‘व्हर्च्यूअल रिअॅलिटी’ हा शब्द तसा काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांपासून हा शब्द अगदी परवलीचा बनलेला नसला तरी कधीतरी कुठेतरी वाचनात किंवा कानावर पडतो. मुळात दोन विरुद्धार्थी शब्द तंत्रज्ञानामुळे एकत्र नांदू लागलेत. तंत्रज्ञ, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, तंत्रस्वामी, ग्रझेट फ्रीक्स वगैरे मंडळींनी व्हर्च्यूअल रिअॅलिटी म्हणजेच व्हीआर हा शब्द जरा बदलला. आणि आजकाल वापरात असलेला शब्द म्हणजे ‘व्हर्च्यूअल एन्व्हायरन्मेंट’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नावात काय आहे जे तसं खरंच आहे. म्हणजे व्हीआर म्हणा किंवा व्हीई, दोन्हीचं तंत्रज्ञान एकच. कम्प्युटर तंत्रज्ञानाच्या मदतीने आभासी, थ्रीडी जगत निर्माण करायचं  आणि युजरला ते जगत त्याच्या आवडीनुसार, सोयीप्रमाणे बदलता येण्याची सोय ठेवायची ही या तंत्रज्ञानाची मूळ संकल्पना. ही संकल्पना मांडणारे, शास्त्रज्ञ, इंजिनीअर्स अशा सगळ्यांनीच ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी अनेक उपकरणं तयार केली. व्हीआरचा उत्तम अनुभव किंवा त्या आभासी वातावरणाची उत्कृष्ट अनुभूती कशी असते याबाबत अनेक मतं आहेत. पण ढोबळमानाने दोन गोष्टींवर सर्वाचंच एकमत होतं. एक म्हणजे वापरकर्त्यांच्या दृष्टीने दिसणाऱ्या थ्रीडी इमेजेस या वास्तवासारख्या (लाइफ-साइज्ड) असल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे वापरकर्त्यांच्या हालचाली, विशेष करून डोळे आणि डोकं यांच्यानुसार त्या इमेजेस बदलल्या पाहिजेत.

सध्याच्या घडीला व्हीआर हेडसेट चर्चेत आहेत. हेल्मेटसारखं दिसणारं उपकरण डोळ्यावर गॉगलसारखं चढवायचं आणि त्यातून एका वेगळ्याच विश्वात शिरायचं. आता हे एवढं सगळं नेमकं होतं कसं ते बघणं रंजक आहे. मुळात व्हीआर हे तसं फार विस्तीर्ण क्षेत्र आहे. त्यामुळेच आपण या हेडसेटविषयी जाणून घेऊ. हा हेडसेट नेमका काम कसं करतो, त्यातून थ्रीडी इमेजेस कशा दिसतात, आभासी विश्व कसं निर्माण होतं आणि यात मानवी भावभावना आणि तंत्रज्ञान यांचं मीलन होतं कसं.

मुळात या हेडसेटचा उद्देश हा आहे की थ्रीडी, लाइफ साइज्ड इमेजेस डोळ्यासमोर तयार करणे. जे सामान्यत: टीव्ही, कम्प्युटरच्या बाबतीत सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे डोळ्याभोवती घातलेल्या या हेडसेटचं महत्त्वाचं काम हेच. डोक्याच्या हालचाली हेडसेटच्या स्क्रीनकडून ट्रॅक केल्या जातात. आणि त्यानुसार तसं दृश्य दिसतं. स्मार्टफोन्समधल्या सेन्सरविषयी आपण काही दिवसांपूर्वी बोललो होतो. या हेडसेटमध्ये तशाच पद्धतीचे काही सेन्सर्स असतात. पण सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक सेन्सर म्हणजे टिल्ट सेन्सर- हालचाली टिपणारा सेन्सर. डोक्याच्या हालचालींनुसार चित्र बदलण्याचा संदेश हा या सेन्सरच्यामार्फत दिला जातो. याशिवाय मोशन ट्रॅकिंग आणि आय ट्रॅकिंग यासाठीही दोन सेन्सर्स असतात. यातला आय ट्रॅकिंग सेन्सर महत्त्वाचा आहे. हेडसेटमध्ये इन्फ्रारेड सेन्सर बसवलेला असतो. डोळ्यांच्या म्हणजे बुब्बुळांच्या होणाऱ्या हालचाली हा सेन्सर टिपतो. आणि त्यानुसार समोरचं चित्र बदलत जातं.

व्हीआर हेडसेट हे एचडीएमआय केबल किंवा ब्लु-टूथच्या माध्यमातून स्मार्टफोन, कन्सोल (व्हिडीओ गेमच्या संदर्भात) किंवा कम्प्युटरशी जोडलेला असतो. व्हीआर हेडसेट एकतर दोन फीड्सना एकत्र करून डिस्प्ले दाखवतात किंवा दोन एलसीडी डिस्प्ले वापरतात (प्रत्येक डोळ्यासाठी एक). यामध्ये लेन्सेसचाही वापर होतो, जी दोन डोळ्यांवर असतात. म्हणूनच या उपकरणाला अनेकदा गॉगल असंही म्हणतात. या लेन्सेस इमेजचा फोकस अॅडजस्ट करून त्यांना पुनर्रचित (रिशेप) करतात आणि त्यातून थ्रीडी इमेज बनवतात.

सध्या उपलब्ध असणारे गुगल कार्डबोर्ड, सॅमसंग गिअर व्हीआर, ऑक्युलस रिफ्ट, एचटीसी व्हाइव्ह, प्लेस्टेशन व्हीआर हे सगळे हेडसेट कमी-अधिक फरकाने एकसारखेच आहेत. व्हीआर किंवा व्हीई याच संकल्पनेला धरून समांतर चालणारी दुसरी संकल्पना म्हणजे ऑग्युमेंटेड रिअॅलिटी. बरीच हवा केलेल्या पॉकेमॉन गो या गेमची मूळ संकल्पना ती हीच. तंत्रज्ञानाला हाताशी धरून एक आभासी विश्व निर्माण करायचं आणि त्यामध्ये युजरला गुंतवून ठेवायचं आणि एक वेगळी अनुभूती द्यायची हाच यामागचा उद्देश. बऱ्याच अंशी तो यशस्वीही होताना दिसतोय.

पुष्कर सामंत

pushkar.samant@gmail.com