मूलभूत गरजांपैकी निवारा ही सर्वात महत्त्वाची अशी गरज. म्हणजे मानवाला निवाऱ्याची गरज भासू लागली तेव्हा झाडाच्या ढोलीपासून ते गुहेपर्यंत अशा उपलब्ध साऱ्याच जागा पिंजून काढल्या. घरबांधणीचा नेमका शोध कधी आणि कुणाला लागला हे इतिहास संशोधकांना ठाऊक असेल. घराचा आकार, खोल्या, छप्पर, खुंटय़ा, चूल वगैरे गोष्टींच्या जागाही मानवाने ठेच खात खातच ठरवल्या असाव्यात. कुठल्या प्रकारासाठी नेमकं कुठलं अवजार किंवा साधन वापरायचं हे सुद्धा ‘आधी चुकलेचि पाहिजे’च्या आवर्तनांनंतरच जमलं असावं. पण एकूणच मानवाने शिकत शिकत घर सुसज्ज केलं. तंत्रज्ञानाने प्रगती केली तशी ही सुसज्जता प्रगल्भ होत गेली. घरातल्या वस्तूंनीही कात टाकली. आणि खऱ्या अर्थाने घर म्हणजे स्मार्टहोम बनून गेलं.
स्मार्टहोम ही संकल्पना फारशी नवीन नसली तरी तिचं आकर्षण अजूनही आहे. स्मार्टहोम म्हणजे श्रीमंतांची थेरं असाही एक समज आहे. पण सध्याच्या घडीला हे मार्केट इतकं मोठं झालंय की स्मार्टहोम हे सामान्यांच्याही आवाक्यात आलंय. जरा डोकं चालवलं तर खरं तर अगदी ऐपतीतही एकदम झकास असं स्मार्टहोम बनवता येऊ शकतं. पण त्याआधी ही संकल्पना नेमकी काय आहे आणि काम कशी करते ते समजून घेऊ.
स्मार्टहोम म्हणजे आपल्या आदेशावर चालणारं घर. (घर म्हणजे घरातल्या वस्तू बरं का. माणसं नाहीत.) घरामध्ये विजेवर चालणारी जेवढी काही उपकरणं आहेत ती सारीच्या सारी होम नेटवर्कचा वापर करत एकमेकांशी कनेक्ट करता येतात. आणि स्मार्टफोन, टॅब्लेट, रिमोट कंट्रोल किंवा अगदी व्हॉइस कमांडनेही कंट्रोल करता येऊ शकतात. म्हणजे आपल्या आदेशानंतर घर अक्षरश: प्रतिसाद देत असतं. घरातील दिवे, होम सिक्युरिटी, होम थिएटर आणि इतर करमणुकीची साधनं तसंच घराचं तापमान नियंत्रित करणारी उपकरणं यांचा प्रामुख्याने या आदेशामध्ये समावेश होतो.
‘इंटरनेट ऑफ द थिंग्ज’ नावाची एक संकल्पना आहे. डिजिटल नेटवर्कचा वापर करत विविध उपकरणं एकमेकांना जोडणे आणि त्यांचा आपापसांत संवाद घडवून आणणं असा त्या संकल्पनेचा सोप्या भाषेतला सारांश आहे. हा सारा मामला १९७५मध्ये सुरू झाला. स्कॉटलंडमधल्या एका कंपनीने एक्सटेन नावाचा एक अल्गोरिदम तयार केला. घरातल्या विजेच्या वायरींचा वापर करत अगोदरच एकमेकांशी जोडलेल्या साऱ्या उपकरणांमध्ये एक सुसंगता आणि संवाद घडवून आणण्याचं काम हा अल्गोरिदम करत असतो. ही सारी उपकरणं म्हणजे रिसिव्हर्स बनतात. आणि रिमोट कंट्रोल किंवा की-पॅड्स म्हणजे ट्रान्समीटर्स. जर का तुम्हाला दुसऱ्या खोलीमधला दिवा बंद करायचा असेल तर ट्रान्समीटरच्या माध्यमातून नंबरकोडचा वापर करत एक संदेश त्या दिव्याला पाठवायचा की झालं काम. हे काम तीन टप्प्यांमध्ये होतं.
* कमांड दिली जात असल्याचा अलर्ट यंत्रणेला दिला जातो.
* प्रत्येक उपकरणाला एक नंबर दिलेला असतो. ज्या उपकरणासाठी कमांड दिलेली आहे तो नंबर आणि ते उपकरण यंत्रणेकडून ओळखलं जातं.
* आणि सगळ्यात शेवटी मिळते ती मुख्य कमांड. म्हणजे उपकरण सुरू करायचं की बंद.
ही सगळी प्रक्रिया सेकंदाच्या आत होते. वर म्हटल्याप्रमाणे एक्सटेनसारख्या अल्गोरिदमचा वापर या कमांड्स देण्यासाठी केला जातो. याशिवायही झिगबी किंवा झेडवेव्हसारखे अल्गोरिदमचा वापर करणारी उपकरणं आहेत. एक्सटेन, झिगबी, झेडवेव्ह किंवा इन्सटिऑन ही मूलभूत तंत्रज्ञान पुरवणारी नावं आहेत, जी स्मार्टहोम कम्युनिकेशन्सचे प्रोटोकॉल्स पुरवते. घरगुती वापराची उपकरणं बनवणाऱ्या कंपन्यांसोबत त्यांचे करार असल्यामुळे त्यानुसार ते उपकरणं बनवत असतात. स्मार्टहोम प्रॉडक्ट्सचे काही प्रकार आणि उदाहरणं आपण बघू या.
* घराच्या बाहेरच्या सुरक्षेसाठी असणारे कॅमेराज. हे कॅमेराज स्मार्टफोनवरून नियंत्रित करता येऊ शकतात. इतकंच नाही तर जर का काही आक्षेपार्ह किंवा धोकादायक आढळल्यास हे कॅमेरे स्मार्टफोनवर अलर्टसुद्धा पाठवतात.
* मोशन सेन्सर्स हासुद्धा सुरक्षेचाच एक प्रकार. घराजवळ काही हालचाल झाली तर लागलीच अलर्ट पाठवला जातो. काही सेन्सर्स तर इतके स्मार्ट असतात की ते तुमच्या घरातल्या पाळीव प्राणी आणि चोरांमधला फरकही जाणून असतात.
* स्मार्टफोनशी इंटिग्रेट करून घरातील दिवे, पंखे यांचं नियंत्रण करता येऊ शकतं. त्यामुळे घरात नसतानाही मोबाइल नेटवर्क असेल तर स्मार्टफोनवरून दिवे, पंखे सुरू अथवा बंद करता येऊ शकतात.
* दरवाजे बंद किंवा उघडण्याची किमयाही स्मार्टहोममध्ये आहे. स्मार्टफोन दाराच्या जवळ आल्यावर थेट दार उघडण्याची सोयही अनेक स्मार्टडोअर लॉक्समध्ये आहे.
घरातल्या या स्मार्ट सुसज्जतेमुळे जीवन सुकर होणं साहजिकच आहे. घरापासून लांब असूनही घरावर लक्ष आणि नियंत्रणही ठेवणं शक्य आहे. पण हे सगळं आपल्या घरात कसं काय आणता येईल, कुठली उपकरणं घेणं सोयीचं ठरेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य किंमत आणि योग्य दर्जा कसा ठरवायचा. हा सगळा मामला एकाच प्रकरणामध्ये सामावता येणं शक्य नाही. त्यामुळे पुढल्या भागात याविषयी अधिक जाणून घेऊ.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com