मोबाइल, स्मार्टफोन, टॅब्लेट, कम्प्युटर यांच्या सहज उपलब्धतेमुळे अलीकडच्या काळात इंटरनेटसोबतच गेिमग हा प्रकारही तरुण पिढीमध्ये खूपच लोकप्रिय होऊ लागला आहे. काउंटर स्ट्राइक, जीटीए व्हाइस सिटी, मॅक्स पेन, हिटमॅन यांसारख्या कम्प्युटर गेम्सना भारतातील १२ ते २५ वयोगटातील मुलांची चांगलीच पसंती मिळत आहे. विशेषत: प्लेस्टेशन आणि एक्सबॉक्स यांसारख्या केवळ गेिमगसाठी सर्वोत्तम असलेल्या उपकरणांवर खर्च करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. भारतात कम्प्युटर गेम्सच्या वाढत्या वापरकर्त्यांना आकर्षति करण्यासाठी एकीकडे गेिमग कंपन्या चढाओढ करत असतानाच, याच्याशी संबंधित उपकरणे बनवणाऱ्या कंपन्याही बाजारात नवीन काही तरी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. झेब्रॉनिक्स कंपनीने नुकतेच बाजारात दाखल केलेले गेिमग-मल्टिमीडिया हेडफोन या प्रयत्नांचेच एक उदाहरण आहे.
कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स यांच्याशी संबंधित उत्पादने व उपकरणांची विक्री करणारी भारतातील कंपनी टॉप नॉचने एक, दोन नव्हे तर चार वेगवेगळय़ा श्रेणीतील हेडफोन एकाच वेळी बाजारात दाखल केले आहेत. आयर्न हेड, कोल्ट, रॅटलस्न्ोक आणि िस्टगरे या नावांनी हे हेडफोन ३४९ ते १७९९ रुपयांच्या श्रेणीत उपलब्ध आहेत. यापकी आयर्न हेड म्हणजे गेिमगच्या दिवान्यांसाठी ‘सोने पे सुहागा’ आहे. पक्क्या गेमर्सना अतिशय साजेसा असा लूक असलेल्या या हेडफोनचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये ७.१ चॅनेल सिम्युलेटेड साउंड इफेक्ट तंत्रज्ञान अंतर्भूत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष हेडफोन असतानाही ७.१ चॅनेलच्या स्पीकरसमोर उभे असल्याचा भास निर्माण होतो. या तंत्रज्ञानामुळे हा हेडफोन लावून गेम खेळताना प्रत्यक्ष गेममध्ये शिरल्याचा अनुभव येतो. या हेडफोनच्या साह्य़ाने गाणी किंवा चित्रपट ऐकण्याचा आनंदही अप्रतिम आहे. या हेडफोनवरील मायक्रोफोन चांगल्या दर्जाचा असून अगदी दूरवरून येणारा आवाजही या मायक्रोफोनमध्ये टिपला गेल्याचा अनुभव आहे. या हेडफोनला यूएसबी पोर्टलशी कनेक्ट करता येते. याची कॉर्ड तीन मीटर लांबीची असून त्यावरील रिमोट कंट्रोलच्या साह्य़ाने लांबूनही आवाज कमी-अधिक करणे, मायक्रोफोन चालू-बंद करता येतो.
बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या हेडफोनपेक्षा अगदीच वेगळा नसला तरी झेब्रॉनिक्सचा आयर्न हेड यातही उठून दिसतो. याची किंमत १७९९ रुपये आहे. आयर्न हेडसोबतच झेब्रॉनिक्सने आणलेला रॅटलस्न्ोक हा लवचिक बॅण्ड असलेला हेडफोन असून त्याखालच्या श्रेणीत िस्टगरे हा हेडफोन बाजारात दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader