त्रिमिती तंत्रज्ञान हे आता अत्यंत महत्त्वाचे आणि नाविन्यपूर्ण बनत चालले आहे. या तंत्रज्ञानावर आधारीत सिनेमे आणि टिव्ही यांची आता सर्वानाच ओळख आहे. एखादे दृश्य पडद्याऐवजी आपल्या डोळय़ांसमोर प्रत्यक्ष घडत असल्याचा अनुभव देणारे थ्रीडी तंत्रज्ञान म्हणजे एक किमयाच आहे. याच तंत्रज्ञानात आता थ्रीडी िपट्ररचाही समावेश झाला आहे. थ्रीडी प्रिटिंगमध्ये एखाद्या छायाचित्राचे अथवा डीजिटल चित्राचे थ्रीडी चित्र छापून येते. पण यात आता आणखी एक अद्भूत उपकरण सामील होत आहे. तुम्ही कागदावर काढलेल्या कोणत्याही चित्राचे तात्काळ थ्रीडी रूप उभे करणारा थ्रीडूडलर नावाचा थ्रीडी पेन पुढच्या वर्षी बाजारात दाखल होणार आहे. पेनच्या आकाराच्या या उपकरणाला निबऐवजी एक बहिर्वेधक आहे. या बहिर्वेधकातून पडणारया धाग्याच्या सा’ााने चित्र काढताच ते उचलल्यास त्याचे थ्रीडी रुपांतर होते. चित्र काढताना पेनवरील बटण दाबताच बहिर्वेधकातून वितळलेले प्लास्टिक शाईसारखे बाहेर पडते. जेव्हा चित्र पूर्ण होते तेव्हा हे वितळलेले प्लास्टिक थंड  आणि कडक होते. त्यानंतर तुम्ही त्याला हाताने उभे केल्यास तुम्ही काढलेल्या चित्राचे थ्रीडी रुप दिसते. हे पेन बनवणारया कंपनीने कलात्मक वापरासाठी व गंमत म्हणून या पेनची निर्मिती केली आहे. मात्र, आराखडे वा नकाशे बनवण्यासाठीही या पेनचा वापर व्यावहारिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
किंमत अंदाजे ५९०० रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा