स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वापरकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही एक मूलभूत गरज बनलेली आहे. आपण वैयक्तिक गरजांनुसार इंटरनेट सव्र्हिस प्रोव्हायडर (आयएसपी) कडून हे कनेक्शन घेत असतो. हे प्रत्यक्ष घरापर्यंत वायरच्या जोडणीने आलेले ब्रॉडबँड कनेक्शन असेल किंवा 2ॅ, 3ॅ, 4ॅ द्वारे आलेले वायरलेस मोबाइल कनेक्शन असू शकेल. आजमितीस उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानानुसार अशा कनेक्शनचा वेग ज्यास शास्त्रीय परिभाषेत बँडविड्थ असे नाव आहे, तो २५६ ङुस्र्२पासून 100 टुस्र्२ पेक्षा जास्तही असू शकतो.
आपण जेव्हा स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवर एखादा सिनेमा डाऊनलोड करत असतो, स्काईपवर व्हिडीओ कॉल करत असतो किंवा व्हॉट्स अॅपवर संदेश पाठवत असतो त्यावेळी इंटरनेटचा वेग महत्त्वाचा असतो. तो कमी पडल्यास चित्रे किंवा आवाज तुटक येतात किंवा मेसेजेस यायला खूप वेळ लागतो. असे व्यत्यय येऊ नये म्हणून आपल्याला पुरेशी बँडविड्थ असलेले इंटरनेट कनेक्शन (किंवा डेटा पॅक) विकत घेणे आवश्यक असते. जास्त बँडविड्थसाठी अर्थातच जास्त पैसे लागतात. म्हणजेच 3ॅ डेटा पॅकला 2ॅ पेक्षा जास्त पैसे द्यवे लागतात. तुमच्या इंटरनेट सव्र्हिस प्रोव्हायडरने (आयएसपी) सांगितलेला वेग प्रत्यक्ष मिळतो की नाही हे कसे कळणार? त्यासाठी अनेक अॅप्स असली तरी अमेरिकेतील ओकला (ड‘’ं) या कंपनीने तयार केलेले रस्र्ी३िी२३ हे अॅप जगभरात मोठय़ा प्रमाणात वापरतात. हे अॅप तुमच्या मोबाइलवरून प्रत्यक्ष डेटा दुसऱ्या सव्र्हरना पाठवून त्यासाठी किती वेळ लागला हे पाहते आणि त्यावरून इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा वेग काढते. अॅपमधील स्पीड टेस्ट सुरू केल्यावर डेटा पाठवण्यासाठी सुयोग्य सव्र्हर निवडला जातो आणि तिथे ँ३३स्र् संकेत वापरून योग्य आकाराचा डेटा अपलोड तसेच डाऊनलोड केला जातो. उत्तर म्हणून आपल्या कनेक्शनचा अपलोड आणि डाऊनलोड स्पीड वेगवेगळा दाखवला जातो. या अॅपमधे उपलब्ध सव्र्हर्सपैकी कुठलाही सव्र्हर आपण निवडू शकतो. प्रत्यक्ष स्पीड मोजण्याचे तत्त्व येथे थोडक्यात सांगितले असले तरी यात बऱ्याच गुंतागुंतीच्या प्रक्रिया वापरल्या जातात. जिज्ञासूंनी यासाठी विकिपीडियातील माहिती वाचणे इष्ट ठरेल. इंटरनेट वापरत असताना आपल्याला काही वेळेला कनेक्शन स्लो असल्याचे जाणवते. त्यावेळेला हे अॅप वापरून कनेक्शनचा वेग तपासता येतो. या अॅपमधे विविध वेळी मोजलेले वेग स्टोअर करून ठेवण्याची सोय आहे. यावरून दिवसाच्या काही वेळात हे वेग कमी जास्त होत असल्यास त्यानुसार आपल्या कामाची विभागणी करता येते. किंवा सव्र्हिस प्रोव्हायडरकडे तक्रार करता येऊ शकते. आपल्याला मिळणारी इंटरनेटची सेवा योग्य बँडविड्थने मिळते आहे याची खात्री करून घेण्यासाठी हे योग्य अॅप आहे.
manaliranade84[at]gmail[dot]com
इंटरनेटचा वेग मोजा
अॅपमधे विविध वेळी मोजलेले वेग स्टोअर करून ठेवण्याची सोय आहे.
Written by मनाली रानडे
Updated:
First published on: 05-04-2016 at 04:52 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now you can count internet speed