बारीकसारीक आवाज चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड तरच होतो, शिवाय त्याच दर्जाने तो ऐकताही येतो.
डय़ुएल कोअर, डय़ुएल सिम
अलीकडे बाजारात असलेला ‘डय़ुएल कोअर, डय़ुएल सिम’ हा ट्रेंड कायम राखत कोन्कानेही या फोनमध्ये तीच सोय उपलब्ध करून दिली आहे. यातील डय़ुएल कोअर प्रोसेसरच्या वापरामुळे स्मार्टफोन वेगात काम करतो. कितीही अ‍ॅप्स एकाच वेळेस वापरण्याचा प्रयत्न केला तरीही त्याच्या वेगावर फारसा परिणाम होताना दिसत नाही.
अँड्रॉइड ४.० (आइस्क्रीम सँडविच)
या स्मार्टफोनसाठी अँड्रॉइडची अद्ययावत असलेली ४.० आइस्क्रीम सँडविच ही आवृत्ती वापरण्यात आली आहे. डय़ुएल कोअरवर ही आवृत्ती उत्तम पद्धतीने काम करते, असा अनुभव आहे.
के-स्टोअर क्लाऊड
याशिवाय कोन्काने के-स्टोअर ही एक वेगळी सेवाही दिली आहे. स्मार्टफोन वापरणारी मंडळी आता मोठय़ा प्रमाणावर क्लाऊड सेवांचा वापर करू लागली आहेत. म्हणून कोन्काने क्लाऊड सेवाही देऊ केली आहे. बाजारात असलेले सर्व मोठय़ा ब्रॅण्डचे स्मार्टफोन तुम्हाला ही सेवा देतात.
ट्रायफेक्टा सेन्सर
या स्मार्टफोनमध्ये ट्रायफेक्टा सेन्सर वापरण्यात आला आहे. त्यामुळे फोन सायलेन्ट करायचा असेल तर त्यासाठी वेगळी बटने दाबत बसण्याचे काहीच कारण नाही. त्याचा स्क्रीन तुम्ही जमिनीच्या दिशेला खाली केलात की, हा सेन्सर ती स्थिती ओळखतो आणि आपला फोन सायलेन्ट मोडमध्ये जातो.
आयफोनचा अनुभव
कोन्काच्या या एक्स्पोज ९६०चे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सुरू असलेला फोन प्रथमदर्शनी पाहता त्याचा दृश्यअनुभव हा आयफोनच्या जवळपास जाणारा वाटतो. आयफोनप्रमाणेच त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आयकॉन्सची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे वेगळा यूजर एक्स्पिरिअन्स आपल्याला या फोनवर निश्चितच मिळतो.
निष्कर्ष
प्रामुख्याने स्मार्टफोन विकत घेताना ज्या दोन-तीन महत्त्वाच्या बाबी पाहिल्या जातात, त्यात प्रोसेसर, ऑपरेटिंग सिस्टीम आणि कॅमेरा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यातील चांगला प्रोसेसर व उत्तम वेग याबाबतीत आणि ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाबतीत हा फोन समाधान देणारा आहे. पण कॅमेऱ्याच्या सुस्पष्टतेमध्ये मात्र तो काहीसा कमी पडतो. मात्र यातील व्हिडीओ गुणवत्ता चांगली आहे. नोकिया आणि आयफोनप्रमाणे मिळणारा दृश्यानुभवदेखील सुखावणारा आहे.

कोन्का एक्स्पोज ९६०ची महत्त्वपूर्ण वैशिष्टय़े    
सम स्लॉट    डय़ुएल सिम
प्रोसेसर     १.० गिगाहर्ट्झ डय़ुएल कोअर प्रोसेसर
ऑपरेटिंग सिस्टीम     अँड्रॉइड ४.० (आइस्क्रीम सँडविच)
रॅम     ५१२ एमबी
अंतर्गत साठवणूक क्षमता     ४ जीबी
यूजर इंटरफेस     थ्रीडी क्षमता
स्क्रीन     डब्लूव्हीजीए आणि क्यूएचडी रिझोल्यूशन
कनेक्टिविटी     वाय-फाय व ब्लूटूथ
जीपीएस     सोय आहे.
मीडिआ प्लेअर     एमपीथ्री/ एमपीफोर/ आपएमव्हीबी
जी सेन्सर     सोय आहे