’ मला अभ्यासाठी टॅब घ्यायचा आहे. माझे बजेट वीस हजार रुपये आहे. तरी मला चांगला टॅब सूचवा.
– अमोल वार्पे
’ सध्या बाजारात अगदी चार ते पाच हजार रुपयांपासून टॅब उपलब्ध आहेत. तुमचे बजेट वीस हजार रुपये असल्यामुळे त्यामध्ये चांगल्या दर्जाचा टॅब मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला जर अ‍ॅपलकडे वळायचे असेल तर आयपॅड मिनी २ हा आयपॅड घेऊ शकता. तो सध्या ई-संकेतस्थळांवर १७९०० पासून उपलब्ध आहे. सॅमसंगचा टॅब ए हाही साधारणत: त्याच किमतीत उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला रॅम आयपॅडपेक्षा एक जीबी जास्त मिळते. बाकी साधारण सर्व फीचर्स सारखे आहेत. आयपॅडमध्ये बॅटरी बॅकअप चांगला देण्यात आला आहे. लिनोवाचा फॅबप्लस हा टॅबही तुम्ही विचारात घेऊ शकता. यामध्येही तुम्हाला दोन जीबी रॅम देण्यात आली आहे. याचा स्क्रीन ६.८ इतका आहे. यामुळे तो हाताळण्यास सोपा जाऊ शकतो. याची किंमत साधारणत: १५५०० पासून पुढे आहे. शिवाय यामध्ये तुम्हाला फोरजी देण्यात आले आहे. जे सॅमसंग आणि आयपॅडमध्ये मिळत नाही. शिओमी रेड मीचा वायफाय ओन्ली टॅब तुम्हाला अगदी दहा हजारा पाचशे रुपयांपासून उपलब्ध आहे. लिनोवाचा योगा टॅबही बाजारात असून त्याचा आकार मोठा आहे. त्यात थ्रीजी आहे. असूस या कंपनीच्या झेनफोनमध्ये तुम्हाला १७५०० रुपयांमध्ये दोन जीबी रॅम आणि फोरजी सुविधा मिळू शकणार आहे. याचा स्क्रीन आठ इंचाचा आहे.

Story img Loader