स्मार्टफोनच्या बाजारात अँड्रॉइडची चलती आणि अॅपलच्या फोनचं आकर्षण कायम आहे. या दोघांच्या भाऊगर्दीत विंडोज फोनच्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी नोकिया आटोकाट प्रयत्न करत आहेत. नोकियाच्या लुमिया स्मार्टफोननी मध्यम ते उच्च किंमत श्रेणीमधील आपला वेगळा ग्राहकवर्ग तयार केला आहे. त्याच वेळी कमी किमतीतील आणि ‘बेसिक’ फोन गटातील ‘आशा’ स्मार्टफोननी भारतासारख्या बाजारपेठेत चांगला जम बसवला आहे. यात आता भर पडलीय ती नोकिया आशा ५०१ आणि ५०३ या स्मार्टफोन्सची. ‘सिम्बियन’ आणि ‘मीगो’ ऑपरेटिंग सिस्टीमला छाट देऊन ‘आशा १.२’ या स्वतंत्र प्लॅटफॉर्मवर हे स्मार्टफोन्स विकसित करण्यात आले आहेत. टचस्क्रीन, आकर्षक रंगसंगती, कॅमेरा आणि वायफाय अशा वैशिष्टय़ांमुळे ‘आशा ५०१’ने बाजारात नाव कमावले तर, या साऱ्या वैशिष्टय़ांमध्ये ‘थ्रीजी’ सुविधेची भर घालत ‘आशा ५०३’ने एक पाऊल पुढे टाकले आहे.
‘आशा ५०३’ हा नोकियाच्या ‘आशा’ फोन्सच्या श्रेणीतील सर्वाधिक वैशिष्टय़े असलेला स्मार्टफोन आहे. ५ मेगापिक्सेल कॅमेरा, एलईडी फ्लॅश, ३ इंचाचा डिस्प्ले, गोíरला ग्लास, डय़ुअल सिम ही त्याची वैशिष्टय़े ग्राहकाला प्रथमदर्शनी निश्चितच आकर्षति करतात. पण प्रत्यक्ष हाताळताना हा स्मार्टफोन ग्राहकांच्या अपेक्षांना कितपत खरा ठरतो, याचा आम्ही आढावा घेतला. मात्र, त्यापूर्वी या फोनच्या वैशिष्टय़ांवर एक नजर टाकूयात.
पैशांचे मोल: ‘आशा ५०३’ची किंमत आणि त्या तुलनेत त्यासोबत मिळणाऱ्या सुविधा या स्मार्टफोनची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. बाजारामध्ये या फोनची किंमत साडेसहा ते सात हजारच्या आसपास आहे. या किमतीत अनेक कंपन्यांचे अँड्रॉइडवर आधारित स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र, त्यामध्ये पाच मेगापिक्सेल कॅमेरा, थ्रीजी, वायफाय, एलईडी फ्लॅश अशी सर्व वैशिष्टय़े मिळणार नाहीत. या सर्व सुविधा ‘आशा ५०३’मध्ये आहेत. यातील काही महत्त्वाच्या वैशिष्टय़ांच्या चांगल्या-वाईट बाजूंचा पुढे आढावा घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा