पाऊस पडत असताना खिशातला फोन बाहेर काढून बोलणे थोडे धोकादायक असते. यामुळे फोन भिजण्याची किंवा फोनमध्ये पाणी जाण्याची भीती असते. अशा वेळी आपण हॅण्डसेटचा पर्याय निवडतो. मात्र वायर असलेला हॅण्डसेट वापरणेही पावसाळ्यात तसे त्रासदायक असते. अशा वेळी ब्लूटय़ूथ हॅण्डसेटचा पर्याय योग्य ठरू शकतो. आपण छत्री किंवा रेनकोट वापरत असू तरी फोन बाहेर न काढता आपण फोन घेऊ शकतो किंवा गाणीही ऐकू शकतो. अशा काही ब्लूटय़ूथ हॅण्डसेट्सविषयी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नोकिया बीएच-५०३
नोकियाचा बीएच-५०३ हा ब्लूटय़ूथ वायरलेस हॅण्डसेट विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. यामध्ये ब्लूटय़ूथचा वेग २.० इतका आहे. याची रेंज १० मीटर इतकी लांब असल्यामुळे आपण फोन एखाद्या पिशवीत घालून बॅगेत ठेवला आणि ब्लूटय़ूथ हॅण्डसेट जोडला तरी आपण आपल्या फोनशी जोडलेले राहू शकतो. यामध्ये लिऑन बॅटरी असून त्याची क्षमताही चांगली असून या हॅण्डसेटच्या माध्यमातून आपण ११ तास बोलू शकतो. तर बॅटरी २१० तास स्टॅण्डबाय राहू शकते. यामध्ये अंतर्गत माइक सुविधा देण्यात आली असून त्याची क्षमता २२ ते १८ हजार हर्ट्झपर्यंत आहे. इतकेच नव्हे तर या हॅण्डसेटमध्ये आवाज नियंत्रणासाठी तसेच गाणी फॉरवर्ड, रिवाइंड करण्यासाठी बटनेही देण्यात आली आहेत.
किंमत- विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर ८९९ रुपयांपासून ते ३५९९ रुपयांपर्यंत

एसटीके बीटीएचएस ८००
एसटीके या मोबाइल आणि संगणक अ‍ॅक्सेसरीज कंपनीने नुकताच ब्लूटय़ूथ हॅण्डसेट बाजारात आणला आहे. हा हॅण्डसेट फोल्डिंगचा असून तो एका छोटय़ा कव्हरमध्ये ठेवता येणे शक्य होते. या हॅण्डसेटवरही आवाज नियंत्रणाबरोबरच गाणी फॉरवर्ड किंवा रिवाइंड करण्यासाठी तसेच प्ले आणि स्टॉपच्या बटणांची सुविधा देण्यात आली आहे. यात बास प्रणाली देण्यात आल्यामुळे गाणी ऐकण्याचा आनंद काही वेगळाच येतो. यामध्ये ब्लूटय़ूथची ४.० व्हर्जन वापरण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला यामधून ऐकू येणारा आणि ऐकायला जाणारा दोन्ही आवाज अगदी स्वच्छ येतो. याशिवाय हॅण्डसेटमध्ये अंतर्गत माइक देण्यात आला असून यामुळे आपण फोन कॉल्सना उत्तरही देऊ शकतो. यामधील उत्तम क्षमतेची बॅटरी देण्यात असून एकदा चार्ज केलेली बॅटरी फोनवर बोलण्यासाठी १२ तास तर गाणी ऐकण्यासाठी आठ तास काम करू शकते. बॅटरीची स्टॅण्डबाय क्षमता २०० तासांची आहे.
किंमत- ३९९० रुपये

पॅनासॉनिक आरपी-बीटीडी १०
पॅनासॉनिकने नुकतेच डीजेपासून ते स्पोर्ट्सपर्यंतच्या विविध पर्यायांसाठीचे ब्लूटय़ूथ हॅण्डसेट आणि इअरफोन बाजारात आणले आहेत. यापैकी आरपी-बीटीडी १० हा ब्लूटय़ूथ वायरलेस हॅण्ड्ससेट बाजारात आणले आहेत. यामध्ये नीअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हे हॅण्डसेट स्मार्ट उपकरणांना पेअरिंग होऊ शकते. यामध्ये देण्यात आलेल्या लिथियम बॅटरीची क्षमता ३० तास काम करण्याची आहे. या हॅण्डसेटला यूएसबी चार्जिग कॉर्डची सुविधाही आहे.
किंमत- ८९९० रुपये.

सॅमसंग बीएचएम१७००० आयडीईसीआयएनयू
सॅमसंगने ईअर टाइप वायरलेस ब्लूटय़ूथ बाजारात आणले आहेत. याची रेंजी १० मीटपर्यंत असल्याने फोन त्या परिघात कुठेही असला तरी आपण फोनवर बोलू शकतो किंवा गाणी ऐकू शकतो. यामध्ये मल्टिपॉइंट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तसेच अ‍ॅक्टिव पेअरिंग, व्हाइस प्रॉम्प्ट, ए२डीपी मोनो स्ट्रिमिंग आणि बॅटरी स्टेट्स इंडिकेटर देण्यात आले आहे. दोन तास चार्ज केलेल्या या हॅण्डसेटवर आठ तासांची बोलण्याची वेळ आणि ३०० मिनिटांची स्टॅण्डबाय वेळ मिळते. यात अंतर्गत माइक देण्यात आला असून फोन कॉलला उत्तर देणे, कॉल बंद अथवा रद्द करणे तसेच व्हॉइस डायलचे पर्यायही उपलब्ध आहेत. याशिवाय या हॅण्डसेटमध्ये लास्ट नंबर रिडायल, पॉवर ऑन किंवा ऑफ, म्यूट, कॉल ऑन होल्ड, आवाज कमी करण्याचा पर्याय अशा सुविधाही आहेत.
किंमत- विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर १६३९ रुपयांपासून ते २२९९ रुपयांपर्यंत.

जाब्रा इसी गो
जाब्रा हॅण्डसेटमध्ये ब्लूटय़ूथचे २.१ इडीर व्हर्जन देण्यात आले आहे. याची रेंज १० मीटपर्यंतची असून दोन तासांत पूर्ण चार्ज झालेला हा हॅण्डसेट सहा तास काम करू शकतो. बॅटरीची स्टॅण्डबाय क्षमता १९२ तास इतकी आहे. यामध्ये आवाज कमी करण्याचे विशेष तंत्र वापरण्यात आले असून त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा आवाज अधिक स्वच्छ व चांगला येतो. या हॅण्डसेटची जाडी चार मिमीइतकी आहे तसेच याचे वजन आठ ग्रॅम इतके आहे. काम नसताना हा हॅण्डसेट आपण खिशातही ठेवू शकतो. यामधील मायक्रोफोनमध्ये ५० ते ६० हर्टझची क्षमता आहे. हॅण्डसेटवर फोन कॉलला उत्तर देणे किंवा कॉल बंद करणे, रिजेक्ट करणे किंवा व्हॉइस डायलची सुविधा देण्यात आली आहे. तसेच म्यूट आणि अनम्यूटसह आवाज नियंत्रण बटनंही दिली आहेत. यातील कॉल बटनाच्या साह्य़ाने शेवटचा नंबर पुन्हा डायल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
किंमत- विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर १४९९ रुपयांपासून ते २७९९ रुपयांपर्यंत.