कुठल्याही प्रकारचा डेटा साठवण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपकरणं असतात. मुळातच साठवण हे निसर्गाने जीवसृष्टीला बहाल केलेलं वरदान आहे. भविष्याचा विचार करून काही गोष्टींचा साठा करून ठेवायचा हे मुंगीपासून ते मानवापर्यंत सगळ्यांच्याच नसानसांत भिनलेलं आहे. अन्नसाठा असो की इतर जीवनावश्यक वस्तू, व्यवस्थित जपून ठेवणं हे उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचंच ठरत आलं आहे. म्हणूनच गुहेपासून ते झाडातल्या ढोलीपर्यंत आणि कागदाच्या फायलींपासून ते हार्डडिस्कमधल्या डेटाफाइल्सपर्यंत साठवणुकीचा प्रवास अद्भुत आहे. अन्नसाठा, शस्त्रसाठा बरोबरच डेटास्टोअरेज किंवा ज्ञानसाठा हा कालानुरूप महत्त्वाचा ठरू लागला.

डिजिटल युगाचा प्रसार झाला तसा फ्लॉपी डिस्क, सीडी, डीव्हीडी असं स्थित्यंतर पाहायला मिळालं. पण या सर्वापेक्षा अधिक उपयुक्त असं उपकरण म्हणजे हार्डडिस्क. कॅसेट टेपपेक्षा हार्डडिस्क काही वेगळी नाही. दोन्हीमध्ये मॅग्नेटिक रेकॉर्डिग तंत्राचा वापर केलेला असतो. मॅग्नेटिक मीडियम हे सहजरीत्या डीलीट किंवा रीराइट केलं जाऊ  शकतं. तसंच त्यामध्ये स्टोअर केलेली माहिती कित्येक र्वष तशीच व्यवस्थितपणे राहू शकते.

A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…

पण मग कॅसेट्स आणि हार्डडिस्कमध्ये फरक तो काय. कॅसेटच्या बाबतीत मॅग्नेटिक रेकॉर्डिग मटेरिअलला एका पातळ अशा प्लास्टिक स्ट्रिपचं आवरण असतं. हार्डडिस्कमध्ये मात्र त्यासाठी अ‍ॅल्युमिनियम किंवा ग्लास डिस्कचा वापर होतो. टेपमधील डेटा सेव्ह किंवा वापरण्यासाठी डेकमधील हेडरचा टेपला स्पर्श होत असतो. हार्डडिस्कच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसं टेप मागे पडली आणि तिची जागा हार्डडिस्कने घेतली. हार्डडिस्कचा परफॉर्मन्स मोजण्यासाठी दोन गोष्टी असतात. एक म्हणजे डेटा रेट. एका सेकंदात किती बाइट्स डेटा सीपीयूकडे पाठवला जातो यावरून हार्डडिस्कचा परफॉर्मन्स ठरतो. हा रेट ५ ते ४० एमबी इतका असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीक टाइम. हा टाइम म्हणजे सीपीयूने हार्डडिस्ककडे एखादी फाइल मागितली की ती सीपीयूकडे पोहोचण्याचा वेळ. हा वेळ १० ते २० मिलीसेकंद इतका असतो.

हार्डडिस्कचं काम कसं चालतं हे कळण्याचा सोपा मार्ग म्हणजे हार्डडिस्क उघडून बघायची. पण लक्षात ठेवा हे असं केल्याने हार्डडिस्क खराब होऊ  शकते. त्यामुळे एक्स्पर्ट असाल तरच करा, अन्यथा एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊन हार्डडिस्क उघडा. हार्डडिस्क म्हणजे एक सीलपॅक अ‍ॅल्युमिनियमचा बॉक्स असतो. ज्याच्या एका बाजूला कंट्रोलर इलेक्ट्रॉनिक्स असतात. हे इलेक्ट्रॉनिक्स रीड आणि राइटचं तंत्र सांभाळत असतात. आणि याशिवाय एक मोटर असते जी हे प्लॅटर फिरवत असते. प्लॅटर म्हणजे टेपसारखाच प्रकार असतो. हार्डडिस्क जेव्हा वापरात असते तेव्हा हे प्लॅटर साधारण ३६०० ते ७२०० आरपीएम या वेगाने फिरत असतं. यासोबत असतो तो म्हणजे आर्म. रीड आणि राइट हेड्सना कंट्रोल करण्याचं काम हा आर्म करतो. बहुतांश हार्डडिस्कमध्ये एकापेक्षा अधिक प्लॅटर्स असतात. आणि त्याला अनुसरून रीड आणि राइट हेड्स.

डेटा जेव्हा हार्डडिस्कमध्ये स्टोअर केला जातो तेव्हा तो प्लॅटरच्या पृष्ठभागावर सेक्टर आणि ट्रॅक्समध्ये सेव्ह होतो. ट्रॅक्समध्ये एकात एक अशी वर्तुळं असतात. आणि त्यांना छेदणारी सेक्टर्स बनवलेली असतात. प्रत्येक सेक्टरमध्ये ठरावीक बाइट्सचा डेटा स्टोअर होत असतो. काहींमध्ये २५६ तर काहींमध्ये ५१२ बाइट्स. अशा काही सेक्टर्सचं मिळून एक क्लस्टर तयार होतं. लो लेव्हल फॉरमॅटिंग करून हार्डडिस्कच्या प्लॅटरवर ट्रॅक्स आणि सेक्टर्स तयार होतात. त्यानंतर होणाऱ्या हाय लेव्हल फॉरमॅटिंगमध्ये या तयार झालेल्या जागांमध्ये डेटा सेव्ह होत जातो.

फ्लॉपी डिस्क ते हार्डडिस्कपर्यंत सगळ्याच उपकरणांमध्ये हेच तंत्र वापरलं गेलं आहे. तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसतशी प्लॅटरवर स्टोअर होणाऱ्या डेटाची मर्यादा वाढत गेली. हजार स्क्वेअरफूट जागेवर चार मजली इमारत आणि तितक्याच जागेवर दहा मजली इमारत, यात जो फरक आहे तोच फरक हार्डडिस्कमधल्या या जागेत आहे.

पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com