एव्हाना राज्यभरात तापमानाचा पारा वर गेलेला आहे. उन्हाचे चटके बसायला सुरुवातही झालेली आहे. या उन्हापासून स्वत:चं रक्षण कसं करावं याचे उपाय वगैरे सांगणं आता सुरू होईल. अमका ज्यूस, तमके खाद्यपदार्थ, भरपूर पाणी वगैरे बिट द हीट उपाययोजनांच्या याद्यासुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतील. पुढले तीन महिने हे असह्य़ चटके सहन करण्यासाठी काहीतरी करणं साहजिकच आहे.
पण हे जे काही गरम होणं आहे त्याची झळ ही हाताच्या मुठीतल्या स्मार्टफोनलाही पोहोचत असते. अर्थात स्मार्टफोन्सचं गरम होणं हे काही ऋतुमानानुसार बदलत नसतं. त्यांच्या उष्णतेची कारणं वेगवेगळी असतात. पण स्मार्टफोन, मग तो कुठल्याही कंपनीचा असो, गरम होत असतो. सगळेच स्मार्टफोन्स कमी अधिक प्रमाणात गरम होत असतात. त्यात काही एखाद्या ब्रॅण्डचा किंवा मॉडेल सीरिजचा दोष असतो अशातला भाग नाही. अनेकदा एखादं मॉडेल गरम होतं हे त्यातल्या दोषांमुळे. त्याच सीरिजचं दुसरं मॉडेल रिप्लेस करून आलं की व्यवस्थित काम करत असल्याची अनेक उदाहरणं आजूबाजूला पाहायला मिळतात. त्यामुळे स्मार्टफोन गरम कसा होतो आणि त्याच्या उष्णतेवर उपाय कसे करायचे हे माहीत असणं महत्त्वाचं ठरतं.
स्मार्टफोन गरम कसा होतो?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा