स्टेटस सिम्बॉल खिशात वागवणाऱ्यांची दिवाळी वेगळीच असते. त्यांची उपकरणे ही काही हजारांची नव्हे तर काही लाखांची असतात. अशी वेगळी दिवाळी साजरी करणाऱ्यांसाठी वर्टू या अतिश्रीमंतांच्या ब्रॅण्डने थेट दोन लाख ७० हजार अशी भारतीय बाजारपेठेतील किंमत असलेला नवा कोरा मोबाईल बाजारपेठेत आणला आहे. ३.५ इंचाचा एचडी मल्टिटच डिस्प्ले हे त्याचे वैशिष्टय़ आहे. त्यावर सफायर अर्थात नीलम हे मौल्यवान खडे लावण्यात आले आहेत. किंबहुना या नीलममुळेच त्याची किंमत ही अधिक आहे. या हॅण्डसेटला तब्बल ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. अतिशय उत्तम दर्जाचे स्टेनलेस स्टील त्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आले आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. सुमारे २ लाख ६९ हजार.

Story img Loader