अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम आणि जावा ऑपरेटिंग सिस्टिम यामध्ये नेमका फरक काय आहे?  मला एखादा फोनही सुचवा.
समीर खिलारे  
उत्तर – मोबाइल घेताना त्याची ऑपरेटिंग सिस्टिम पाहणं केव्हाही चांगलंच. गुगलची विकसित केलेली अॅन्ड्रॉइड ओएस ओपन सोर्स ओएस म्हणून ओळखली जाते. ओपनसोर्स असल्यामुळे यासाठी कोणत्याही प्रकारे अॅप्लिकेशन बनविणं सोपं जाते. अॅन्ड्रॉइड मार्केटमध्ये लॉन्च झाल्यापासून यावर वापरता येणारे लाखभर अॅप्लिकेशन्स तयार झाले आहेत. ही ऑपरेटिंग सिस्टिम गुगलची असल्यामुळे यावर जी-मेल क्लायंट, गुगल मॅप आणि जी-टॉक जलदगतीनं वापरता येतं. अॅन्ड्रॉइडच्या तिसऱ्या व्हर्जनमध्ये जी-मेल, मल्टीपल टॅब वेबपेज तसंच विविध प्रकारचे लार्ज स्क्रीन अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. थ्रीडी, व्हिडीओ चॅट , ई-बुक, गुगल मॅप, वॉलपेपर आदी सुविधाही उपलब्ध आहेत. सर्वात विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमची होम स्क्रीन सोयीने कस्टमाइज्ड करता येते. जावा ही ऑपरेटिंग सिस्टिम बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भाषा आहे. या माध्यमातून विविध ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतील अशी अॅप्लिकेशन्स तयार केली जातात.’ एम-इंडिकेटर’ हे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकाचे अॅप्लिकेशन ‘जावा’वरच चालतं. तुमच्या बजेटमधल्या अॅन्ड्रॉइड फोन्सच्या व्हर्जन्समध्ये खूप मर्यादा आहेत. तुमचं बजेट वाढवून १० हजारांपर्यंत आणलंत तर चांगला फोन घेऊ शकाल.
’वस्तूंवरील क्यू आर कोड किंवा बार कोड वाचण्यासाठी मोबाइलमध्ये कोणते अॅप आहे का? – देवेश महाजनी
उत्तर – अनेक जाहिरातींत एखादा बारकोड दिला जातो जो स्कॅन केल्यावर तुम्हाला त्या प्रॉडक्टची माहिती लगेच मिळेल, असं म्हटलं जातं. आता प्रश्नं हा आहे की, बारकोड म्हणजे नेमकं काय आणि तो स्कॅन कसा करायचा. याचसाठी स्मार्टफोनमध्ये क्यूआर बारकोड अॅप्लिकेशन आहे. दिलेला बारकोड स्कॅन करून त्याची माहिती काही क्षणांतच हे अॅप्लिकेशन देतं. नुकताच ब्लॉग्जसाठीही क्यू आर बारकोड सुरू झाला आहे. शॉिपग करताना प्रॉडक्टवर किंमत दिसत नसेल तरी या अॅप्लिकेशनच्या मदतीने त्या वस्तूची किंमत, संपूर्ण माहिती, ते कसं काय, त्याची क्वांटिटी, क्वालिटी अशा सगळ्या गोष्टी दिसतात. तुम्ही फसण्याचा धोका कमीतकमी होतो. उदा. पाहायचं असेल तर तुमच्या आधारकार्डावरचा बारकोड स्कॅन करून पाहा. त्यावरची सगळी माहिती दिसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा