* मला मोबाइलवरील काही गेम्स किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारखे अ‍ॅप्स संगणकावर वापरायचे आहेत, तर त्याला काही पर्याय आहे का?
– सुनंदा पिंगळे, नाशिक
* अँड्रॉइड ही सर्वाधिक वापरली जाणारी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. यामध्ये आपण अनेक गेम्स डाऊनलोड करतो. अनेकदा घरी असताना आपल्याला हे गेम्स संगणकावर असावेत असे वाटते. अशा वेळी तुम्ही मोबाइलमधील सबवे सर्फर किंवा अन्य गेम्स संगणकावर खेळू शकता. यासाठी तुम्हाला ब्ल्यूस्टक्स हे सॉफ्टवेअर तुमच्या संगणकात डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड झाल्यावर ते संगणकात इन्स्टॉल करा. त्यानंतर सॉफ्टवेअर सेटिंग अप होईल. हे झाल्यावर तुम्हाला माय अ‍ॅप्स, टॉप चॅट्स असे पर्याय दिसतील. यातील माय अ‍ॅप्स पर्याय निवडा. यानंतर एक वन टाइम सेट अप येईल. हा सेट अप आल्यावर तुम्हाला तुमचे गुगलचे लॉगइन करावे लागेल. हे लॉगइन झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते अ‍ॅप्स सर्च करून इन्स्टॉल करू शकता. यानंतर तुम्ही त्या इन्स्टॉल अ‍ॅपच्या माध्यमातून गेम्स खेळू शकता. यामध्ये तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपही वापरू शकता.
* माझ्याकडे एक टेराबाइटची हार्डडिस्क आहे. ही हार्डडिस्क सध्या कोणत्याही संगणकावर रीड होत नाही. यावर काय उपाय आहे.
– संतोष अवेरे, कल्याण
* हार्डडिस्क संगणकाला जोडा. त्यानंतर स्टार्टमध्ये जाऊन रनमध्ये जा. यानंतर diskmgmt.msc असे टाइप करा. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. नंतर डब्लूडी पासपोर्ट ड्राइव्हवर राइट क्लिक करून ”Change Drive Letter and Paths” निवडा. यानंतर अ‍ॅड बटनमध्ये जाऊन ड्राइव्ह सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. तुमची हार्डडिस्क संगणकात याआधी अ‍ॅड केलेली असेल तर अ‍ॅडऐवजी तुम्हाला चेंजचा पर्याय येईल. तेथे क्लिक करा. ही प्रक्रिया करून तुमची हार्डडिस्क रीड होईल. तरीही न झाल्यास तुम्हाला हार्डडिस्क बदलावी लागेल.
तंत्रस्वामी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा