जावा, पायथॉन, पीएचपी यारख्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज, रदछ, ऌळटछ, खअश्अ रउफकढळ एसक्यूएल, एचटीएमएल, जावा स्क्रिप्ट या स्क्रिफ्िंटग लँग्वेजेस तसेच कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स शिकण्यासाठी आपण पुस्तके, वेबसाइटस, कोर्सेस शिकवणाऱ्या संस्था अशा विविध माध्यमांचा उपयोग करत असतो. मात्र या भाषा शिकल्यावर त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यातील वेगवेगळ्या सिंटॅक्सचा वापर करून त्यांचा सराव करणे आवश्यक असते. सोलो लर्न(Solo learn) या अॅपच्या माध्यमातून जावा, पायथॉन, पीएचपी, एसक्यूएल, एचटीएमएल, जावा स्क्रिप्ट, एक्सेल इत्यादी शिकता येणार आहे. या प्रत्येकासाठी अँड्रॉइडवर सोलो लर्नने स्वतंत्र अॅप तयार केले आहे. त्यामुळे ज्या लँग्वेजबद्दल जाणून घ्यायचे असेल ते अप डाऊनलोड करून घेता येते. प्रत्येक अॅपचा सर्वसाधारण साचा सारखाच आहे.
उदाहरणच द्यायचे झाल्यास, एसक्यूएल या अॅपमध्ये त्या लँग्वेजची ओळख करून दिलेली आहे. प्रत्येक संकल्पनेसाठी छोटे छोटे प्राथमिक पाठ तयार केलेले आहेत. पाठातील संकल्पना अतिशय सोप्या भाषेत उदाहरणे घेऊन समजावून सांगितलेली आहेत. त्याचे व्हिडीओदेखील दिलेले आहेत. संगणकाची भाषा एकटय़ाने शिकताना मुद्दय़ाचे आकलन व्यवस्थित झाले आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी आपल्यावरच असते. त्यासाठी या अॅपमध्ये प्रत्येक संकल्पनेवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. त्यात बहुपर्यायी प्रश्न, गाळलेल्या जागा भरा (ज्यामध्ये योग्य उत्तर टाइप करायचे असते किंवा अनेक पर्यायातून योग्य पर्याय योग्य जागी ड्रॅग करायचा असतो. तसेच सिंटॅक्सनुसार योग्य क्रम लावणे इत्यादी.
जावा, पायथॉनच्या अॅप्समध्ये दिलेला कोड कार्यान्वित केल्यावर काय आऊटपुट मिळेल, असे प्रश्नदेखील विचारले आहेत. प्रत्येक अॅपमध्ये काही पाठांचा मिळून एक संच (मॉडय़ुल) असे काही संच तयार केलेले आहेत. जसे पाठ सोडवत जाल तसे पुढील पाठ अनलॉक होत जातात. सर्व पाठ पूर्ण झाल्यावर संपूर्ण विषयावर आधारित एक प्रश्नमंजूषा ठेवण्यात आलेली आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास त्याचे उत्तर दिले जाते किंवा तो प्रश्न सोडवण्यासाठी सूचक माहिती दिली जाते. प्रश्नमंजूषा सोडवल्यावर एक प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात येते.
हे अॅप वापरण्यासाठी तुम्हाला येथे स्वत:चे अकाउंट तयार करणे आवश्यक आहे. फेसबुक, गुगल किंवा ट्वीटर अकाउंटच्या सहाय्याने तुम्ही लॉगिन करू शकता. हेच कोर्सेस तुम्ही कॉम्प्युटरवर www.sololearn.com या साइटच्या माध्यमातूनदेखील घेऊ शकता. आजच्या जगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सोलो लर्नसारखी सेल्फ स्टडी अॅप्स लोकांना नक्कीच आवडतील.
manaliranade84@gmail.com