आपल्याला एखादी गोष्ट सर्च इंजिनवर शोधायची असेल तर व्हाइस सर्चचा वापर करणे हे तसे आता जुने झाले आहे. अ‍ॅपलने सिरीच्या माध्यमातून हा प्रयत्न केला होता. मात्र आजपर्यंत आपल्याला जे व्हाइस सच्रेस उपलब्ध होते त्यामध्ये केवळ इंग्रजी तेही परदेशी अ‍ॅक्सेंटचाच समावेश होता. यामुळे आपण ज्याप्रमाणे इंग्रजी बोलतो त्याप्रमाणे बोलून व्हाइस सर्च सुविधेचा फायदा घेणे शक्य नव्हते, पण आता हे शक्य होणार आहे. कारण सर्च इंजिन क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या ‘गुगल’ने िहदी भाषेतील सर्चचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय लवकरच मराठी, तामिळ, बंगालीसमवेत अन्य भारतीय भाषांचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंटरनेटपासून दूर असणाऱ्या तीस कोटी भारतीय जनतेला ऑनलाइनच्या प्रवासात आणण्याच्या उद्देशाने सर्च इंजिन क्षेत्रातील अग्रणी गुगलने ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ अर्थात ‘सीडॅक’सोबत करार करून हे विकसित केले आहे. व्हॉइस सर्चच्या माध्यमातून ज्या लोकांना संगणकावर टायिपग करणे शक्य होत नाही अशी मंडळीही इंटरनेटचा वापर करू शकणार आहेत. इंटरनेटवर गुगल सुरू झाल्यावर आवाजाने आपण आपल्याला पाहिजे ती गोष्ट शोधू शकणार आहोत.

येथे पाहा प्रात्यक्षिक
‘गुगल’वर िहदी भाषेतून कशा पद्धतीने सर्च करावा, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी कंपनीने http://www.hindiweb.comहे नवे संकेतस्थळ सुरू केले आहे. हे संकेतस्थळ इंटरनेटविषयी उत्सुक असणाऱ्या िहदी भाषिकांना नेमकी माहिती पुरविणार आहे. तसेच यावरील व्हिडीओ, अ‍ॅप्स आणि ब्लॉग्जच्या माध्यमातून प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत.

काय आहे व्हॉइस सर्च अ‍ॅप
गुगलने िहदीमध्ये व्हाइस सर्चची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण याचबरोबर गुगलने एक व्हॉदस सर्च नावाचे अ‍ॅप ही बाजारात आणले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाइलमधील अ‍ॅप्स वापरू शकणार आहोत. यासाठी अ‍ॅप डेव्हलपर्सना एक छोटासा कोड त्यांच्या अ‍ॅपमध्ये द्यावा लागला आहे. व्हॉइस ऑर्डरचा हा कोड अ‍ॅपमध्ये आला की आपण गुगलच्या व्हॉइस अ‍ॅपच्या माध्यमातून आपले अ‍ॅप्स वापरू शकणार आहोत. उदाहरणार्थ गुगलचे व्हॉइस सर्च अ‍ॅप सुरू करून आपण फोनमध्ये ‘ओके गुगल सर्च फॉर हॉटेल्स इन मुंबई ऑन ट्रिप अ‍ॅडव्हायझर’ असे म्हटले की, आपल्यासमोर त्या संदर्भातील सर्च रिझल्ट्झ येतात. यामुळे आता आपण गुगलच्या मदतीने आपल्याला जे शोधायचे आहे ती कोणतीही गोष्ट टाइप न करता शोधू शकणार आहोत.

सध्या भारतात २० कोटी अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट यूजर असून, प्रत्येक महिन्यात ५० लाख नव्या यूजरची वाढ होत आहे. हाच वेग कायम राहिल्यास येत्या वर्षभरात भारतातील इंटरनेट यूजरची संख्या अमेरिकेला मागे टाकेल. सध्या देशातील १९.८ कोटी जनतेचेच इंग्रजीवर प्रभुत्व आहे. इतरांना इंग्रजीअभावी इंटरनेटवर येणे अवघड बनले आहे. यामुळे यापूर्वीच गुगलने प्रादेशिक भाषांमध्ये लिखित स्वरूपातील शोध सुविधा दिली होती. आता ती व्हॉइस स्वरूपातही उपलब्ध होणार आहे.
राजन आनंदन, उपाध्यक्ष, गुगल इंडिया