फोन म्हणजे स्मार्टफोन हे सध्या समीकरणच होऊन गेले आहे. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये स्मार्टफोनच्या व्याख्याही दिवसागणिक झपाटय़ाने बदलताना दिसत आहेत. सर्वप्रथम आयफोन आणि त्यापाठोपाठ सॅमसंगने यामध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर सोनी, मायक्रोमॅक्स, मोटोरोला, एलजी आणि नोकियादेखील या स्पध्रेत उतरला आहे. पण मोबाइल कंपन्यांमधील एक महत्त्वाचा स्पर्धक शांतपणे आपली खेळी करत आहे आणि तो म्हणजे एचटीसी. सुरुवातीपासूनच अतिशय हायएन्ड फोन बाजारात दाखल करणारी ही कंपनी मोजकेच मॉडेल्स बाजारात आणत आली आहे. पण प्रत्येक वेळी ती लक्षात राहते ते तिच्या वेगळेपणामुळे. या वेळीसुद्धा एचटीसीने आपले वेगळेपण दाखवण्याचे ठरवले आहे. या नोव्हेंबरमध्ये विन्डोज ८ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे नवीन फोन एचटीसी बाजारात दाखल करत आहे. ना आयफोन, ना सॅमसंग तर एचटीसी स्मार्टफोन असंच लोक यास म्हणतील असा कंपनीला विश्वास आहे. गडद रंगाची दोन मॉडेल्स ‘८ एक्स’ आणि ‘८ एस’ मायक्रोसॉफ्टची मुख्य पार्टनर असेल्या नोकियाशी स्पर्धा करतील. सॅमसंग आणि अॅपलच्या तुलनेत एचटीसी स्मार्टफोनच्या शर्यतीमध्ये बरीच मागे पडली असून या नव्या विन्डोज स्मार्टफोनमुळे पुन्हा एकदा जोरदार बाजारात मुसंडी मारणार असल्याचे याच्या फीचर्स आणि लूकवरून दिसते आहे. आजवर एचटीसीचे सर्व फोन हे गुगलच्या अॅन्ड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यरत होते. मात्र या मॉडेल्सच्या निमित्ताने पहिल्यांदा एचटीसी आणि विन्डोज एकत्र येत आहेत. अतिशय उठावदार अशी बाह्यरचना, अधिक काळ चालणारी बॅटरी, स्कायड्राइव्ह क्लाऊड स्टोरेजवर ७ जीबीची मोफत साठवण क्षमता, स्टुडिओच्या प्रतीचा साऊंड, बीट्सची इन-बिल्ट ध्वनियंत्रणा आणि अतिशय जलद डेटा कनेक्टिव्हिटी पर्याय ही याची काही ठळक वैशिष्टय़े म्हणता येतील.
नेटवर्क – जीएसएम/ईडिजीई ८५०/९००/१८००/१९०० एमएचझेड, एचएएसपीए/डब्लूसीडीएमए ९००/२१०० एमएचझेड
डिस्प्ले – ४ इंचाचा मल्टिटच डिस्प्ले, मजूबत गोरील्ला ग्लासची स्क्रिन
प्रोसेसर – क्लालकॉम एस४- १ गिगाहर्ट्सचा डय़ुअल कोर प्रोसेसर
ऑपरेटिंग सिस्टीम – विन्डोज फोन ८
साठवण क्षमता – १६ जीबी (मायक्रो सिमकार्ड सपोर्ट)
मेमरी – ५१२ एमबी रॅम
जीपीएस नेव्हिगेशन- ग्लोनास म्हणजेच ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमवर आधारित इंटरनल जीपीएस अॅन्टेना
सेंसर – जी-सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, अॅम्बियन्ट लाइट सेंसर
कनेक्टिव्हिटी – थ्रीजी (एचएसडीपीए/एचएसयूपीए), ३.५ एम.एम. स्टिरिओ ऑडिओ जॅक, ब्लूटूथ वी२.१, वायफाय
कॅमेरा – ऑटो फोकस आणि एलईडी फ्लॅश सुविधेसह पाच मेगापिक्सल कॅमेरा. एचडी व्हिडीओ रेकॉर्डिग
मल्टिमीडिया सपोर्ट फॉरमॅट -ऑडिओ – एमपी३, वेव, एएमआर, एम४ए, डब्लूएमए (वर्जन ९ आणि १०)
व्हिडीओ – ३जीपी, २जी२, एमपी४, डब्लूएमए (वर्जन ९ आणि १०)
बॅटरी – १७०० एमएएच लिथिअम पॉलीमर
आकार – १२०.५ ७ ६३ ७ १०.२८ एमएम
वजन – ११३ ग्रॅम
भारतातील किंमत – अंदाजे २५ हजार रुपये
बाजारात दाखल होणार – नोव्हेंबर २०१२
रंग- ‘८ एक्स’ : कॅलिफोर्निया ब्लू, ग्राफिट ब्लॅक, फ्लेम रेड आणि लाइमलाइट यल्लो या रंगात उपलब्ध आहे. तर ‘८ एस’ : डॉमिनो, फिएस्टा रेड, अटलांटिक ब्लू आणि हाय-राईज ग्रे
एचटीसीचे पहिले विन्डोज स्मार्टफोन; ८ एक्स आणि ८ एस
मोबाइल कंपन्यांमधील एक महत्त्वाचा स्पर्धक शांतपणे आपली खेळी करत आहे आणि तो म्हणजे एचटीसी. सुरुवातीपासूनच अतिशय हायएन्ड फोन बाजारात दाखल करणारी ही कंपनी मोजकेच मॉडेल्स बाजारात आणत आली आहे. पण प्रत्येक वेळी ती लक्षात राहते ते तिच्या वेगळेपणामुळे.
First published on: 15-10-2012 at 01:51 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech it htc windows phone samsung smartphone htc 8x htc 8s