प्रश्न – माझ्या संगणकामध्ये असलेल्या ड्राइव्हपकी एक ड्राइव्ह काम करत नाहीए. यावर उपाय सुचवा. – कुणाल दाते
उत्तर- तुमचा ड्राइव्ह जर तुम्हाला अॅक्सेस होत नसेल तर तुम्ही खालील उपाय करून पाहा.
* स्टार्ट बटणवर क्लिक करा. तेथे ‘युजर अकाऊंट कंट्रोल’ असे टाइप करा आणि एन्टर प्रेस करा. तुमच्याकडे जर विंडोज एक्सपी असेल तर सर्चमध्ये जाऊन तुम्ही हा पर्याय मिळवू शकता.
* जेव्हा युजर अकाऊंट कंट्रोलची विंडो ओपन होईल तेव्हा तुम्ही त्याच्या सेटिंगमध्ये जा. यामध्ये ‘नेव्हर नोटिफाय’ हा पर्याय निवडा आणि ओके पर्यायावर क्लिक करा.
हे केल्यावर तुमचा ड्राइव्ह सुरू व्हायला हरकत नाही. तसे झाले नाही तर तुम्ही खालील पद्धतीने उपाय करा.
* जो ड्राइव्ह ओपन होत नाहीए त्याला राइट क्लिक करा. त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जा.
* त्यातील सिक्युरिटी टॅब निवडा, त्यात एडिट अँड अॅड युजर अकाऊंटमध्ये जा. तेथे गेल्यावर तुमच्या युजरनेमच्या पुढे ‘असाइन फुल कंट्रोल पर्मिशन’ या पर्यायावर क्लिक करा.
* पुन्हा अॅडव्हान्समध्ये क्लिक करा. स्विच टू ओनरशिप या टॅबमध्ये जा. तेथे एडिट बटणावर क्लिक करा आणि तुमचे अकाऊंट हायलाइट करून ओके बटण दाबा.
हे केल्यावर तुम्हाला तुमच्या ड्राइव्हचा अॅक्सेस मिळेल. जर अॅक्सेस नाही मिळालाच तर तुम्हाला ड्राइव्ह रिकव्हरी सॉफ्टवेअर वापरून तुमच्या त्या ड्राइव्हमधील माहिती मिळवून घ्यावी लागेल.
प्रश्न – माझ्याकडे सुपरकॉम्पचा पी४ हा संगणक आहे. त्यात एक जीबी रॅम आहे. अँड्रॉइड फोनवर आपण ज्याप्रमाणे रॅम क्लीअर करतो त्याप्रमाणे या संगणकावरही कशी करता येईल हे सांगा. तसेच माझ्या संगणकाचा वेग वाढविण्यासाठी काय करता येईल? – विकास सातपुते
उत्तर – विकास, तुमच्या संगणकाची रॅम खूपच कमी आहे. म्हणजे मुळात जर तुम्ही आणखी एक जीबीची रॅम संगणकात बसवली तर तुमचा संगणक आणखी काही प्रमाणात वेगवान होऊ शकेल. संगणकातील नको त्या गोष्टी काढून टाकण्यासाठी तुम्ही तुमचा हार्ड ड्राइव्ह नियमित क्लीअर केला पाहिजे. यासाठी तुम्ही स्टार्ट मेन्यूमध्ये जा, तेथे ऑल प्रोग्राम्समध्ये अॅक्सेसरीजचा पर्याय निवडा. यानंतर त्यात सिस्टम टूल्सचा पर्याय निवडा. त्यानंतर डिस्क क्लीनअपवर क्लिक करा. जर तुम्हाला संपूर्ण संगणकाचे क्लीनअप करावयाचे असेल तर तसे करू शकता किंवा एखाद्या ड्राइव्हपुरतेही क्लीनअप करू शकता. यानंतर आणखी एक गोष्ट नियमितपणे केली पाहिजे ती म्हणजे आपल्या संगणकात आपण वापरत नसलेल्या अनेक फाइल्स आणि प्रोग्राम्स असतात ते डिलीट केले पाहिजे. फाइल्स डिलीट करणे हे सामान्य आहे. प्रोग्राम्स डिलीट करण्यासाठी स्टार्ट मेन्यूमधून सेटिंगमध्ये जा. पुढे कंट्रोल पॅनलमध्ये अॅड किंवा रिमूव्ह प्रोग्राम्स असा पर्याय असेल त्या पर्यायामध्ये जा. तेथून तुम्हाला नको असलेले प्रोग्राम्स तुम्ही डिलीट करू शकता.
Tech नॉलेज : ड्राइव्ह डिटेक्ट होत नाही
प्रश्न - माझ्या संगणकामध्ये असलेल्या ड्राइव्हपकी एक ड्राइव्ह काम करत नाहीए. यावर उपाय सुचवा.
First published on: 13-06-2014 at 12:04 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech knowledge drive does not detect