नदीच्या एका किनाऱ्यावर असलेल्या, कोल्हा, शेळी आणि कोबीच्या गड्डय़ांची टोपली या सर्व गोष्टी मालकाला बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर न्यायच्या आहेत. परंतु बोट छोटी असल्याने तो एकावेळी फक्त एकच गोष्ट सोबत नेऊ  शकतो. मालकाच्या अनुपस्थितीत कोल्हा शेळीला खाऊ शकतो किंवा शेळी कोबी खाऊ  शकते. मग सर्वाना दुसऱ्या किनाऱ्यावर कसे पोहोचवता येईल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच सात खांबांवर प्रत्येकी एक याप्रमाणे सहा बेडूक बसले आहेत आणि बरोबर मधला एक खांब रिकामा आहे. आता आपल्याला डावीकडील खांबांवरील तीन बेडूक उजवीकडे व उजवीकडील खांबांवरील तीन बेडूक डावीकडे हलवायचे आहेत. बेडूक शेजारच्या खांबावर किंवा केवळ एका बेडकाला ओलांडून पलीकडे जाऊ  शकतो. तो त्यापेक्षा जास्त बेडकांना ओलांडू शकत नाही. मग ही हलवाहलव कशी करता येईल? अशाप्रकारची थोडी गमतीदार, थोडे सामान्यज्ञान आणि थोडे तर्क वापरायला लागणारी कोडी सोडवायला तुम्हाला आवडतील ना?

iMostMobile Tech,.JSC च्या Cross the river या अ‍ॅपमधे अशाप्रकारची अनेक अ‍ॅनिमेटेड कोडी आहेत. [https://play.google.com/

store/apps/detailsAGid=l.t.t.rivercrossingiq] येथे प्रत्येक कोडे यशस्वीरीत्या सोडवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या स्टेप्स खेळून बघू शकता. कोडे सोडवण्यासाठी वेळाचे बंधन नाही. परंतु जर तुम्ही ५ मिनिटांच्या आत कोडे सोडवल्यास तुम्हाला रिवॉर्ड म्हणून एक नाणे मिळते. एखादे पझल सोडवण्यासाठी मदत हवी असल्यास तुम्हाला १० नाण्यांच्या बदल्यात ती मिळू शकते.

अशाच प्रकारची कोडी असणारे आणखी एक अ‍ॅप म्हणजे Chuslab ¨चे Water Capacity Brain Puzzle.  [https://play.google.com/ store/apps/detailsAGid=com.chuslab.=

WaterCapacity ] या अ‍ॅपमधे केवळ पाणी आणि विविध आकाराच्या पाण्याच्या बाटल्या घेऊनच सर्व पझल्स सोडवायची आहेत.

उदाहरणार्थ, पाच, सात आणि आठ गॅलन पाणी मावण्याची क्षमता असलेल्या तीन बाटल्या दिलेल्या आहेत. त्यांचा वापर करून आपल्याला चार गॅलन पाणी, आठ गॅलन पाणी मावण्याची क्षमता असलेल्या बाटलीत भरायचे आहे. आणि हे करण्यासाठी तुमच्याकडे केवळ ५ मूव्हज आहेत. तुम्ही तुम्हाला हव्या त्या बाटलीत पाणी भरू शकता. एका बाटलीमधून दुसऱ्या बाटलीमधे ओतू शकता किंवा पूर्ण बाटली रिकामी करू शकता. हे पझल सोडवण्यासाठी तर्क आणि गणिती आकडेमोड यांचा वापर करावा लागतो.

या अ‍ॅपमधे ३००० पेक्षा अधिक पझल्स आहेत. पाच वेगवेगळ्या भागात ती विभागलेली आहेत. क्लासिक, एक्स्ट्रीम मोड तसेच मेंटल ब्रेकडाऊन हे भाग कठीण पझल्सचे आहेत, तर किड्स मोडमधे पझल्स सोडवण्यासाठी ठरावीक मूव्हजचे बंधन नाही. फिशबाऊल मोड या भागात इतर चार भागांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारची पझल्स आहेत. कोडी सोडवण्यात ज्यांना मजा वाटते अशांसाठी ही अ‍ॅप्स मनोरंजनाचा खजिना ठरतील!

मनाली रानडे manaliranade84@gmail.com