‘मेड इन चायना’ हा टॅग लागला की ग्राहकाची विश्वासार्हता कमी होते. प्रत्येक नामांकित कंपनीच्या वस्तूची हुबेहूब नक्कल करून ती वस्तू बाजारात आणण्यात चिनी माहीर. मात्र चीनमधील कंपन्यांची उत्पादन क्षमता आणि त्याप्रति त्यांची बांधिलकी लक्षात घेऊन अनेक बडय़ा कंपन्यांनी चीनमध्ये उत्पादन सुरू केले. यामध्ये अॅपलसारखी कंपनीही मागे राहिली नाही. कमी वेळात कमी किमतीत जास्तीत जास्त उत्पादन देण्याची चिनी लोकांची क्षमता याचे मुख्य कारण आहे. यामुळे ज्या देशात गुगल आणि त्याच्या उत्पादनांवर बंदी आहे. तोच देश जगभरातील सर्वाधिक अँड्रॉइड फोनची निर्मिती करणारा देश ठरला आहे. भारतीय कंपनी ‘लावा मोबाइल’ यांचीही संशोधन आणि विकास शाखा चीनमध्ये आहे. तसेच उत्पादन केंद्रही आहे. कंपनीच्या ‘शेनजेन’ संशोधन आणि विकास शाखेला भेट दिल्यानंतर स्वस्तात मस्त मोबाइल उपलब्ध करून देणाऱ्या या कंपन्याही फोनची ‘स्मार्ट’परीक्षा घेतल्याशिवाय उत्पादन बाजारात आणत नाहीत. यामुळेच ते ग्राहकांची मने जिंकू शकतात याची खात्री पटते. त्यांच्या संशोधन आणि विकास विभागातील कामाचा लेखाजोखा मांडत असतानाच फोनच्या निर्मितीची कथा आपल्यासमोर उभी राहू शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा