मोबाइल गेम्सचं प्रस्थ सध्या वाढलंय. म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या कुठल्याही १० माणसांचे समजा स्मार्टफोन्स तपासले तर त्यापैकी निदान सहा जणांच्या मोबाइलमध्ये कमीत कमी एखादा गेम तरी असेलच. कँडी क्रश, अँग्री बर्ड, पोकेमॉन गो, निन्जा फ्रुट्स, बॅटलशिप, टेम्पल रन असे मुख्य प्रवाहातले जगाने डोक्यावर घेतलेले गेम्स तर आहेतच; पण त्याहीशिवाय इतरही असे अनेक गेम्स आहेत जे प्रसिद्धीच्या झोतात नसूनही बरेच लोकप्रिय आहेत. संवादाचे उपकरण म्हणून जन्माला आलेले मोबाइल फोन आता करमणुकीचे साधन बनले आहेत. हे म्हणजे एखादा कर्मचारी कचेरीत शिपाई पदावर आला आणि काही महिन्यांतच तिथला हेडक्लार्क होण्यासारखं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

असो. मुद्दा हा आहे की, या मोबाइलमधले गेम्स मुळात तयार कसे होतात. अर्थात, मोबाइल गेम्स डेव्हलप करणाऱ्या अनेक नामांकित कंपन्या आता अस्तित्वात आहेत. केवळ मोबाइल गेम्स डेव्हलप करून नफा कमावणाऱ्या कंपन्या म्हणजे सर्जनशीलता आणि मार्केटिंग यांचा उत्तम मिलाफ आहे; पण त्याच वेळी फ्रीलान्स डेव्हलपर्सनी तयार केलेले गेम्ससुद्धा चलतीत आहेत. तुम्हालाही तुमचा स्वत:चा असा गेम तयार करायचा असेल तर ते शक्य आहे. अर्थात त्यासाठी मेहनत, सहनशीलता, चिकाटी आणि अर्थात सर्जनशीलता आवश्यक आहे. साधारणत: पाच टप्प्यांमध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल गेम तयार करता येऊ  शकतो.

१. मार्केट रिसर्च

२. टेक्निकल बाजू

३. डेव्हलपरची नोंदणी

४. सपोर्ट कम्युनिटी

५ लाँच

मार्केट रिसर्च

कुठल्याही डोहामध्ये उडी मारण्याआधी त्याविषयीची माहिती असणं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे कुठल्याही उद्योगात किंवा क्षेत्रात उतरायचं असेल तर त्याआधी त्याविषयीचा सखोल अभ्यास करणं गरजेचं असतं. कुठल्या प्रकारचा गेम डेव्हलप करायचा हे ठरवण्याआधी उपलब्ध असणारे गेम्स खेळून बघणं आवश्यक आहे. कोडी स्वरूपाचा गेम, पत्त्यांचा गेम, रेसिंग, वॉर गेम, डिटेक्टिव्ह गेम असे वेगवेगळे प्रकार त्यात आहेत. त्यातला एखादा प्रकार निवडून नंतर त्या प्रकारातले उपलब्ध गेम्स अनेकदा खेळून बघा. खेळण्याच्या उद्देशाने त्या गेमकडे बघू नका. त्या गेममधली नेमकी कोणती गोष्ट त्या गेमला लोकप्रिय बनण्यासाठी कारणीभूत ठरली याचा मागोवा घ्या. त्या गेमविषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेली सगळी माहिती वाचा. तुम्ही तो गेम खेळत असताना त्याची टिप्पणं लिहून काढा. तुम्हाला आढळलेले, खटकलेले, जाणवलेले, आवडलेले असे सारे मुद्दे एका कागदावर टिपा. तुम्हाला जर का मार्केट रिसर्च स्वत:ला करता येत नसेल तर तसा रिसर्च करून देणाऱ्या कंपनीची किंवा एखाद्या फ्रीलान्सरची मदत घ्या. साधारण दहा हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये चांगल्या प्रकारचा मार्केट रिसर्च करून देणाऱ्या कंपन्या आहेत.

तांत्रिक बाजू

एकदा का मार्केट रिसर्च झाला, की त्यानंतर गेमची बांधणी सुरू होते. आर्किटेक्टने प्लान बनवल्यानंतर जशी बांधकामाला सुरुवात होते तसाच हा प्रकार आहे. मार्केट रिसर्चनंतर तुम्हाला तुमचा गेम कसा हवा आहे त्याचे वायरफ्रेम्स (म्हणजे ब्लू प्रिंट्स) बनवायचे. तुमच्या डोक्यातला गेम हा कागदावर उतरवायचा असतो. कशा हालचाली होतील, गेमचा गाभा काय, तो इनडोअर असणार की आऊटडोअर, दिवसा असणार की सकाळी वगैरे साऱ्या गोष्टी बारकाईने कागदावर लिहून काढा. तुमच्या कल्पनेतल्या गेमनुसार वायर फ्रेम्स तयार झाल्या की नंतर प्रोग्रामिंगला सुरुवात होते. म्हणजे गेममध्ये जेवढय़ा काही हालचाली किंवा घडामोडी आहेत त्यांचा कर्ता-करविता हा प्रोग्रामिंगचा माणूस असतो. जर का तुम्हाला स्वत:ला प्रोग्रामिंग लँग्वेजचे ज्ञान नसेल तरी काहीही हरकत नाही. तुम्हाला तुमचे गेम अ‍ॅप डेव्हलप करून देणारी अनेक डेव्हलपर मंडळी तयार असतात. ऑनलाइन अशी मंडळी तुम्हाला सहजरीत्या मिळतात. त्यांच्याशी बजेटनुसार पैशाच्या वगैरे गोष्टी निश्चित झाल्या की, त्यानंतर थेट कामाला सुरुवात होते. डेव्हलपरने गेम तयार केल्यानंतर तो टेस्टिंगही करून घेतो. म्हणजे बनवलेला गेम व्यवस्थित चालतोय की नाही हे तपासलं जातं.

डेव्हलपरची नोंदणी

गेम तयार झाला की तो अ‍ॅपल स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरमध्ये रजिस्टर करावा लागतो, जेणेकरून युजर्सना तो डाऊनलोड करणं शक्य होतं. रजिस्टर करताना तुमची माहिती नीट द्या, कारण अनेकदा एकदा दिलेली माहिती बदलता येत नाही. त्यामुळे नोंदणी नीट करा. अ‍ॅपल आणि अँड्रॉइड अशा दोन्ही ठिकाणी नोंदणी झाल्यानंतर तुमचा गेमचा प्रसार करणं महत्त्वाचं आहे.

लाँच

मोठय़ा कंपन्या नवीन गेम बाजारात आणताना गाजावाजा करतात, पण बजेट नसेल तर फेसबुक अ‍ॅड, यूटय़ूब अ‍ॅडच्या माध्यमातून तुमचा गेम लोकांपर्यंत पोहोचवता येतो. यासाठी मार्केटिंग कंपन्यांचीही मदत घेता येऊ  शकते, कारण एकदा गेम तयार झाल्यानंतर त्याची माहिती लोकांना कळणं आवश्यक असतं. लोकांना गेमचं नाव किंवा त्याचा चेहरामोहरा आवडला की मग डाऊनलोड्सची संख्या भराभर वाढत जाऊ  शकते.

गेम डेव्हलपमेंटची प्रक्रिया क्लिष्ट नसली तरी बरीच मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहनशीलता आणि शांततेने निर्णय घेणं योग्य ठरतं.

पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com