फिलिप्स ही जगप्रसिद्ध कंपनी पूर्वी रेडिओ, टेपरेकॉर्डर आणि नंतरच्या काळात डीव्हीडी प्लेअर आदींसाठी अतिशय प्रसिद्ध हती. आता मात्र संगीताचे रूप बदलले आहे. गाणी आजही एकली जातात. कदाचित पूर्वीपेक्षा ती ऐकण्याचे प्रमाणही अधिक आहे. मात्र ती ज्या उपकरणार ऐकली जातात. त्यामध्ये मात्र आमूलाग्र बदल झाला आहे. आयपॉडने तर संगीताचे क्षेत्र पार बदलून टाकले आणि इतरांनाही बदलण्यास भाग पाडले. आता एमपीथ्री आणि फोरचा जमाना आहे. त्यामुळे गाणी त्या फॉर्मॅटमध्येच ऐकली जातात. आणि आता त्यासाठी तशी साजेशी उपकरणेही बाजारात आली आहे. फिलिप्स या कंपनीने आचा बाजारात आणलेला फिलिप्स गोगीअर एसए ०६० हा देखील याच नव्या परंपरेतील आहे.
तो ३.२ इंचाचा एचव्हीजीए डिस्प्ले असलेला असा एमपीफोर प्लेअर आहे. त्याचा डिस्प्ले रंगीत आहे. शिवाय तो आताच्या जमान्यातील इतर उपकरणांप्रमाणे टचस्क्रीन आहे. त्याचे सर्व कंट्रोल्स, बटणे ही देखील टचस्क्रीनच आहेत. हे उपकरण दिसायला तसे देखणे आहे. एमपीथ्री किंवा फोर टचस्क्रीन असेल तर अनेकदा यादी खाली- वर करण्यात वेळ जातो ते टाळण्यासाठी याला कायनेटीक स्क्रोलिंगची सोय देण्यात आली आहे. फ्लॅक व एपीइ लूजलेस सपोर्टमुळे बाहेरचे आवाज बाहेरच राहतात व तुम्हाला व्यवस्थित ऐकू येते. यात टेक्स्ट रीडरची सोयदेखील आहे. शिवाय मजकूर किंवा गाणी साठविण्याच्या ४ जीबी आणि ८ जीबी अशा दोन क्षमतांमध्ये तो बाजारात उपलब्ध आहे.
बाजारपेठेतील किंमत – ४ जीबीसाठी – ५,९९९
फिलिप्स गोगीअर एसए ०६०
फिलिप्स ही जगप्रसिद्ध कंपनी पूर्वी रेडिओ, टेपरेकॉर्डर आणि नंतरच्या काळात डीव्हीडी प्लेअर आदींसाठी अतिशय प्रसिद्ध हती. आता मात्र संगीताचे रूप बदलले आहे. गाणी आजही एकली जातात. कदाचित पूर्वीपेक्षा ती ऐकण्याचे प्रमाणही अधिक आहे. मात्र ती ज्या उपकरणार ऐकली जातात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-09-2012 at 01:34 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech it philips philips gogear mp3 player philips gogear music music player technology