पूर्वी एखाद्य खास समारंभाच्या वेळी फोटो काढले जात आणि ते डेव्हलप होऊन हातात मिळेपर्यंत थोडी वाट पाहायला लागे. त्यामुळे ते फोटो कसे आले असतील हे बघण्याची एक वेगळीच उत्सुकता असे. शिवाय फिल्म रोलवाल्या कॅमेऱ्यामधे एका रोलमधे काही विशिष्ट संख्येनेच फोटो काढता येत असत. त्यामुळे खूपच विचारपूर्वक फोटो काढले जायचे.
मग त्याची जागा डिजिटल कॅमेऱ्याने घेतली. त्यामुळे फिल्म रोल्सची गरज उरली नाही. मोठय़ा संख्येने फोटो काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आणि काढण्याचा खर्च नाहीसा झाला. त्यातील आपल्याला हवे ते निवडक फोटोच प्रिंट करायला देता येऊ लागले. त्यांना स्पेशल इफेक्ट्सही देता यायला लागले. जसे की फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट करणे, फोटोभोवती वेगवेगळ्या डिझाइन्सच्या फ्रेम्स काढणे, तीन-चार फोटो एकत्रित करून एक फोटो बनवणे, त्यावर एखादा मेसेज लिहिणे इत्यादी. यासाठी काही विशिष्ट सॉफ्टवेअर्सचा उपयोग करायला लागतो. जी पूर्वी फोटो स्टुडियोमधेच उपलब्ध असत.
हाय रेझोल्युशनचा कॅमेरा असलेला मोबाइल आता जवळजवळ प्रत्येकाच्या हातात दिसतो. तसेच आजकाल ग्रुप फोटोज आणि सेल्फीजचा ट्रेंड आहे. शिवाय मोबाइलच्या साहाय्याने काढलेले असे फोटो लोकांना लगेच सोशल मीडियावरदेखील टाकायचे असतात. वेगवेगळे स्पेशल इफेक्ट्स देऊन ते आकर्षक करण्यासाठी आता कुठल्याही फोटो स्टुडियोत जायची आवश्यकता नाही. हे आता केवळ मोबाइल अॅपच्या मदतीने अगदी सहज करता येते.
आज आपण फोटोडायरेक्टर (PhotoDirector) या अॅपबद्दल जाणून घेऊ. या अॅपमधील सोळा विविध टूल्सच्या साहाय्याने तुम्ही फोटोला वेगवेगळे इफेक्ट्स देऊ शकता. यामधे फोटो क्रॉप, रोटेट किंवा फ्लिप करणे, तसेच वेगवेगळ्या कलर अॅडजेस्टमेंट करणे यासारख्या नेहमीच्या गोष्टी तर आहेतच त्याचबरोबर तुम्हाला फोटोला मिरर इफेक्टसदेखील देता येतात.
एखादा क्षण टिपत असताना किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीचा फोटो घेत असताना काही वेळा भोवतालच्या अनावश्यक गोष्टीदेखील फोटोत टिपल्या जातात. या अॅपमधल्या विशेष टूलच्या साहाय्याने फोटोतील नको असलेली एखादी गोष्ट काढून टाकता येते.
फोटोतील एखादा विशिष्ट भागच उठून दिसावा यासाठी ब्लर टूलदेखील उपलब्ध आहे. त्याच्या साहाय्याने नको असलेली गोष्ट ब्लर म्हणजेच धूसर करता येते. रेड-आय रिमूव्हलचीदेखील सोय आहे. एखाद्य फोटोवर तुम्हाला टेक्स्ट मेसेज, वेगवेगळे आकार, रंग आणि फाँटमध्ये लिहिता येते. फोटोला वेगवेगळ्या फ्रेम्सदेखील देता येतात.
अशाच प्रकारचे आणखी एक अॅप म्हणजे फोटोरस (FotoRus). यामध्येदेखील फोटोमध्ये अनेक छोटेमोठे फेरफार करून फोटोला पूर्णपणे नवीन लुक देता येतो. एका वेळी दहा फोटोंचे वेगवेगळ्या स्टाइलमध्ये कोलाज करता येते. फोटोंवर विविध स्टीकर्स समाविष्ट करता येतात.
या अॅपमधील PIP (प्रिर इन प्रिर) हे टूल वापरून तुमचे प्रियजनांसोबतचे फोटो विविध गोष्टींमध्ये जसे की, पारदर्शक काचेची बाटली, ग्लास इत्यादींमध्ये बंदिस्त करू शकता. फोटोला अशा प्रकारचे स्पेशल इफेक्ट्स देण्यासाठी अनेक टेम्प्लेट्स येथे उपलब्ध आहेत.
काढलेल्या फोटोंना नावीन्यपूर्ण कलाकुसर करण्याची संधी या अॅप्समुळे सर्वाना मिळाली आहे.
manaliranade84@gmail.com