कम्प्युटरच्या सुरक्षिततेसाठी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. अँटीव्हायरसपासून ते अँटीस्पायवेअर, मालवेअपर्यंत ही यादी मोठी होत जाते. यात अनेक बडय़ा कंपन्याही कार्यरत आहेत. पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रकार असतो आणि तो म्हणजे फायरवॉल. ही वॉल व्हायरस किंवा तत्सम प्रकारांचा शिरकाव रोखते. सामान्यत: विंडोजच्या प्रत्येक आवृत्तीसोबत विंडोज फायरवॉल आपोआप येते.

अँटीव्हायरस प्रोग्रॅमपेक्षा विंडोज फायरवॉल वेगळं असतं. विंडोज फायरवॉल हे एक सॉफ्टवेअर आहे जे सिक्युरिटी गार्डप्रमाणे काम करतं. नेटवर्क किंवा इंटरनेटवरून येणारी माहिती ते तपासतं आणि तुमच्या फायरवॉलच्या सेटिंग्जप्रमाणे ती माहिती पाठवायची की नाही हे ठरवतं.
वर म्हटल्याप्रमाणे फायरवॉल हे हॅकर्स किंवा इतर मालवेअर्सने तुमच्या कम्प्युटरचा नेटवर्क किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ताबा मिळविण्यापासून रोखतं. तसंच तुमच्या कम्प्युटरमधून इतर कम्प्युटर्सना मालवेअर्स पाठवण्यापासून परावृत्त करतं.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

फायरवॉल काम कसं करतं?
विंडोजच्या कम्प्युटर्समध्ये बाय डिफॉल्ट विंडोज फायरवॉल सुरू असतं, आणि ते बॅक्ग्राउंडला शांतपणे काम करत असतं. विंडोंज फायरवॉलमध्ये पूर्वनिर्धारित नियमांचे संच असतात (ज्याला प्रोटोकॉल्सचा डेटाबेस म्हणतात) जे तुम्हाला इंटरनेट ब्राउजिंग, मेसेंजरचा वापर, फाइल शेअरिंगसारखी अनेक कामं करण्याची परवानगी देतात. जोपर्यंत आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे फायरवॉल कॉनफिगर करण्याची गरज पडत नाही तोपर्यंत हा काय प्रकार आहे हे आपल्याला माहीतही नसतं. पण जेव्हा एखादा प्रोग्रॅम इन्स्टॉल करतो तेव्हा काही प्रोग्रॅम्सना त्यांच्या सर्वरशी संवाद साधण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. मग अशा वेळी इंटरनेटवरून येणाऱ्या या कनेक्शनला प्रतिबंध करण्याचं काम फायरवॉल करतं, तसंच तुम्हाला या कनेक्शनला परवानगी द्यायची आहे की नाही याची सूचना देते. अलाऊ अ‍ॅक्सेस किंवा कॅन्सल हे दोन ऑप्शन्स दिलेले असतात. विंडोज फायरवॉलमध्ये हे प्रोटेक्शन आणि नोटिफिकेशन्स होम, वर्क आणि पब्लिक अशा प्रत्येक नेटवर्क प्रोफाइलसाठी कॉनफिगर करू शकता.

फायरवॉल ऑन आणि ऑफ कशी करायची?
जर तुम्ही अ‍ॅडमिनिस्ट्रेटर युझर असाल तर तुम्ही फायरवॉल चालू किंवा बंद करू शकता. विंडोज फायरवॉल सुरू करण्यासाठी कंट्रोल पॅनल-सिस्टम अँड सिक्युरिटी-विंडोज फायरवॉलमध्ये जायचं. किंवा सर्च बारमध्ये फायरवॉल टाइप केलं तरीही चालतं. फायरवॉलच्या विंडोच्या डाव्या बाजूला असलेल्या टर्न विंडोज फायरवॉल ऑन ऑर ऑफ या पर्यायावर क्लिक् करायचं.
आता सेटिंग्ज कस्टमाइज करण्यासाठी नवीन विंडो ओपन होईल. आता इथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यातला तुम्हाला योग्य वाटणारा पर्याय निवडून ओके करायचं की काम झालं.

‘टर्न ऑन’ विंडोज फायरवॉल
विंडोज फायरवॉल हे आधीच ऑन असते आणि ते बऱ्याच प्रोग्रॅम्सना सर्वरशी कम्युनिकेट करण्यासाठी बंदी आणतं. जर तुम्हाला एखाद्या प्रोग्रॅमला कम्युनिकेशनची परवानगी द्यायची असेल तर तो प्रोग्राम अलाउड प्रोग्राम्सच्या यादीत टाकायचा.

‘ब्लॉक ऑल इनकमिंग कनेक्शन्स’
जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त सुरक्षेची गरज असेल तेव्हा हा पर्याय निवडावा. कॅम्प्युटरला इतरांकडून येणाऱ्या सर्व अनपेक्षित कम्युनिकेशन्सना यामुळे प्रतिबंध होतो. हे म्हणजे झेड सिक्युरिटीसारखं आहे. फुल्ल प्रोटेक्शन.

‘नोटिफाय मी व्हेन विंडोज ब्लॉक न्यू प्रोग्राम’
अनेकदा फायरवॉल अपडेट होत असतं. जेव्हा विंडोज अपडेट होतं तेव्हा हा डेटाबेससुद्धा अपडेट होतो. त्यामुळे यादीत नवीन प्रोग्राम्सची भर पडत असते. जर हा पर्याय निवडला तर विंडोज फायरवॉल हा जेव्हा एखादा नवीन प्रोग्रॅम ब्लॉक करतं तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येतं. या नोटिफिकेशनसोबतच तो प्रोग्राम अनब्लॉक करण्याचा पर्यायही दिला जातो.

‘टर्न ऑफ फायरवॉल’
हा पर्याय निवडला तर विंडोज फायरवॉल बंद होते. कम्प्युटर असुरक्षित असण्याच्या दृष्टीने उचलेलं पहिलं पाऊल म्हणजे फायरवॉल बंद ठेवणं. त्यामुळेच दुसऱ्या एखाद्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची फायरवॉल सुरू नसेल तर हा पर्याय निवडणं टाळणंच उत्तम.
– पुष्कर सामंत