सोशल नेटवर्किंग साइटवर तुमच्या डोळ्यांची चाचणी घेणारी अनेक कोडी तुम्ही सोडवली असतील. समजा स्क्रीनभर 7 हा इंग्रजी अंक लिहिलेला आहे आणि त्यामध्येच एखादा 1 हा इंग्रजी अंक किंवा हे इंग्रजी अक्षर लिहिलेले असल्यास ते आपल्याला काही क्षणात शोधता येते का? हाच खेळ अनेक इंग्रजी 8 च्या आकडय़ांमधून 3 चा अंक शोधण्यासाठी खेळता येईल. खरे तर या कोडय़ात कठीण असे काहीच नाही; परंतु अशा प्रकारच्या कोडय़ांमध्ये तुमच्या नजरेची चांगली कसोटी लागते.
आज आपण स्मरणशक्ती वाढवणाऱ्या, प्रतिक्षिप्त क्रिया, अचूकता, जलद गतीने निर्णय घेण्याची क्षमता वाढवणाऱ्या Laurentiu Popa ¨FZ Skillz – Logical brain game [ https://play.google.com/store/apps/details?id=net.rention.mind.skillz&hl=en ] या अॅपची माहिती घेणार आहोत. या अॅपमध्ये एकूण 42 लेव्हल्स आहेत. प्रत्येक लेव्हलमध्ये तुम्हाला 1 ते 5 स्टार्स मिळवण्याची संधी आहे. पहिल्या लेव्हलपासून तुम्ही जितके जास्त स्टार्स मिळवता तशा पुढील लेव्हल्स अनलॉक होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, पंधरावी लेव्हल अनलॉक करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 45 स्टार्स असणे आवश्यक आहे. या अॅपमधील प्रत्येक कोडे वेगळ्या प्रकारचे आहे. त्यातील काही कोडय़ांची माहिती थोडक्यात घेऊ. लेव्हल 2 मधील कोडय़ात तुम्हाला १ ते २४ आकडे उतरत्या व चढत्या क्रमाने लावायचे आहेत. या पझलमधे क्रिया जलद करण्यास महत्त्व आहे.
लेव्हल 4 मध्ये तुम्हाला दिलेले वाक्य चूक आहे की बरोबर हे सांगायचे आहे. उदाहरणार्थ हिरव्या रंगाचे वर्तुळ दाखवून विचारले जाते की, ‘हे वर्तुळ हिरव्या रंगाचे आहे काय?’ किंवा केशरी रंगाचे वर्तुळ दाखवून विचारले जाते की, ‘हा केशरी रंगाचा चौरस आहे?’ विचारलेले वाक्य व दाखवले गेलेले चित्र यांची तुलना करून चूक की बरोबर ठरवावे लागते. शिवाय यासाठी वेळेचे बंधन आहेच. आपल्याला केशरी रंगाचे वर्तुळ दिसत असेल व प्रश्नात हा केशरी चौरस आहे, असे विचारले असेल तर भराभर उत्तर देण्याच्या नादात केवळ केशरी शब्दांकडे लक्ष दिले जाते व चौरस या शब्दाकडे दुर्लक्ष होऊन उत्तर चुकू शकते.
रंगछटांचा क्रम म्हणजेच फिकट ते गडद असा क्रम लावणे किंवा बॅकग्राऊंडला दाखवलेला रंग रंगचक्रात (कलर व्हील) शोधण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारची पझल्सदेखील आहेत. प्रत्येक कोडय़ातील वेगळेपण तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवणारे आहे. गुगल प्लसवर साइन इन करून तुम्ही काही निवडक खेळ अनेक प्लेअर्ससोबतदेखील खेळू शकता.
असाच आणखी एक गमतीदार खेळ असणारे अॅप म्हणजे ऊ्र२३्रल्लू३ऊी५, कल्लू. चे ळँी ट१ल्ल ळी२३ DistinctDev, Inc. ¨FZ The Moron Test [https://play.google.com/store/apps/ details?id=com.distinctdev.tmtlite&hl=en ]. मोरॉन या शब्दाचा अर्थ मूर्ख. खरोखरच या अॅपमधील सोपी सोपी कोडी सोडवत असताना दिलेल्या सूचना नीट न वाचल्यामुळे किंवा घाईघाईने उत्तर दिल्यामुळे किंवा आपला पेशन्स संपल्यामुळे किती वेडेपणा करतो व चुका करतो हे बघणारेच हे अॅप आहे. ते खेळून बघा आणि तुम्ही मोरॉन आहात की जीनियस हे तपासून बघा.
मनाली रानडे
manaliranade84@gmail.com