एखाद्या घटनेवर व्यक्त होण्यापासून ते एखाद्या योजनेची घोषणा करेपर्यंतच्या सर्वच गोष्टी सध्या समाजमाध्यमांवरून होत आहेत. बदलत्या काळानुरूप सरकारी यंत्रणाही बदलू लागल्या आहेत. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सरकारी यंत्रणांमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. अनेक ठिकाणी ई-गव्हर्नन्सची तयारी सुरू झाली. देशातील बहुतांश राज्यांमध्ये ई-गव्हर्नन्स लागू होत नाही तोवर स्मार्टफोनक्रांतीने सामान्यांना इंटरनेटशी जोडले गेले. यातूनच एम-गव्हर्नन्सची गरज निर्माण झाली आणि सरकारी यंत्रणा पुन्हा कात टाकू लागल्या. ही प्रक्रिया अद्याप सुरू असली तरी ती वापरण्या योग्य झाली आहे. सरकारी कामे बसल्या जागेवरून करण्यासाठी संकेतस्थळांबरोबरच अनेक सरकारी अॅप्सही बाजारात उपलब्ध आहेत. ‘एमसेवा’ या सरकारी यंत्रणेने तयार केलेली ही अॅप्स सुरक्षित आणि उपयुक्त आहेत. पाहुयात असेच काही अॅप्स.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा