समाजमाध्यमांवर सध्या ट्रोलिंग आणि बनावट बातम्या या दोन्ही गोष्टींवर मोठय़ा प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपासून या चर्चेला तर उधाणच आले आहे. यानंतर काही देशांनी असे ट्रोलिंग करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तरीही हे काही कमी होत नाही. एका पाहणीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये समाजमाध्यमांवरील बनावट बातम्यांच्या संख्येत ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता कंपन्यांनी या वृत्तांना आपल्या संकेतस्थळांवर थाराच द्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी जय्यत तयारीही सुरू केली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या वेळेस समाजमाध्यमांवर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या प्रतिमा मलिन करणाऱ्या होत्या. त्यांच्याविरोधी प्रचार करणाऱ्या होत्या. समाजमाध्यमांचा वापर करून विपणन करणाऱ्यांच्या डोक्यातली ही सुपीक कल्पना तशी ब्रँड्स किंवा एखाद्या व्यक्तीच्या विकासासाठी याचा चांगला वापर होऊ शकतो; पण आता याचा वापर वाईट कारणांसाठी होऊ लागला आहे. आज समाजमाध्यमांवरील माहितीला विश्वासार्हता मिळू लागलेली असतानाच या माध्यमांचा अशा प्रकारचा वापर त्यांची विश्वासार्हता कमी करणारा आहे. याच काळजीतून या कंपन्यांनी आता ट्रोलिंग आणि बनावट बातम्यांच्या विरोधात मोठय़ा प्रमाणावर मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम कंपनीच्या धोरणांमधील असेल किंवा प्रोग्रामिंगचा वापर करून केलेली असेल किंवा समाजात जागरूकता निर्माण करणारी असेल अशा विविध मार्गातून समाजमनात या बनावट वृत्तांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
donald trump and joe biden meet at the white house
ट्रम्प-बायडेन यांच्यात दोन तास चर्चा; सत्तांतराची प्रक्रिया शांततेत होण्याची ग्वाही, ‘व्हाइट हाऊस’चे निवेदन
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

फेसबुकचा जनक मार्क झकेरबर्ग याने काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवरील वाढत्या बनावट वृत्तांबाबत चिंता व्यक्त केली होती. यामुळे समाजात संभ्रम पसरतात याचबरोबर अशा संकेतस्थळांवरील पोस्टबाबत विश्वासार्हता कमी होते, असे मत त्याने मांडले होते. यामुळे अशा प्रवृत्तींच्या विरोधात लढणे ही काळाची गरज असून यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचेही त्याने सांगितले होते. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप हे दोन प्रभावी समाजमाध्यम आज एकाच कंपनीच्या छत्राखाली आहेत. यामुळे झकेरबर्ग यांना याबाबत विशेष चिंता असणे स्वाभाविकच आहे. जगभरातून बनावट वृत्ताला विरोध होऊ लागल्यानंतर कंपनीने कठोर पावले उचलून त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमांबरोबरच ट्विटर व गुगल या दोन्ही संकेतस्थळांनीही याविरोधात मोहीम उघडली आहे.

याविरोधात लढा देण्यासाठी कंपन्यांनी सत्यता पडताळून पाहणाऱ्या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. तसेच जगभरातील विविध विश्वासार्ह माध्यमातून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती गोळा झाल्यानंतर त्याचे रूपांतर विशिष्ट प्रकारच्या अल्गोरिदममध्ये केले जाणार आहे. यानंतर या अल्गोरिदमच्या माध्यमातून बनावट वृत्तांच्या अल्गोरिदमला आव्हान दिले जाणार आहे. सत्य माहिती मिळवून त्यातून तयार करण्यात आलेल्या अल्गोरिदममुळे संकेतस्थळावर येणारी माहिती खरी आहे की खोटी आहे याचा उलगडा होऊ शकणार आहे. यामुळे कंपन्यांना त्यांच्या धोरणातही बदल करावा लागणार आहे. सध्या या कंपन्यांच्या धोरणात तुमच्या मनात येईल ते तुम्ही इथे व्यक्त व्हा, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र आता यामध्ये तपशील तपासून तो काढण्याचा अधिकार कंपनीला असेल, असा उल्लेख करण्यात येणार आहे. आजही ते केले जाते, मात्र केवळ कुणी एखाद्या पोस्टच्या विरोधात तक्रार केल्यावरच या पर्यायाचा वापर होतो. आता मात्र कंपनीला जर पोस्ट चुकीची वाटली तर ते काढू शकणार आहेत. कंपन्यांना अल्गोरिदम तयार करून देण्यासाठी फर्स्ट ड्राफ्ट न्यूज नावाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालणाऱ्या पत्रकारिता संस्थेने मदत करण्याचे ठरविले आहे. ही संस्था सध्या गुगल आणि फेसबुक यांच्यासोबत काम करत असून त्यांनी तयार केलेल्या अल्गोरिदमच्या माध्यमातून सुमारे ८० टक्के बनावट वृत्त रोखता येऊ शकतील, असा त्यांचा दावा आहे. अर्थात हे काम खूप अवघड आणि वेळखाऊ असे आहे. याची प्राथमिक तयारी झाली असली तरी प्रत्येक देश, प्रत्येक राज्य या सर्वाच्या नियमांचा विचार करून हे अल्गोरिदम अंतिम करावे लागणार आहे. याचबरोबर हे करताना जर एखाद्या देशाने सरकारविरोधी कोणताही शब्द लिहिण्यास मनाई केली तर हे इंटनेट स्वातंत्र्याचे उल्लंघन होऊ शकते, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. तसेच या सर्व बंधनांमुळे समाजमाध्यमांचा वापर कमी होईल का, अशी चिंताही व्यक्त होऊ लागली आहे.

ट्विटरचे जागरूकता अभियान

ऑनलाइन सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि वापरकर्ते त्यांच्या भावना कशा व्यक्त करू शकतात आणि सकारात्मक पद्धतीने संवाद कसे साधू शकतात याबाबत जागृती करण्यासाठी ट्विटरने #TweeSurfing  या सार्वजनिक कार्यक्रमाची सेंटर फॉर सोशल रिसर्चबरोबर संयुक्त विद्यमाने सुरुवात केली आहे. या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पात ट्विटर सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या मदतीने विविध कार्यशाळा कोइम्बतुर, नोएडा, चित्कारा आणि लेह येथील विद्यापीठांमध्ये घेणार आहेत. ट्वीटशिप हा १४ दिवसांचा व्हच्र्युअल इंटर्नशिप कार्यक्रम #TweeSurfing अंतर्गत सुरू करणार आहोत. ट्विटर डीएम्सद्वारे हा कार्यक्रम नेण्यात येणार आहे आणि ट्वीटसर्फिग हँडलद्वारा वापरकर्त्यांना सामाजिक बदलासाठी ट्विटर अभियान चालू करण्यासाठी कशा प्रकारे साइनअप करावे आणि मुख्य अभियानात त्यांना काय शिकायला मिळाले याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ट्विटरने अलीकडे आक्षेपार्ह कन्टेन्ट नव्याने निर्माण करणाऱ्या खात्यांना बंधने घातली असून सुरक्षित सर्च रिझल्ट देण्यासाठी आणि हीन दर्जाचे ट्वीट रोखण्यासाठी अपडेटची सुविधा आणली आहे.

वापरकर्त्यांनी काय करावे?

बनावट वृत्त व ट्रोलिंगसाठी कंपन्या ज्या काही उपाययोजना आखत आहेत त्या आपल्यापर्यंत येतील तेव्हा येतील; पण तोपर्यंत वापरकर्तेही काही प्रमाणात काळजी घेऊ शकतात. आत्तापर्यंतच्या बनावट वृत्तांचा अभ्यास करून रॅप्लर या संकेतस्थळाने काही उपाय सुचविले आहेत.

* बनावट वृत्तांचा मथळा हा अतिरंजित असतो तसेच तो इंग्रजीत पूर्णत: कॅपिटल लेटर्सनी लिहिलेला असतो. तसेच त्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. अशा मथळ्यांवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.

* आपण जे संकेतस्थळ सुरू करणार आहोत त्या संकेतस्थळाचा पत्ता नीट तपासून पाहा.

* तुम्ही संकेतस्थळ सुरू केलेच तर साइन इन करण्यापूर्वी संकेतस्थळ कसे दिसते ते पाहा. इतर प्रसिद्ध संकेतस्थळांपेक्षा हे विस्कळीत असते.

* कोणतेही वृत्त दिसले ती त्याची योग्य ती पडताळणी करून मगच ते फॉरवर्ड करा.

* तुम्ही तुमचा ब्लॉग लिहीत असाल किंवा स्वत:चे संकेतस्थळ असेल तर त्यावर मत नोंदविण्याच्या विभागातील नियमावली कठोर करा. मत प्रसिद्ध होण्यापूर्वी ते कोणी तरी तपासून मगच प्रसिद्ध होईल या सुविधेचा वापर करा.

– नीरज पंडित  @nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com