पूर्वी अनेक एक्झिक्युटिव्हजच्या हातात मोठी एक्झिक्युटिव्ह डायरी असायची. नंतर त्याची जागा लहान-मोठय़ा आकाराच्या ऑर्गनायझरने घेतली. तर आता जमाना बदलला असून इलेक्ट्रॉनिक युगात ती जागा टॅब्लेटने घेतली आहे. त्यामुळे जवळपास सर्वाच्याच हातात टॅब्लेट्स पाहायला मिळतात. अगदी सुरुवातीस टॅब्लेट्स बाजारात आले तेव्हा मोठय़ा आकाराच्या टॅब्लेटची फॅशन होती. पण मुंबई-पुण्यासारख्या शहरांत फिरताना मोठय़ा आकाराचे टॅब्लेट अडचणीचे ठरतात, असे अनेकांना लक्षात आले. त्याऐवजी लहान आकाराचे टॅब्लेट हे चांगले उपयुक्त ठरतात. ने-आण करण्यासाठी तो आकार अतिशय उपयुक्त आहे. हे लक्षात आल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्या सात इंची टॅब्लेटच्या दुनियेत उडय़ा घेतल्या आहेत
या उडय़ा घेणाऱ्या कंपन्यांमध्ये आता ह्य़ुवेईची भर पडली आहे. त्यांनी अलीकडेच मीडिआपॅड ७ व्होग बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. ७ इंची डिस्प्ले स्क्रीन हे त्याचे वैशिष्टय़ असून त्या बरोबर अ‍ॅल्युमिनिअम बॉडी, क्वाड कोअर प्रोसेसर हेही त्याचे वैशिष्टय़ आहे. त्यासाठी १.२ गिगाहर्टझ् प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. थ्रीडी गेमिंगसाठी ते अधिक उपयुक्त ठरू शकते. यावर १०८० पी फूल एचडी व्हिडीओही पाहता येऊ शकतो.
मीडिआपॅड ७ व्होगसाठी ४१०० एमएएच ली- पॉलिमर बॅटरीचा वापर करण्यात आला असून त्यासाठी खास पॉवर सेव्हिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर सलग २० तास त्यावर बोलता येईल किंवा सलग चार तास एचडी चित्रपट पाहता येतील, असा कंपनीचा दावा आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत :
(अद्याप जाहीर झालेली नाही)

Story img Loader