टेक्नॉलॉजी आणि स्मार्टफोन्सच्या गप्पा सुरू असल्या की अनेकदा विषय निघतो तो म्हणजे अ‍ॅपल आणि इतर फोन्समध्ये असणाऱ्या तफावतीचा. अ‍ॅपलचा फोन किंवा इतर प्रॉडक्ट्स, बाकी कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसपेक्षा लय भारी असा एकूणच चर्चेचा नूर असतो. एकतर अ‍ॅपलच्या उत्पादनांची किंमत ऐपतीपलीकडे, त्यात पुन्हा त्या उत्पादनांना असणारं एक वलय. यामुळे एकूणच हा ब्रँड म्हणजे काहीतरी जादुई आहे असाच एक सर्वसामान्य समज असतो. पण नेमकं खरं आहे तरी काय. असं काय आहे या ब्रँडमध्ये ज्यामुळे जगात सर्वाधिक फोनधारकांच्या खिशातून ह्याचाच लोगो झळकत असतो. आयफोन, आयपॅड, मॅकबुक, मॅकिन्टॉश किंवा अ‍ॅपल टीव्हीसारखी उत्पादनं सर्वोत्तम आहेत असा दावा करायचा हा प्रयत्न नाही. पण या ब्रँडचं वेगळेपण नेमकं आहे तरी कशात हे जाणून घ्यायचा हा एक प्रयत्न.

सर्वात प्रथम अ‍ॅपल ही कंपनी दोन्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तयार करते. याचा अर्थ आयफोन हा पूर्णत: अ‍ॅपलकडूनच तयार केला जातो. फोनमध्ये असणारी ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याला सुसंगत असे हार्डवेअर्स हे दोन्ही मूलभूत घटक एकाच कंपनीकडून तयार केले जातात. इतर स्मार्टफोन्सच्या बाबतीत मात्र हार्डवेअर एका कंपनीचे तर सॉफ्टवेअर दुसऱ्या कंपनीचे असते. अर्थात तेही सुसंगतच असतं. पण अ‍ॅपल मात्र या दोन्हीवर बारकाईने लक्ष ठेवून असतं. त्यामुळेच सीपीयू असो की मेमरी, हार्डवेअरचा पुरेपूर आणि यथायोग्य वापर करण्याची क्षमता असणारं सॉफ्टवेअर अ‍ॅपल बनवू शकतं.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Boyfriend commits burglary to impress girlfriend with expensive iPhone gift
नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते! अल्पवयीन प्रेयसीचा आयफोनसाठी हट्ट; प्रियकराने…

आयफोनचं हार्डवेअर हे इतर स्मार्टफोन्सपेक्षा खूपच वेगळं आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक बॅटरी लाइफ असणारा स्मार्टफोन म्हणून आयफोनचंच नाव आहे. काही वर्षांपूर्वी आयफोनची स्क्रीनसाइज लहान होती म्हणून त्याची बॅटरी लाइफ जास्त आहे अशाही चर्चा होत्या. पण आयफोन६ आल्यानंतरही बॅटरीलाइफमध्ये फरक आलेला नाही.

अ‍ॅपलची उत्पादनं आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, खास करून स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स यांच्या स्क्रीन-डिस्प्लेमध्ये अनेकदा फरक दिसतो. याचं कारण म्हणजे पिक्सेल्सची असणारी घनता. त्यामुळेच स्पष्टता आणि जबरदस्त शार्प रिझॉल्यूशन हा अ‍ॅपलचा प्लस पॉइंट ठरतो.

दुसरी गोष्ट म्हणजे अ‍ॅप्लिकेशन्स. अ‍ॅपस्टोअरमध्ये असणारी अ‍ॅप्स ही एकाच प्रकारच्या कोडमध्ये कॉमन बेस वापरून तयार केलेली असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ‍ॅपस्टोअरवर असणारं प्रत्येक अ‍ॅप हे अ‍ॅपलकडून काळजीपूर्वक तपासलं जातं. कुठल्याही अ‍ॅपचं बीटा व्हर्जन स्टोअरवर आणण्यास परवानगी नसते. त्याशिवाय व्हायरस किंवा असुरक्षित आणि बेकायदा अ‍ॅप्स स्टोअरवर येणार नाहीत याकडेही अ‍ॅपलचं बारकाईने लक्ष असतं.

आणखी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती ही की अ‍ॅपलची स्मार्टडिव्हाइसमध्ये तीनच उत्पादनं आहेत. फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप. त्यामुळे त्यावर चालणारी अ‍ॅप्स ही त्या त्या कॉन्फिगरेशननुसार बनवली जातात. त्यामुळे एक अ‍ॅप हे आयफोन या एकाच स्मार्टफोनसाठी बनलं जातं. आणि म्हणूनच ती सहजरीत्या चालतात. अँड्रॉइड हे फ्रीवेअर आहे. त्यामुळे फोन बनवणारे त्यामध्ये ब्लोटवेअर अ‍ॅड करतात. ब्लोटवेअर म्हणजे खरंतर अनुपयुक्त सॉफ्टवेअरच. पण नेमक्या याच ब्लोटवेअरमुळे इतर स्मार्टफोन्स हँग होतात. तर आयफोन हँग होण्याचं प्रमाण फारच कमी असतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. अ‍ॅपलची आयओएस ही फक्त एकाच डिव्हाइसपुरती तयार करण्यात आलेली आहे. ते म्हणजे आयफोन. तर अँड्रॉइड ही बहुतांश सर्वत प्रकारच्या स्मार्टफोन्ससाठी तयार केलेली आहे. आयओएस आणि अँड्रॉइडमध्ये अनेक साम्ये असली तर एक महत्त्वाचा फरक आहे. आयओएस ही ऑपरेटिंग सिस्टम हॅक करता येणं शक्य असलं तरी त्यामध्ये फारसे बदल करता येत नाहीत. कोड जरी उपलब्ध झाला तरी त्याच्या गाभ्याला धक्का लावता येत नाही. त्यामुळे व्हायरस असो की हॅकर, त्याला पूर्णत: आयफोनचा ताबा घेता येत नाही. अँड्रॉइड हे वर म्हटल्याप्रमाणे फ्रीवेअर असल्यामुळे ते हॅक करता येतं. तसंच त्याच्या प्रोग्रामिंग आणि सिस्टममध्ये हवे तसे बदल करता येतात. हा म्हटला तर अँड्रॉइडचा प्लस पॉइंट आहे. कारण कोडिंग आणि ऑपरेटिंग सिस्टमची माहिती असणारा एखादा त्याला हवे

तसे बदल करून स्मार्टफोनची उपयुक्तता वाढवू शकतो.

अ‍ॅपल हे अँड्रॉइडपेक्षा उजवं आहे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम्स आणि पर्यायाने सर्वच ब्रँड्स हे आपापल्या परीने वेगळे आहेत. पण या सगळ्यात वेगळेपण जपण्यात सातत्य राखण्यात अ‍ॅपल एवढा यशस्वी ब्रँड नाही.

पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com

Story img Loader