डिसेंबर महिना हा पर्यटनाचा महिना मानला जातो. जगभरातील सर्वाधिक पर्यटन याच हंगामात होते. तुमचेही वर्षांअखेरीचे पर्यटन नियोजन झाले असेलच. त्या वेळेस सेल्फी काढणे किंवा पर्यटनस्थळावरील प्रेक्षणीय स्थळांचे छायाचित्र काढणे याचेही नियोजन मनात झालेले असेलच. पण अनेकदा ते साठवण्याची क्षमता पुरतेच असे नाही. यासाठी अनेक अॅप्स आणि संकेतस्थळं उपलब्ध आहेत. मात्र त्या सर्वामध्ये काही ना काही मर्यादा आहेत. या सर्व मर्यादा दूर करून गुगलने फोटो साठवण्यासाठी ‘गुगल फोटो’ सुविधा आणली आहे. गुगल फोटोमध्ये काय आहे याचबरोबर इतरही फोटो साठवण्याची सुविधा असलेल्या संकेतस्थळांबद्दल माहिती घेऊयात.
गुगल फोटो
मागच्या आठवडय़ातच गुगलने गुगल फोटो ही सुविधा सुरू केली. यापूर्वी गुगल प्लसवर जाऊन तुम्ही फोटो शेअर आणि स्टोअर दोन्ही करू शकत होता. आता ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला गुगल प्लसची गरज भासणार नाही. गुगलने समाज माध्यमात उडी मारल्यानंतर त्यांच्या गुगल प्लस सुविधेचा तसा बोलबाला झाला नाही. मात्र फोटो शेअरिंगसाठी मात्र गुगलप्लस फेसबुकपेक्षाही लोकप्रिय ठरत होतं.
गुगल फोटो या सुविधेची काही ठळक वैशिष्टय़े पाहुयात
* या सुविधेत तुम्ही अगणित फोटोंची साठवण करून ठेवू शकता. यामध्ये फोटोंबरोबरच व्हिडीओही साठवता येतात. ही सेवा पूर्णत: मोफत उपलब्ध आहे. यामुळे ही सेवा अधिक सरस ठरते. हे सर्व फोटो क्लाऊडमध्ये साठविले जात असल्यामुळे तुमच्या लोकल ड्राइव्हमधील जागा मोकळी होऊ शकते.
* फोटो स्टोअर करण्यासाठी आकार तसेच रिझोल्यूशनची देण्यात आलेली मर्यादाही इतर कोणत्याही सुविधेपेक्षा खूप जास्त असून ती १६ मेगापिक्सेल इतकी आहे. तसेच १०८० पिक्सेलपर्यंतचा व्हिडीओ आपण यामध्ये साठवू शकतो. तसेच जर आपण १६ मेगापिक्सेलपेक्षा कमी क्षमतेचा फोटो स्टोअर केला तरी गुगल त्यांच्याकडील सुविधेचा वापर करून सर्व फोटो एकाच दर्जाचे दिसतील असा पर्याय देते. यामुळे व्यावसायिक छायाचित्रकारांव्यतिरिक्त इतरांना ही सुविधा खूप उपयुक्त ठरू शकते.
* जर तुम्हाला जास्त रिझोल्यूशनचे फोटो शेअर करावयाचे असतील तर तुम्हाला दरमाह अंदाजे ६५० रुपये देऊन एक टीबीपर्यंतची साठवणूक जागा मिळविता येऊ शकते.
* गुगल ड्राइव्ह हे अॅण्ड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध असल्यामुळे तुम्ही मोबाइलमधूनही गुगल फोटो स्टोअर करू शकता. त्याचबरोबर गुगल फोटोचा बॅकअपही घेऊ शकता. पण विण्डोज आणि मॅक ऑपरेटिंग प्रणाली वापरणाऱ्यांना संकेतस्थळाच्या माध्यमातूनच ऑपरेटिंग करावे लागणार आहे.
* गुगल फोटोमध्ये आपण ज्या वेळेस ग्रुप फोटो साठवतो किंवा शेअर करतो त्या वेळेस आपल्याला टॅगिंग वगैरे करावयाची गरज भासणार नाही. तुमच्या ग्रुपमधील ज्यांचे गुगल अकाऊंट आहे आणि ज्यांनी गुगलवर त्यांचा फोटो ठेवला आहे त्यांना गुगल स्वत:हून ओळखते. मग तो फोटो अगदी लहानपणीचा असो किंवा आत्ताचा असो. गुगल त्याला शोधून काढते. इतकेच नव्हे तर फोटोमधील ठिकाणही गुगल स्वत:हून सांगते.
* जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिनमध्ये सर्चचा पर्याय नसणार असे होणारच नाही. तुमच्या फोटोमध्ये जर तुम्ही सायकलवर असाल तर तुम्ही ‘सायकल’ असा सर्च पर्याय द्याल तर सायकलवरचे सर्व फोटो तुम्हाला उपलब्ध होतील.
* गुगल फोटोमध्ये अंतर्गत फोटो एडिटर देण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्ही फोटोला विविध प्रकारे एडिट करू शकता. जर एडिटिंग करताना तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा भीती वाटत असेल तर यामध्ये ऑटो फिक्स नावाचा पर्यायही देण्यात आला आहे. ज्याचा वापर करून तुमचा फोटो आपोआप चांगला होतो.
* याशिवाय यामध्ये तुम्ही विविध फोटोंचे कोलाज, पॅनोरमाज, अॅनिमेशन वगैरेही करू शकता.
* ज्यांच्याकडे गुगल फोटो नाही त्यांनाही तुम्ही फोटो शेअर करू शकता.
* अॅपलही अशा प्रकारे सुविधा देते, मात्र त्या सुविधा केवळ तुम्ही अॅपलच्या उपकरणांवरच वापरू शकता. याशिवाय फ्लिकर एक टीबीपर्यंतची साठवणूक क्षमता मोफत देते. तर अॅमेझॉन फक्त फोटोंसाठी साठवणूक देते, त्यांच्या सुविधेत तुम्ही व्हिडीओ साठवू शकणार नाहीत.
५०० पिक्सेल
व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी ही सुविधा एकदम उपयुक्त ठरते. यामध्ये असलेल्या विविध पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमचा फोटो अधिक चांगल्या प्रकारे एडिट करू शकता. यामध्ये तुम्ही एखादी संकल्पना घेऊन छायाचित्र ठेवू शकता किंवा एखाद्या कथेचा आधार घेऊन छायाचित्र देऊ शकता. मात्र ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला मर्यादा आहेत. यामध्ये आठवडय़ाला आपण केवळ २० छायाचित्रच अपलोड करू शकतो. यापेक्षा जास्त छायाचित्र अपलोड करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्ही छायाचित्र विकूही शकता.
अॅपल आयक्लाऊड
अॅपलची आयक्लाऊड ही सुविधा मॅक आणि आयओएस उपकरणांपुरतीच मर्यादित आहे. यामध्ये आयफोटो नावाची सुविधा आहे. ज्यामध्ये तुम्ही पाच जीबीपर्यंतचे फोटो मोफत साठवू शकता. या सुविधेमध्ये तुम्हाला कार्ड, कॅलेंडर आणि फोटो अल्बम बनविणे शक्य होते. याची मर्यादा ही २० पानांपर्यंतच आहे. तसेच यामध्ये तुम्हाला फोटो एडिटिंगसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. यामुळे तुम्ही फोटो एडिटिंगही करू शकता.
फोटोबकेट
फोटोबकेटच्या मोफत सुविधेमध्ये तुम्हाला दोन जीबीपर्यंतची साठवणूक जागा मोफत मिळते. यामुळे कित्येक हजार फोटोंसाठी ही जागा पुरते. पण हे संकेतस्थळ वापरत असताना तुम्हाला जाहिरातींचा त्रास सहन करावा लागतो. जर तुम्हाला जाहिराती नको असतील तर वार्षिक पैसे भरून तुम्ही १० जीबीपर्यंतची साठवणूक जागेसह जाहिरातींपासून सुटका मिळवू शकता. हे संकेतस्थळही वापरण्यास अगदी सोपे असून यात अनेक वेगवेगळ्या टूल्सचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच तुम्ही विविध रंगांचाही वापर करू शकता. तुम्ही एकदा फोटो एडिट केला की तुम्ही तो अल्बम किंवा स्टोरीजमध्ये कन्व्हर्ट करून वापरू शकता.
फ्लिकर
गुगल फोटोच्या तोडीस तोड कदाचित त्यापेक्षा जास्त फोटो साठवणूक सुविधा देणारे संकेतस्थळ म्हणजे http://www.flickr.com या संकेतस्थळावर. यामध्ये तुम्हाला एक टीबीपर्यंतची साठवूणक क्षमता मोफत मिळते. पण यामध्ये तुम्ही संकेतस्थळ वापरत असताना जाहिराती प्रसिद्ध होणार. या जाहिराती नको असतील तर तुम्हाला दरवर्षांला काही रक्कम भरावी लागते. या संकेतस्थळावरही फोटो एडिटिंगच्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच तुम्ही मित्रांना फोटो टॅगही करू शकणार आहात. तसेच यातील ड्रॅग अॅण्ड ड्रॉप प्रणालीमुळे तुम्ही अल्बम्सही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. तसेच तुम्ही पैसे भरून २० पानी फोटो अल्बमही बनवून घेऊ शकता. यामुळे गुगल फोटो आले तरी फ्लिकरसारखे पर्याय आणि साठवणूक क्षमता त्यात नसल्यामुळे फ्लिकरही छायाचित्रकारांची पहिली पसंती असणार आहे.
नीरज पंडित niraj.pandit@expressindia.com