स्मार्टफोनच्या बाजारातील अॅपलचे स्थान डळमळीत होत असून, ‘झिओमी इंक’ या चायनीज कंपनीने स्मार्टफोन बाजारातील अॅपलच्या तिसऱ्या स्थानावर दावा केला आहे. अॅपलच्या आयफोन ६ प्लसला टक्कर देण्यासाठी झिओमीने ‘एमआय नोट’ फोन बाजारात उतरवला आहे. मोठ्या डिस्प्लेची वाढती मागणी लक्षात घेऊन झिओमीने हा फोन बाजारात आणला आहे. ज्याचे गुरुवारी बीजिंगमध्ये अनावरण करण्यात आले. ३७१ डॉलर इतकी किंमत असलेल्या या फोनची बरीचशी वैशिष्ट्ये ही अॅपल फोनसारखीच आहेत. दिसण्यास बराचसा आयफोन ६ प्लससारखा असलेल्या या फोनची किंमत मात्र आयफोनपेक्षा खूप कमी आहे. झिओमीने स्मार्टफोनच्या बाजारात उत्तमोत्तम फोन कमी किंमतीत उतरवून अॅपल आणि सॅमसंग या प्रतिस्पर्धी कंपन्यांना चांगलीच स्पर्धा निर्माण केली आहे. झिओमीने आपला पहिला स्मार्टफोन विकला त्याला तीन वर्षाच्या कालावधी लोटला असून, केवळ तीन वर्षांच्या कालावधीत झपाट्याने यशाच्या शिखराकडे पोहोचत स्मार्टफोनच्या बाजारात तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. ‘एमआय नोट’ हा आयफोनपेक्षा छोटा, पातळ आणि हलका असल्याचे झिओमीचे चिफ एक्झिक्युटिव्ह ले जून यांनी सांगितले. २०१४ मध्ये कंपनीने ६१ मिलियन फोन विकले असून, अगोदरच्या वर्षाच्या विक्रीपेक्षा हा आकडा २२७ टक्क्यांनी अधिक आहे.
xiaomi-mi-note-1

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआय नोटची वैशिष्ट्ये

  • ३डी कर्व्हड गोरीला ग्लास आणि मेटल फ्रेम
  • ५.७ शार्प, जेडीआय फूल एचडी डिस्प्ले (९५ % एमटीएससी, १४००:१ कॉन्ट्रास रेशो)
  • स्नॅपड्रेगोन ८०१ २.५ गेगाहर्टस् अॅड्रेनो ३३०, ३जीबी एलपीडीडीआर३ रॅम
  • ड्युअल ४जी सीम (मायक्रो/नॅनो) ड्युअल स्टॅण्डबाय
  • मागीलबाजूस सोनीचा १३ मेगापिक्सल कॅमेरा एफ/२.०, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझर (ओआयएस)
  • पुढीलबाजूस ४ एमपी कॅमेरा
  • हाय-फाय ऑडिओ सिस्टीम २४-बीट/१९२ केएचझेडलोसलेस प्लेबॅक सपोर्ट
  • ३००० एमएएच ४.४व्ही लिथियम-आयऑन बॅटरी, क्विक चार्ज २.०

एमआय नोट प्रोची वैशिष्ट्ये

  • २५६x२४४पी २के शार्प/जेडीआय स्क्रिन पीपीआय ५१५
  • ६२-बीट क्वालकोम स्नॅपड्रेगोन ८०१ ८-कोर प्रोसेसर एड्रोन ४३० सीपीयू
  • ४जी एलपीडीडीआर४ रॅम
  • ६४ जीबी रॉम
  • सपोर्ट एलईटी कॅट ९, ४५० एमबीपीएसपर्यंत डाऊनलोड स्पीड
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi launches mi note challenges iphone 6 plus