कम्प्युटर, मोबाइल किंवा तंत्रज्ञानाविषयी तुमच्या मनातील समस्या विचारण्यासाठी आम्हाला Lstechit@gmail.com यावर ई-मेल करा.
*मला नवीन डेस्कटॉप पीसी घ्यायचाय. त्यात मला फोटोशॉप आणि कोरल हे दोन सॉफ्टवेअर वापरायचे आहेत. एचसीएल, असूस, डेल, लिनोवा यांपकी कोणता चांगला आहे? माझं बजेट ४० हजार आहे. पीसीचं कॉन्फिगरेशन काय असेल? सॉफ्टवेअरवर किती खर्च होईल?
संजय सुतापे
*फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ यासारखे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी तुम्हाला हाय कॉन्फिगर्ड कॉम्प्युटर घ्यावा लागणार यात काही वादच नाही. शक्यतो अॅडव्हान्सच ओएस घ्या. ज्यामुळे तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमधील सर्व पर्याय मनसोक्त वापरता येतील. असूसचा पर्याय तर डेस्कटॉपसाठी चांगला असू शकत नाही. राहिलेल्यापकी एचपी किंवा डेल यांपकीच तुम्हाला योग्य पर्याय ठरू शकेल. एचपीच्या पॅविलिऑनचा तुम्ही विचार करू शकता. यामध्ये आठ जीबी रॅम, हार्ड डिस्क तुम्हाला हवी इतकी पण कमीत कमी ५४० जीबी आता टीबीच्या हार्डडिस्कही आल्या आहेत. प्रोसेसर आय थ्री किंवा आय फाइव्हचा पर्याय चांगला राहील. यामध्ये तुम्ही जी ऑपरेटिंग सिस्टीम घ्याल ती हायटेक असू द्या. अर्थात एचपीचे कॉम्प्युटर िवडोजला सपोर्टेबल असल्यामुळे यात तुम्हाला िवडोज एक्सपीपासून ते विस्टा, िवडोज ७ पर्यंतचे पर्याय मिळतील, पण या ओएस घेताना त्या ६४ बाइट्सवाल्या घेणे योग्य ठरेल. डेलमध्ये म्हणाल तर डिझाइन्स सॉफ्टवेअर्सच्या दृष्टीने प्रीसिशन सीरिजमधील कॉम्प्युटर योग्य ठरतील. यामध्ये तुम्हाला क्वाड कोर क्सीऑन प्रोसेसर मिळू शकतो. याशिवाय आठ जीबी रॅम, ग्राफिक कार्ड तर फिचर्सही अपडेटेड असल्यामुळे याचाही तुम्ही विचार करू शकता. हे सर्व कॉम्प्युटर तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळू शकतील.
*माझ्याकडे असलेल्या सॅमसंगच्या मोबाइलमध्ये नेटफ्रंट ३.५ हे डिफॉल्ट ब्राऊजर आहे. मला फ्लॅश ब्राऊजर डाऊनलोड करायचाय. तो कसा डाऊनलोड करू?
नेहा ब्रीद
*तुमच्या मोबाइलमधला हा ब्राऊजर तुम्हाला अपग्रेड करता येणार नाही. जरी केलात तरीही मोबाइलच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तो ब्राऊजर कायम ठेवून ऑपेरा मिनीचं ६.१ व्हर्जन डाऊनलोड करू शकता. मोबाइलवरूनच ऑपेरा मिनी ब्राऊजर डाऊनलोडसाठी सर्च केलंत तर तुमच्या मोबाइलसाठी योग्य व्हर्जन मिळू शकेल. ते डाऊनलोड केल्यावर मोबाइलच्या इंटरनेट सेटिंगमध्ये जाऊन हे ब्राऊजर डिफॉल्ट ठेवू शकता. ऑपेराने खास मोबाइलकरता वेगवेगळे ब्राऊजर्स विकसित केलेत. जे जास्त स्पेस वापरत नाही. ज्यामुळे मोबाइलच्या स्पीडवर परिणाम होत नाही. यासाठी तुम्ही http://m.opera.com/ही साइट पाहा.
*मी माझा नवीन मोबाइल ई-शॉिपगच्या माध्यमातून खरेदी करीत आहे. तो मोबाइल घरी आल्यावर तो नवीन आहे का, हे ओळखता येते का? येत असेल तर कसे?
सिद्धेश वेल्हे.
*मोबाइल ओरिजिनल कंपनीचा आहे का, हे तपासण्यासाठी तुम्ही आयएमईआय नंबर व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाइलवर *#०६# टाइप केलं की, तुम्हाला १५ आकडी आयएमईआय नंबर मिळेल किंवा सध्याच्या स्मार्टफोनमध्ये अबाऊट डिव्हाइसमध्ये तुम्हाला हा नंबर मिळू शकतो. हा नंबर मेसेजमध्ये टाइप करून तो ५३२३२ किंवा ५७८८६ वर एसएमएस करा. यानंतर तुम्हाला आयएमईआय नंबर चेक फोन इज जेन्युइन सॅमसंग फोन, असा मेसेज येईल. जर तो मोबाइल ओरिजिनल नसेल, चोरलेला असेल, सेकंड हॅण्ड असेल तर त्या संदर्भातील माहिती मिळेल. बिलावर बॉक्सवरील मॉडेल नंबर, आयएमईआय नंबर आहे का हे तपासून घ्या आणि फोन घरी आल्यावर या सर्व गोष्टी तपासल्यावरच पसे द्या.
Tech नॉलेज
कम्प्युटर, मोबाइल किंवा तंत्रज्ञानाविषयी तुमच्या मनातील समस्या विचारण्यासाठी आम्हाला Lstechit@gmail.com यावर ई-मेल करा.
First published on: 18-01-2014 at 12:21 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech knowledge