उस गलीसे मुझे अब गुजरना नही..
जगभरातल्या स्मार्टफोन्सधारकांची सध्या ही अशी अवस्था झाली आहे. जळीस्थळीकाष्ठीपाषाणी फक्त आणि फक्त पॉकेमॉन दिसू लागलेत. अँग्री बर्डस, कॅण्डी क्रश, टेम्पल रनसारख्या गेम्सना मागे टाकत पॉकेमॉन गो या गेमने सगळीकडे धुरळा उडवला आहे. केवळ तीन देशांमध्येच अधिकृतरीत्या रिलीज होऊनही जगाला वेड लावणाऱ्या या गेममध्ये नक्की असं आहे तरी काय, हा प्रश्न एरवी तंत्रज्ञानाशी फारसं देणंघेणं नसणारे आजीआजोबाही विचारू लागलेत.
सामान्यत: गेम्स लोकप्रिय होतात ते त्याच्या प्रकारामुळे, तो खेळण्याच्या पद्धतीमुळे, जिंकल्यानंतर मिळणाऱ्या बक्षिसांमुळे, खेळताना मेंदूच्या खर्च होण्याच्या प्रमाणामुळे. पॉकेमॉन गेम लोकप्रिय होतोय ते त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे. असं तंत्रज्ञान ज्यामुळे आभासी विश्व (व्हच्र्युअल रिअॅलिटी) आणि वास्तव जग (रिअॅलिटी) यांच्यातली दरी कमी झाली आहे. खरं तर या दोन्हींचा मेळ घालूनच हा गेम बनवण्यात आला आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. याला अजून तरी मराठी प्रतिशब्द मिळालेला नाही. पण व्हच्र्युअल रिअॅलिटीच्या एक पाऊल पुढे असल्याने याला वाढीव आभासी जग असा शब्द होऊ शकतो. असो. मुद्दा हा आहे की हे तंत्रज्ञान नेमकं काम कसं करतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा