खाणे-पिणे हा सर्वच सोशल नेटवर्किंग साईटस्वरचा सर्वाधिक चर्चिला जाणारा असा विषय आहे. हे लक्षात आल्यानंतर आता सोशल नेटचवर्किंगलाच जोडून खाण्या- पिण्याबाबत शिफारस केले जाणारे असे एक संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. फूडस्पॉटिंग डॉटकॉम असे त्याचे नाव आहे. http://www.foodspotting.com
तुम्ही नरिमन पॉइंट परिसरात असाल किंवा मग वरळी अथवा पुण्याला एखाद्या भागामध्ये आणि कडाक्याची भूक लागली आहे. पण नेमके कळत नाहीए की, कुठे जावे तर अशा वेळेस फूडस्पॉटिंग तुम्हाला नक्कीच मदत करेल. म्हणजे तुम्ही त्या वेबसाईटवर जायचे. अर्थात तुमच्या कडे इंटरनेट जोडणी असलेला फोन असेल तर वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या जीपीएस नुसार तुम्हाला आजूबाजूची रेस्टॉरंटस् दिसू लागतील. तिथे यापूर्वी कोण, काय चांगले खावून गेले, त्यांना तेथील कोणता पदार्थ आ़ळडला, त्यांनी फोटो अपलोड केलेला असेल तर ती डिश प्रत्यक्षात दिसते कशी अशी सर्व प्रकारची माहिती तुम्हाला इथे मिळू शकेल. त्यानंतर तुम्हाला ठरवता येईल की, तुम्ही कुठे जाणार आहात?
फेसबुक खात्याच्या लॉगइन मार्फत तुम्ही या संकेतस्थळावर आपले खाते उघडू शकता. त्याच्यावर तुमच्या शिफारशी फोटोसकट टाकू शकता. त्याला गुगल मॅप्सची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे रेस्टॉरंटचे नाव, स्थळ नेमके कळते. दोन्ही प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता. घरी किंवा ऑफिसमध्ये असाल तर डेस्कटॉपवर इंटरनेटच्या माध्यमातून जाऊन किंवा स्मार्टफोनधारक असाल तर मग तुमच्यासाठी खास अॅप्सही विकसित करण्यात आले आहे. हे अॅप्स आयफोन, अँड्रॉइड, विंडोज फोन आणि ब्लॅकबेरी असे सर्वासाठी विकसित करण्यात आले आहे.
अॅप्स डाऊनलोड करा, खा, प्या आणि मजा करा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा