अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्टफोन निर्मितीचा धडका लावणाऱ्या नोकियाने नुकत्याच सादर केलेल्या ‘नोकिया ५’ या फोनच्या ‘रॅम’मध्ये आता आणखी वाढ केली आहे. तीन जीबी रॅम असलेला नोकिया ५ देशातील निवडक दुकानांत उपलब्ध झाला आहे. मॅट् ब्लॅक आणि टेम्पर्ड ब्ल्यू अशा दोन रंगांत हा स्मार्टफोन उपलब्ध असल्याचे नोकियाचे निर्माते ‘एचएमडी ग्लोबल’ या कंपनीने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अँड्रॉइड ७.१.१ (नोगट) या ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यान्वित असलेला ‘नोकिया ५’ लवकरच गुगलच्या ‘अँड्रॉइड ओरिओ’ या ऑपरेटिंग सिस्टीमवर अपग्रेड करता येणार आहे. ५.२ इंचाची एचडी स्क्रीन, आयपीएस एलसीडी डिस्प्ले, कव्‍‌र्हड कॉर्निग गोरिला ग्लास अशी या फोनची वैशिष्टय़े आहेत. ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेल्या या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात येत आहे. या फोनमध्ये १६ जीबी अंतर्गत स्टोअरेज पुरवण्यात आला असून मायक्रोएसडी कार्डसह तो १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. या फोनमध्ये ३००० एमएएचची बॅटरी आहे. या फोनची किंमत १३ हजार ४९९ रुपये इतकी आहे.

  डेटा वाचवण्यासाठी ‘डेटाली’

स्मार्टफोन वापरकर्त्यांना भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे विविध अ‍ॅपकडून बॅकग्राऊंडवर वापरला जाणारा इंटरनेट डेटा. अशा डेटा वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने वापरकर्त्यांना नाहक इंटरनेट डेटा वाया घालवावा लागतो. या पाश्र्वभूमीवर गुगलने ‘डेटाली’ नावाचे नवीन अ‍ॅप आणले असून हे अ‍ॅप अशा डेटा वापरावर निर्बंध आणते.

तासाला, दिवसाला, आठवडय़ाला तसेच महिन्याला डेटाचा वापर कसा झाला हे या अ‍ॅपमधून कळेल. त्यासोबतच डेटा वाचविण्यासाठी काय करता येईल हेही सुचविले जाईल. हे अ‍ॅप केवळ डेटा कुठे वाया जातो हेच दाखवत नाही, तर प्रत्येक अ‍ॅपच्या इंटरनेट वापरावरदेखील नियंत्रण ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देते. या सॉफ्टवेअरद्वारे जवळच्या वायफाय हॉटस्पॉटचीही माहिती मिळते. या अ‍ॅपच्या माध्यमातून ३० टक्के डेटा वाचवता येऊ शकेल, असा दावा गुगलच्या ‘नेक्स्ट बिलियन यूजर इनिशिएटिव्ह’ उपक्रमाचे उपाध्यक्ष सीजर सेनगुप्ता यांनी सांगितले. हे अ‍ॅप अँड्रॉइड ५ किंवा त्यावरील अँड्रॉइड कार्यप्रणालींवर काम करते.

ट्रॅव्हकार्ट अ‍ॅपमध्ये नवीन वैशिष्टय़ांची भर

वापरकर्त्यांना अभूतपूर्व पर्यटन अनुभव देण्याच्या उद्देशाने ‘ट्रॅव्हकार्ट’ने आपल्या अँड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅपमध्ये नवीन वैशिष्टय़े जोडताना अ‍ॅप अद्ययावत करण्यावर भर दिला आहे. यामध्ये ‘इमिजीएट सेलिंग पॉइंट’ ही प्रमुख सुविधा आहे. या सुविधेद्वारे वापरकर्ते ज्या पर्यटनस्थळावर जाणार आहेत, त्या भागातील स्थानिक कार्यक्रमांची माहिती त्यांना येथून मिळते. याशिवाय या अ‍ॅपमध्ये बुकिंगची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. ट्रॅव्हकार्ट अ‍ॅपमधील ‘लाइव्ह इन्व्हेंटरी’ सुविधेमार्फत सहलीचे पॅकेज निवडताना तीन सोप्या टप्प्यांत ती आरक्षित करता येते. यात पेमेंट गेटवे, डिजिटल वॉलेट आणि मोबाइल बँकिंग असे तीन पेमेंट पर्याय देण्यात आले आहे.

 गार्मिनचे नवे ‘स्मार्टवॉच’

गार्मिन इंडिया या कंपनीने ‘विवोअ‍ॅक्टिव्ह ३’ नावाचे नवे स्मार्टवॉच भारतीय बाजारात दाखल केले आहे. जीपीएस कार्यान्वित असलेले हे स्मार्टवॉच १५ अ‍ॅपसह विक्रीस उपलब्ध आहे. या गॅझेटद्वारे धावणे, पोहोणे, कॉर्डिओ आदी व्यायामातील ऊर्जावापर तसेच हालचालींची नोंद सहज करता येते. याशिवाय योगा, जिना चढणे-उतरणे, बॉक्सिंग अशा क्रियांतील नोंदींसाठीही हे स्मार्टवॉच उपयुक्त आहे. ‘विवोअ‍ॅक्टिव्ह ३’ हृदयाची गतीही नोंदवते. या स्मार्टवॉचची किंमत २४ हजार ९९० रुपये इतकी आहे.

कॅनॉनचा नवा कॅमेरा

कॅनॉन कंपनीने आपल्या मिररलेस श्रेणीत ‘एओएस एम१००’ हा नवीन कॅमेरा दाखल केला आहे. २४.२ मेगापिक्सेलचा एपीएस-सी सेन्सर आणि डिजिक ७ इमेज प्रोसेसर असलेल्या या कॅमेऱ्यातून छायाचित्रे अधिक सुस्पष्ट व सुंदर येतात, असा कंपनीचा दावा आहे. चालत्या वा हलत्या गोष्टीचे छायाचित्रही या कॅमेऱ्यातून अतिशय स्पष्ट निघते. या कॅमेऱ्याचे वजन साधारण ३०० ग्रॅम असून यामध्ये सेल्फ पोटेर्र्ट मोड, एचडीआर बॅकलाइट मोड, स्मूथ स्किन अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या कॅमेऱ्यात तीन इंची एलसीडी टचस्क्रीन पुरवण्यात आली आहे. या कॅमेऱ्यातून चित्रीकरण करणेही अतिशय सोपे असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या कॅमेऱ्याची भारतीय बाजारातील किंमत २४ हजार ९९० रुपये इतकी आहे.