मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक इमारतीमधील रहिवाशांना भेडसावणारे प्रश्न म्हणजे सुरक्षारक्षक झोपी जाणे, इमारतीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक आगंतुकाची नोंद नसणे, कोणत्याही छोटय़ा नियमाच्या मंजुरीसाठी रहिवाशांच्या मागे लागणे हे प्रश्न सोडविले आहेत, सोसायटीमॅक डॉट नेट वेबसाईटने. या वेबपोर्टलमुळे इमारतीचा सुरक्षारक्षक झोपी जातो का, तो वेळेवर येतो का त्याची दिवसाच्या ठरावीक टप्प्यात हजेरी घेऊन मेलद्वारे ती माहिती सोसायटीला पुरविणे. एखादा आगंतुक वा अनोळखी व्यक्तीने इमारतीत प्रवेश केला असता त्याचे छायाचित्र काढून ज्या व्यक्तीस भेटावयास आला आहे, त्यास एसएमएसद्वारे कळविणे आदी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची कामे हे वेबपोर्टल पार पाडणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही सोसायटीमध्ये नियमांचे रहिवाशांकडून मान्यता घेणे जिकिरीचे असते. अशा वेळेस सोसायटीने तयार केलेले नियम रहिवाशांना कळविणे व त्यांच्याकडून मान्यता मिळविण्याचे कार्यदेखील हे वेबपोर्टल करणार आहे. सोसायटीचे ऑनलाईन अकाऊंट्स, एसएमएस आणि ईमेल अॅलर्ट, ऑनलाइन डॉक्युमेंट्स, सोसायटीमधील बठकींचे व्यवस्थापन, नियोजन आणि अहवाल, सूचना फलक आदी सुविधा हे वेबपोर्टल पुरविणार आहे. http://societymac.net/ वेबपोर्टलची िलक आहे.
ऑडियो आणि ई-बुक आता
ऑफलाइन अॅप स्वरूपात
पुस्तकवेडय़ांसाठी पर्वणी ठरावी अशा त्यांच्या मोबाइल फोनवरील ऑफलाइन अॅप स्वरूपात शॉट फॉरमॅटद्वारे ऑडियो आणि ई-बुकचे अनावरण करण्यात आले. चोकेर बाली, काबुलीवाला अथवा कर्मभूमी यासारख्या लोकप्रिय कथा-कादंबऱ्यांना कोणत्याही इंटरनेट जोडणी अथवा कनेक्टिव्हिटीच्या कटकटीशिवाय फोनवरील अॅप्लिकेशनच्या रूपात नगण्य मोबदल्यात लोकांना वाचता यावे, अशी सोय शॉटफॉरमॅटने याद्वारे केली आहे. रवींद्रनाथ टागोर, चाणक्य, स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तत्त्ववेत्त्यांचे साहित्यही िहदी तसेच गुजराथी भाषेत ऑडियो आणि व्हिडीयो बुकच्या रूपात प्रस्तुत करण्यात आले आहे. शॉटफॉरमॅट्स डिजिटल वर्क्सच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नियती शाह यांनी सांगितले की, ‘‘कथाकथन हा भारतातील जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. भारतात साक्षरतेचा दर हा उच्च नसल्याने, अशा बाजारपेठेसाठी शॉटफॉरमॅटद्वारे ऑडियो बुक हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. डिजिटल बुकची ही संकल्पना अत्यंत सोपी असून, कुठेही केव्हाही उपलब्धता अशी सोयीची आहे. या ऑडियो आणि ई-बुकचे नव्या सुविधेचे वैशिष्टय़ म्हणजे वाचकांना यामध्ये बुकमार्कही करता येतील. वाचनाची वेळेची पूर्वनिश्चिती म्हणून अलार्म सेट करता येईल आणि प्रत्येक विभागासाठी टिपणे तयार करण्याची सोय करण्यात आली आहे. जर ऑडियो बुकमधील काही महत्त्वाचे मागे राहिले वाटल्यास, वाचकांना एका क्लिकसरशी ३० सेकंद मागे जाऊन ते पुन्हा ऐकता येईल. ही ऑडियो आणि ई-बुक अत्यंत किफायती असल्याने एक उत्तम खरेदीही ठरू शकेल. दोन कथांसाठी ३० रुपये आणि नऊ कथांसाठी १०० रुपये अशा किमतीला ई-बुक्स, त्याउलट ऑडियो बुक हे एका कथेसाठी ३० रुपये तर पाच कथांसाठी १०० रुपये किमतीला उपलब्ध झाले आहे.
वायरलेस माउस
संगणक आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या टॉप नॉच इन्फोट्रॉनिक्स या कंपनीने ‘झेब्रोनिक्स’ या ब्रॅण्डच्या अंतर्गत वायरलेस माउस बाजारात आणले आहेत.
‘टोटेम २’ नावाचा हा माउस लॅपटॉप किंवा कम्प्युटर या दोन्हींना यूएसबी पोर्टच्या साह्य़ाने कनेक्ट करता येतो. या माउसमध्ये एक नॅनो रिसिव्हर बसवण्यात आला असून या रिसिव्हरमुळे कोणत्याही वायरची मदत न घेता जवळपास २५ ते ३० फूट अंतरावरूनही या माउसच्या मदतीने संगणक हाताळता येऊ शकतो. ४९९ रुपये किमतीत उपलब्ध असलेला हा माउस दोन बॅटऱ्यांच्या साह्य़ाने चालतो.