प्रश्न  – माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस ३ हा फोन आहे. त्याच्या कॉल लॉगच्या आयकॉनवर सारखे आठ मिसकॉल आहेत असे दाखविले जाते. पण प्रत्यक्षात हे सर्व मिस्ड कॉल मी पाहिलेले आहेत. तरीही हा आकडा जात नाही. तसेच मी सर्व कॉल लॉगही डिलिट केला, पण तरीही काही झाले नाही. काय करता येईल?
    -अक्षय महाडिक
उत्तर – ही अडचण अनेक अ‍ॅड्रॉइड फोन्सना येते. अनेकदा कॉल लॉगमधील मिस्ड कॉलची यादी डिलिट केल्यानंतर तो आकडा जातो. मात्र तरीही तो आकडा गेला नाही तर तुम्ही सेटिंगमध्ये जा. तेथे अ‍ॅप्लिकेशन मॅनेजरमध्ये जा. तेथे ऑल अ‍ॅप्स हा पर्याय निवडा. यात बॅज प्रोव्हायडर हे अ‍ॅप निवडा. त्याचा सर्व डेटा क्लिअर करा. यानंतर तुम्ही म्हणत असलेला कॉल लॉगवरील आकडा निघून जाईल.
प्रश्न  – माझ्याकडे नोकिया आशा ३०२ हा फोन आहे. त्यात इंटरनेट सुरू केले असता कॉन्फ्किटिंग अ‍ॅप्लिकेशन नाऊ असा संदेश येतो. त्यावर ‘यस’ असे क्लिक केल्यावर फोन हँग होतो.
 -राजेश झाडे
उत्तर – नोकियाच्या जुन्या फोन्सना ही अडचण येते. तुमच्या मोबाइलवर ई-मेल अ‍ॅप्लिकेशन सुरू असेल तर तुम्ही स्वत:ला  <http://download.ovi.com&gt; ही िलक ई-मेल करून घ्या. त्यानंतर या िलकवरून नवीन ब्राऊजर डाऊनलोड करून घ्या. तुमचे ब्राऊजर सुरू होईल.
तंत्रस्वामी