इंटर्नल मेमरी हा कुठल्याही स्मार्टफोनसाठीचा महत्त्वाचा घटक. त्यामुळेच स्मार्टफोन निवडताना फोनची इंटर्नल मेमरी बघितली जाते. मेमरी जितकी जास्त तितकी पसंती अधिक. फोनची ऑपरेटिंग सिस्टम ही याच मेमरीमध्ये स्टोअर केलेली असते. तसेच स्क्रीनसेव्हर्स, थीम्स, अलार्म, िरगटोन्ससुद्धा इंटर्नल मेमरीवरच असतात. फोनमध्ये आधीपासूनच असलेली अॅप्स (ज्यांना डिफॉल्ट अॅप्स म्हटले जाते) हीदेखील याच ठिकाणी स्टोअर केलेली असतात. इतकेच नाही तर जसजसा या अॅप्सचा वापर वाढत जातो तसतसा त्यांच्याशी संलग्न डेटासुद्धा इंटर्नल मेमरीमध्येच स्टोअर व्हायला लागतो. आणि हळूहळू ही मेमरी भरायला लागते. फोन सुरळीत चालण्यासाठी इंटर्नल मेमरीपैकी ठरावीक जागा मोकळी असणे गरजेचे असते. ही जागा रिकामी कशी करायची ते आपण या लेखात बघू या. कॅशे क्लीअर करणे, मोठय़ा फाइल्स डिलीट करणे वगैरे पारंपरिक उपाय आहेतच. पण त्याशिवाय असणारे इतर पर्याय जाणून घेऊ या.
मेमरी फुल्ल?
ईएस फाइल एक्सप्लोरर - फाइल मॅनेजरचे काम चोखपणे बजावणारे हे अॅप आहे.
Written by पुष्कर सामंत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-06-2017 at 05:51 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphones with internal storage capacity