तुम्ही कोणता फोन वापरता, कोणती ऑपरेटिंग सिस्टिम वापरता आणि त्यासाठी कोणती आणि किती चांगली अ‍ॅप्स विकसित करण्यात आली आहेत, याचा अंदाज घेऊन मोबाईल उपकरणाची खरेदी ग्राहकांकडून होत असते..
सध्या मोबाईल कंपन्यांचा व्यवसाय चालतो तो मूल्यवर्धित सेवा अर्थात व्हॅल्यू अ‍ॅडेड सव्‍‌र्हिसेसवर. त्यात अ‍ॅप्सला सर्वाधिक महत्त्व आहे. तुम्ही कोणता फोन वापरता, कोणती ऑपरेटिंग सिस्टिम वापरता आणि त्यासाठी कोणती आणि किती चांगली अ‍ॅप्स विकसित करण्यात आली आहेत, याचा अंदाज घेऊन मोबाईल उपकरणाची खरेदी ग्राहकांकडून होत असते. म्हणून तर आता आपल्या उपकरणाची निर्मिती करताना मोबाईल कंपन्यांनाही हे गणित ध्यानात ठेवावेच लागते. सध्याच्या या अ‍ॅप्सच्या जमान्यात चांगली मागणी असलेली काही भारतीय अ‍ॅप्स तेजीत आहेत. त्यांची गुणवत्ता त्यांच्या बहुपयोगीत्त्वावर ठरते!
मॅग्झटर
दररोजची वर्तमानपत्रे आपण दररोज वाचून संपवतोच. पण साप्ताहिक आणि मासिके मात्र  आपल्याकडे दीर्घकाळ असतात. ती आपण अनेकदा सवडीने वाचतो. त्यात आज आपल्याकडे वर्तमानपत्रे ही प्रत्यक्ष वाचण्याचाच टेंमॅग्झटर
दररोजची वर्तमानपत्रे आपण दररोज वाचून संपवतोच. पण साप्ताहिके आणि मासिके मात्र  आपल्याकडे दीर्घकाळ असतात. ती आपण अनेकदा सवडीने वाचतो. त्यात आज आपल्याकडे वर्तमानपत्रे ही प्रत्यक्ष वाचण्याचाच ट्रेंड असला तरी अनेकदा साप्ताहिके ही डिजिटल रूपात किंडल किंवा इ-बुकच्या रूपात वाचली जातात. म्हणूनच कदाचित विजयकुमार राधाकृष्णन यांनी मॅगेझिन्ससाठी खास मग्झटर नावाचे एक अ‍ॅप विकसित केले आहे.
बहुतांश मासिके ही डिजिटल रूपात विनामूल्य वाचता येतात तर काही सभासदांसाठीच उपलब्ध आहेत. या दोन्ही प्रकाराची मासिके या अ‍ॅप्सवर तु्हाला उपलब्ध आहेत.
पल्स
सध्याचा जमाना हा अपडेशनचा जमाना आहे. तोच नव्या जगाचा परवलीचा शब्दही आहे. आपण अपडेटेड आहोत, हे सांगण्यात आणि मिरवण्यात दोन्हींमध्ये आपल्याला रस असतो. त्यासाठी मग वेगवेगळ्या संकेतस्थळांवर जाऊन त्या त्या विषयाशी संबंधित बातम्या, फीचर्स यांचे वाचन सातत्याने करावे लागते. पण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वेबसाईटस्वर जाण्यापेक्षा सारे काही एकत्रच मिळाले तर?
नेमका असाच विचार अंकित गुप्ता आणि अशोक कोठारी यांनीही केला आणि त्यांनी एक अ‍ॅप्स विकसित केले. पल्स असे या अ‍ॅप्सचे नाव असून आजवर अनेकदा या अ‍ॅप्सची निवड बातम्यांसाठीचे सर्वोत्तम अ‍ॅप्स म्हणून करण्यात आली आहे. यामध्ये आपल्याला हव्या त्या क्रमानुसार आणि विषयांनुसार बातम्यांची वर्गवारी करता येते, त्यांची रचना करता येते आणि शिवाय या बातम्या सेव्ह करण्याची आणि आपल्याला हव्या त्या व्यक्तींशी शेअर करण्याची सोय देखील या अ‍ॅप्समध्ये आहे. केवळ पारंपरिक पद्धतीनेच इथे बातम्यांची निवड केली जात नाही तर अलीकडे सर्वाधिक वापरला जाणारा आरएसएस फीडस्चा मार्गही वापरला जातो. शिवाय बातम्यांशी संबंधित ब्लॉग्जचा विचारही यात केला जातो.
आयफोन, आयपॅड, अँड्रॉइड आणि किंडल या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी हे अ‍ॅप्स उपलब्ध आहे.

Story img Loader