सभोवताली दिसणाऱ्या गोष्टी किंवा पुस्तकातील चित्र दाखवून आणि त्यांच्याशी संवाद साधून आपण लहान मुलांना नवनवीन शब्दांची ओळख करून देत असतो. खरे तर ही प्रक्रिया सततच चालू असते. शब्दांची स्पेलिंग पाठ करणे, लक्षात राहण्यासाठी त्याचा सराव करणे इत्यादीसाठी मुले कधी कधी कंटाळतात किंवा टाळाटाळही करतात. पण हळूहळू मुलं ते शब्द आत्मसात करून त्या शब्दांचा उपयोग बोलताना आणि लिहिताना करू लागतात.

खेळांच्या माध्यमातून अभ्यास करायला मुलांना नक्कीच आवडतो. शिवाय तो चांगला लक्षातही राहतो. वर्ड्स क्रश (Words crush) आणि वर्ड सर्च (Word Search) हे खेळ तशाच प्रकारातील म्हणता येतील.

Bit Mango बिट मँगोच्या वर्ड्स क्रश : हिडन वर्ड्स! (https://play.google.com/store/ apps/details?id=com.bitmango.wordscrush&hl=en ) या अ‍ॅपमधे अगदी सोप्यापासून अतिशय अवघड शब्द वेगवेगळ्या पाच भागांत विभागले आहेत. अंदाजे १२०० हून अधिक कोडी येथे उपलब्ध आहेत. यामध्ये दोन बाय दोन, तीन बाय तीन, चार बाय चार अशा चौकटींमध्ये इंग्रजी अक्षरांच्या टाइल्स दिसतात. उदाहरणार्थ तीन बाय तीनच्या चौकटीत ९ अक्षरे आपण बघू शकतो. दिलेल्या सर्व अक्षरांचा उपयोग करणे आवश्यक असते. काही कोडय़ांत सर्व अक्षरांचा उपयोग करून एकच शब्द बनवायचा असतो. तर काहींमधे दोन शब्द बनवायचे असतात. तुम्ही बनवलेला शब्द त्यांच्या उत्तराशी जुळत असेल तर त्या टाइल्स दिसेनाशा होतात. टाइल्स निवडण्यासाठी तुम्हाला स्पेलिंगप्रमाणे टाइल्सवर बोट फिरवावे लागते. तुम्ही उभे, आडवे, तिरपे, वरून खाली, खालून वर अशा पद्धतीने टाइल निवडू शकता.

इ्र३ टंल्लॠ बिट मँगोच्याच वर्ड्स क्रश : हिडन थीम्स! (https://play.google.com/store/apps/details?id=com.bitmango.go.wordscrushthemes&hl=en ) या अ‍ॅपमध्ये वेगवेगळ्या विषयांशी संबंधित असलेले शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. यामध्ये प्राणी, घरात आढळणाऱ्या गोष्टी, हवामान, वाहतूक असे २०० हून अधिक विषय हाताळले आहेत.

अशाच प्रकारातील शब्दसंग्रहाबरोबरच एकाग्रता वाढवणारा खेळ म्हणजे वर्ड सर्च.(https://play.google.com/store/apps/details?id=com.asgardsoft.words&hl=en )  या अ‍ॅपमध्ये असंख्य पझल्सचा समावेश आहे. प्रत्येक पझलमधे २५ शब्द शोधायला दिले जातात. हे शब्द कुठल्याही एका विषयाशी संबंधित असतील असे नाही. तुम्ही उभे, आडवे, तिरपे, अशा प्रकारे शब्द निवडू शकता. जसजसे तुम्ही सूचीतील शब्द निवडता ते शब्द सूचीतून काढून टाकले जातात. हा खेळ टायमर लावून किंवा न लावता दोन्ही पद्धतीने खेळता येऊ  शकतो.

अशा प्रकारचे गेम्स मुलांचे शब्दभांडार आणि एकाग्रता नक्कीच वाढवतील. तर मग खेळून बघा आणि आनंद घ्या.

मनाली रानडे manaliranade84@gmail.com

Story img Loader