सध्या देशभरात ‘मेक इन इंडिया’चा नारा बुलंद झाला आहे. पण प्रत्यक्षात यापूर्वीच भारतात विकसित झालेल्या अनेक प्रणालींचा विसर पडला की काय, असा प्रश्न पडत आहे. संगणक ऑपरेटिंग प्रणालीत ‘दादा’ समजल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या विण्डोज या ऑपरेटिंग प्रणालीच्या तोडीस तोड स्वदेशी बनावटीची ‘भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्यूशन्स’ (बॉस) नावाची ऑपरेटिंग प्रणाली आजपासून सुमारे दहा वर्षांपूर्वी विकसित करण्यात आली आहे. मात्र धनाढय़ शक्तीमुळे ही प्रणाली सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकली नाही, असा संशय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. पाहूयात काय आहे ही बॉस प्रणाली आणि ती आपण कशी वापरू शकतो.

काय आहे ऑपरेटिंग प्रणाली?
एखादा संगणक वापरण्यासाठी हार्डवेअरनंतर सर्वात महत्त्वाचे असते ती त्याची ऑपरेटिंग प्रणाली. सध्या या क्षेत्रात विण्डोज ही सर्वाधिक वापर असलेली ऑपरेटिंग प्रणाली मानली जाते. ही ऑपरेटिंग प्रणाली अधिकृतपणे वापरण्यासाठी कंपनीला काही पैसे द्यावे लागतात. तसेच मायक्रोसॉफ्ट ऑफिसपासून विविध सॉफ्टवेअर्स अधिकृतपणे वापरण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. अर्थात आपल्याकडे अधिकृतपेक्षा अनधिकृत वापर जास्त असल्यामुळे त्याची झळ सामान्यांना घरी संगणक वापरताना थेट बसत नसली तरी सरकारपासून कंपन्यांना संगणकात कंपनीची ऑपरेटिंग प्रणाली वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतात. याला पर्याय म्हणून लिनक्सचा जन्म झाला. पुढे उबण्टूही संगणक विश्वात अवतरली. पण त्याचा वापर किचकट असल्यामुळे तसे म्हणण्यापेक्षा आपल्याला विण्डोजच्या वापराची सवय असल्यामुळे तो वापर सामान्यांना सोयीचा ठरत नाही. मग या लिनक्स ऑपरेटिंग प्रणालीमध्ये बदल करून भारतातील सीडॅक या संस्थेतर्फे ‘बॉस’ची निर्मिती करण्यात आली. यामध्ये सामान्यांना वापरता येईल अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्याचा वापर सरकारी तसेच शैक्षणिक पातळीवर व्हावा, असा सरकारचा विचार आहे. मात्र तो फारसा यशस्वी होताना दिसत नाही.

Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Bigg Boss 18 Kim Kardashian, Kylie Jenner and Kendall Jenner have been approached for salman Khan show
Bigg Boss 18: अनंत अंबानीच्या लग्नानंतर जगप्रसिद्ध कार्दशियन बहिणी पुन्हा येणार भारतात, सलमान खानच्या शोमध्ये होणार सहभागी?
sapna choudhary baby name
Bigg Boss फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, बाळाच्या नामकरण सोहळ्याला ३० हजार लोकांची उपस्थिती
"Worked Overtime": Gen Z Employee's Excuse For Coming Late The Next Day Boss and employee chat viral on social media
PHOTO: “मी उद्या उशीराच येणार…” कर्मचाऱ्यानं बॉसला मेसेज करत थेटच सांगितलं; चॅट वाचून नेटकरी म्हणाले “बरोबर केलं जशास तसं”
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar New Time God of the House
Bigg Boss 18: विवियन डिसेनानंतर ‘टाइम गॉड’ झाली मराठी अभिनेत्री? आता ‘बिग बॉस १८’च्या घराची जबाबदारी तिच्या हातात

ऑफिस
वर्ड, एक्सल, पॉवरपॉइंट अशा कार्यालयीन संबंधित कामकाजासाठी आपण विण्डोजवर एमएस ऑफिस वापरतो. याला पर्याय म्हणून या ऑपरेटिंग प्रणालीवर लिब्रे ऑफिसचा वापर करण्यात येतो. हे सॉफ्टवेअरही एमएस ऑफिसच्या तोडीस तोड असून त्यामध्येही आपल्याला ऑफिसमध्ये उपलब्ध असलेले सर्व पर्याय देण्यात आले आहेत. ऑफिसही पूर्णपणे मोफत असल्यामुळे त्यासाठी वेगळे पैसे मोजण्याची गरज भासत नाही. ते पूर्णत: मोफत उपलब्ध आहेत. याशिवाय विण्डोजमध्ये उपलब्ध असलेले अनेक फाँट्सही यामध्ये उपलब्ध आहेत.

फोटोशॉप
अनेकदा घरांमध्येही फोटोशॉपचा वापर केला जातो. यासाठी अडोबेचे फोटोशॉप वापरले जाते. या ऑपरेटिंग प्रणालीसाठी ‘जिम्प’ नावाचे सॉफ्टवेअर आहे. ज्याचा वापर करून आपण फोटो एडिटिंगपासून ते फोटो इफेक्ट्सपर्यंत अनेक गोष्टी करू शकतो.

वेब ब्राऊझर
या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये इंटरनेट एक्स्प्लोरर हे ब्राऊझर उपलब्ध नसले तरी सध्या सर्वाना वापरासाठी खुले असलेले क्रोम आणि मॉझिलासारखे ब्राऊझर्स आपण वापरू शकतो. यामुळे इंटरनेट वापरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. ई-मेल पाठवणे, ई-मेल वाचणे आदी कोणत्याही बाबतीत अडचणी यात जाणवत नसल्याचे ओक यांनी स्पष्ट केले.

मनोरंजन
यामध्ये मनोरंजनासाठी विण्डोज मीडिया प्लेअर उपलब्ध नसला तरी व्हीएलसी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच यामध्ये गेम्सही देण्यात आले आहे.

एज्युबॉस

शाळांमध्ये संगणक शिक्षण सुलभ व सोपे व्हावे या उद्देशाने सीडॅकने ऑपरेटिंग प्रणालीबरोबरच एज्युबॉस ही प्रणालीही विकसित केली. ज्यामध्ये भारतीय शाळांमध्ये उपयुक्त अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. विविध विषयांना वाहिलेल्या गोष्टी या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. यामुळे एखाद्या शाळेत ही प्रणाली डाऊनलोड केली तर त्यासोबत शिक्षणास उपयुक्त गोष्टीही मिळतील. त्या गोष्टी इतर कंपन्यांकडून विकत घेऊन त्याचा वापर करण्यापेक्षा हा पर्याय शाळांसाठी केव्हाही उपयुक्त ठरू शकतो.

स्वत:चे सॉफ्टवेअर
ही प्रणाली मुक्त व्यासपीठावर आधारित असल्यामुळे यावर आपण आपल्याला उपयुक्त सॉफ्टवेअर्स विकसित करून ते सहज वापरू शकतो. प्रा. ओक यांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यासाठी ‘बॉसरिझल्ट’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. ज्याचा वापर करून ते संपूर्ण निकालाची नोंद ठेवणार आहेत. त्यांच्या या प्रयोगाला मुंबईतील के. सी. महाविद्यालय आणि विवेक कनिष्ठ महाविद्यालयाने समर्थन दर्शवत तेथील निकालही या प्रणालीद्वारे नोंदविण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबतच्या माहितीसाठी bossresult@gmail.com वर मिळू शकते.

फायदे-तोटे
ही संगणक प्रणाली वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या विण्डोजसारखीच आहे. गेले वर्षभर मी ही प्रणाली वापरत असून मला एकदाही मी विण्डोजचा वापर का सोडला, असा प्रश्न पडला नाही, असे मत ही संगणक प्रणाली वापरणारे व तो वापरण्याचा आग्रह धरणारे एस.आई.डब्लू.एस. महाविद्यालयाचे प्राध्यापक मिलिंद ओक यांनी सांगितले. ही संगणक प्रणाली नवीन असल्यामुळे ती वापरण्यास सुरुवातीला काहीशी अडचण जाणवते. या ऑपरेटिंग प्रणालीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ही प्रणाली व्हायरस मुक्त आहे. यामुळे ती वापरताना अ‍ॅण्टिव्हायरस वापरण्याची गरत भासत नाही. ही प्रणाली भारतीय बनावटींची असून ती सध्या इंग्रजीत आणि २० भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे अगदी ग्रामीण भागातील संगणक निरक्षर व्यक्तीला तो वापरणे सोपे जाईल. याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही प्रणाली सरकारतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे सर्वाना संगणक शिक्षण द्यायचे असेल तर ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते. तसा काहीसा प्रयत्न सरकारने यापूर्वी केला होता, मात्र धनाढय़ शक्तीने तो हाणून पाडला असावा असा कयास बांधला जात आहे. ही प्रणाली विण्डोजला पर्याय ठरू शकत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र यातील त्रुटी दाखवण्यासाठीच्या चर्चाही घडविल्या जात नसल्याची खंत ओक यांनी बोलून दाखविली.

ऑपरेटिंग प्रणाली कुठे उपलब्ध?
ही ऑपरेटिंग प्रणाली २००७मध्ये अधिकृतपणे बाजारात दाखल करण्यात आली. त्यानंतर त्याच्या आत्तापर्यंत सहा आवृत्या बाजारात आल्या आहेत. ती https://www.bosslinux.in/ या संकेतस्थळावर डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहे. याचबरोबर तुम्ही संकेतस्थळावर विनंती करून तुमच्या घरच्या पत्त्यावर सीडीही मागवू शकता. ही सीडी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहनही त्यांनी केले आहे. या ऑपरेटिंग प्रणालीवर बहुतांश मुक्त सॉफ्टवेटर्स वापरता येणे शक्य आहे.
नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com