सुरुवातीला लॅपटॉपने नंतर खिशातल्या टॅबलेटने आणि आता तर मोबाइलने संगणक बाजार पुरता गिळंकृत केला आहे. पण छोटय़ा स्क्रीनवर काम करण्यापेक्षा मोठय़ा स्क्रीनवर काम करण्याचा नवा प्रवाह पुन्हा दिसू लागला आहे. ही काळाची गरज लक्षात घेऊन आयबॉल, एसर, इंटेल, मायक्रोसॉफ्टने सारख्या कंपन्यांनी एकमेकांच्या सहकार्याने खिशातल्या संगणक स्टिकची निर्मिती केली. यामध्ये एक डोंगल देण्यात आले आहे जे आपल्या संगणकाचा सीपीयू म्हणून काम पाहणार आहे. पाहू या काय आहे हे नवीन गॅजेट आणि त्याची उपयुक्तता.
काही महिन्यांपूर्वी इंटेलने संगणक स्टिक बाजारात आणली आणि संगणक आपल्या खिशात नेऊन ठेवला. याच पावलावर पाऊल टाकत अनेक कंपन्यांनी एकत्र येऊन एक संगणक स्टिक बाजारात आणली आहे. हे उपकरण आपल्या टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला जोडले की, आपल्या टीव्हीचे संगणकात रूपांतर होते. इंटेलची स्टिक ही भारतीय वापरकर्त्यांची मानसिकता लक्षात ठेवून बनविण्यात आली नसून ती एक प्रयोग म्हणून बनविण्यात आली होती, पण कालांतराने अनेक कंपन्यांनी या उत्पादनात उडी घेत वापरकर्त्यांना उपयुक्त अशा स्टिक्स बाजारात आणल्या. या स्टिकचा आकार पेन ड्राइव्हपेक्षा थोडा मोठा असतो. याच्याबरोबर आपल्याला की-बोर्ड आणि माऊसही दिला जातो.
काय आहे ही स्टिक?
खरे तर या स्टिकला नवतंत्रज्ञानातील जादूची काठी म्हटले तरी हरकत नाही. ही स्टिक आपण जर आपल्या टीव्हीतील एचडीएमआय पोर्टला जोडली आणि टीव्हीच्या सेटिंग्जमध्ये जाऊन एचडीएमआय डिव्हाइस निवडल्यावर तुमचा टीव्ही संगणकाच्या मॉनिटरमध्ये बदलून जाईल. ही स्टिक म्हणजे संगणकाच्या सीपीयूचे छोटेखानी रूप आहे. यामध्ये संगणक चालण्यासाठी आवश्यक ऑपरेटिंग प्रणाली आणि उपयुक्त सॉफ्टवेअर्स देण्यात आले आहेत. यामध्ये आपण आपला डेटा साठवून कोणत्याही ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. टीव्ही किंवा एचडीएमआय पोर्ट असलेल्या कोणत्याही स्क्रीनसह उपलब्ध उपकरणाला ही स्टिक जोडून त्याद्वारे आपल्या संगणकातील फाइल वापरू शकतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अशा स्टिक्स विषयी जाणून घेऊ या.
एसर अॅस्पायर पीसी स्टिक
एसर या लॅपटॉप बनविणाऱ्या कंपनीने नुकतीच आपली एसर अॅस्पायर पीसी स्टिक बाजारात आणली आहे. एसर या कंपनीने बाजारात आणलेल्या या स्टिकमध्ये इंटेलचा अॅटोम झेड३७३५एफ हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यात आपल्याला विंडोज १० होम ही ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे. यात अंतर्गत साठवणूकक्षमता दोन जीबीची आहे तर या स्टिकमध्ये ३२ जीबीपर्यंतची साठवणूकक्षमता देण्यात आली आहे. याचबरोबर स्टिकमध्ये देण्यात आलेल्या मेमरी कार्डच्या स्लॉटमध्ये आपण १२८ जीबीपर्यंतची माहिती साठवून ठेवू शकतो. याचा डिस्प्ले इंटरफेस हा एचडीएमआयचा आहे. याला आपण वायफायच्या मदतीने इंटरनेट जोडणी करू शकतो. याचबरोबर या उपकरणाला ब्लूटय़ूथ जोडणी असून त्याद्वारे माहितीची देवाण-घेवाणही शक्य होणार आहे. या स्टिकवर एक यूएसबी स्लॉटही देण्यात आला आहे. यामुळे याचा वापर करून आपण स्टिकला पेन ड्राइव्हही जोडू शकतो.
किंमत – ७,१५५ रुपये.
असूस क्रोमबीट
आपण गुगलवर अॅण्ड्रॉइड डोंगल असे सर्च केले तर अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली असलेल्या डोंगल्सचे शेकडो पर्याय तुम्हाला समोर दिसतात. यामुळे तुमचा जुना टीव्हीही अगदी स्मार्ट होऊ शकतो. पण गुगलचीच दुसरी संगणकीय ऑपरेटिंग प्रणाली म्हणजे क्रोमसाठी गुगलने असूसच्या मदतीने क्रोमबीट बाजारात आणले आहे. क्रोमबुक फिल्पच्या आधारावर आपण क्रोमबीटच्या हार्डवेअरचा विचार करू शकतो. यामध्ये क्वाडकोर रॉकचिप आरके३२८८-सीचा चीपसेट बसविण्यात आला आहे. याचबरोबर यामध्ये दोन जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये माली टी७६० जीपीयू आणि १६ जीबीअंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आलेली आहे. हे क्रोमबीट वापरण्यासाठी आपल्याला एचडीएमआय पोर्टची जोडणी देण्यात आली आहे. क्रोमबीट म्हणजे इतर पोर्टेबल डोंगल्सपेक्षा लहान आणि बारीक आहे.
किंमत : ७९९९ रुपये.
आयबॉल स्टिक
आयबॉल आणि मायक्रोसॉफ्टने एकत्र येऊन एक संगणक स्टिक बाजारात आणली आहे. ‘स्प्लेन्डो पीसी-ऑन-स्टिक’ असे या उपकरणाचे नाव असून हे उपकरण आपल्या टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला जोडले की आपल्या टीव्हीचे संगणकात रूपांतर होते. टीव्ही, मॉनिटर किंवा प्रोजेक्टरच्या एचडीएमआय पोर्टमध्ये ही स्टिक तुम्ही जोडली की पॉवर ऑन केल्यावर तुमची स्टिकी सुरू होते. यामध्ये विंडोज ८.१ ही ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे. याची जोडणी पूर्ण झाली की मग ताबडतोब आपल्याला संगणकासारखी स्क्रीन तेथे दिसते. हे एकदा जोडले की अगदी वाय-फाय जोडणीपासून आपण कोणतीही गोष्ट येथे करू शकतो. यामध्ये एक मोठी अडचण येते की, आपण कोणतीही विंडो सुरू केली की, यामध्ये १९२० गुणिले १०८० रिझाल्युशनचे आऊटपूट येते. यामुळे अनेकदा प्रोग्रामच्या वर देण्यात आलेला मिनिमाईझ, क्लोज आणि स्क्रीन मोठी किंवा छोटी करण्याचे पर्याय असलेला बार आणि विंडोजचा टूलबार स्क्रीनवर दिसत नाही. डेस्कटॉप मॉनिटरच्या स्क्रीनवर ते योग्य प्रकारे दिसते. पण ३२ इंचांच्या टीव्हीवर मात्र व्हिडीओ आणि फोटोचे पिक्सेल विस्तारलेले दिसतात, पण जर आपल्या मॉनिटरवर किंवा टीव्हीला संगणकासारखे पर्याय उपलब्ध असतील तर आपण ही स्टिक अगदी सहजपणे वापरू शकतो. या स्टिकचा दर्जा हा एखाद्या बजेडेट टॅबलेटप्रमाणे आहे. यामुळे ही स्टिक टॅबला पर्याय ठरू शकतो. इंटेलच्या स्टिकच्या तुलनेत या स्टिकमध्ये वेब ब्राऊझिंगचा अनुभव खूप चांगला आहे. यामध्ये इंटेलचा अॅटोम झेड ३७३५ हा प्रोसोसर वापरण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये दोन जीबी रॅम आणि ३२ जीबीची अंतर्गत साठवणूक देण्यात आली आहे. यात वायफाय आणि ब्लूटय़ूथ ४.० जोडणी देण्यात आली आहे. यामध्ये आपण मायक्रोएसडीच्या मदतीने साठवणूक क्षमता ६४ जीबीने वाढवू शकतो. किंमत : ८९९९ रुपये
– नीरज पंडित, niraj.pandit@expressindia.com