आज आपण मोबाइल फोन कशाकशासाठी वापरतो? फोटो आणि विशेष म्हणजे सेल्फी काढण्यासाठी, प्रवासात गाणी ऐकण्यासाठी किंवा सिनेमा पाहण्यासाठी आपल्या आवडलेले चुटके, व्हिडीओ क्लिप्स आपल्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांशी शेअर करण्यासाठी? खरे तर हा फोन संपर्काचे साधन म्हणून बनवला गेला असला तरी आपण त्याचा उपयोग मनोरंजनाच्या विविध गोष्टींसाठी करीत असतो. पण जर समजा तुमच्याकडे वाय फाय इंटरनेट नसेल किंवा
सिम कार्डावर पैसे किंवा डेटा बॅलन्स नसेल तर काय होईल? आज याचेच उत्तर आपण पाहणार आहोत.
कुठल्याही मोबाइल सव्र्हिस प्रोव्हाडरला किंवा वाय फायला पैसे न भरता तुम्ही आपल्या मित्रमंडळींचा गट बनवून मनसोक्त विनामूल्य चॅट किंवा गप्पा मारू शकता. यासाठी वायफाय टॉकी फ्री (ह्र-ा्र ळं’‘्रीो१ी) हे अॅप्लिकेशन तुमच्या मदतीला येईल. हे अॅप्लिकेशन सुरू करून तुम्हाला तुमचा फोन वाय-फायचा हॉट स्पॉट बनवता येतो. या हॉट स्पॉटच्या रेंजमध्ये असलेल्या तुमच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधता येईल.
या वाय-फायची रेंज ही फोन किंवा टॅबलेटमधील हार्डवेअरच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असते. इमारतींमध्ये ही साधारणपणे ७० ते १५० फूट असते तर मोकळ्या मैदानात ४५० फुटांपर्यंत जाऊ शकते. थोडक्यात म्हणजे एका इमारतीत राहणारी मित्रमंडळी किंवा मॅच बघायला मैदानात गेलेला मित्रांचा गट हे अॅप वापरून संपर्कात राहू शकतो.
या प्रक्रियेत प्रथम ग्रुपमधील सर्व हे अॅप आपापल्या स्मार्ट फोनवर इन्स्टॉल करतात. अॅपमधील नेटवर्क मॅनेजर सुविधा वापरून त्यापैकी एकाचा फोन हॉट स्पॉट बनवला जातो. या हॉटस्पॉटचा पासवर्ड गटातील सर्वाना सांगून त्यांचे फोन या हॉट स्पॉटशी जोडले जातात. एकदा असा ग्रुप जोडला गेला की तो एकमेकांशी वैयक्तिक किंवा सर्व ग्रुपशी एकत्र चॅट करू शकतो. याद्वारे फाइल्स, फोटोही शेअर करता येतात. तसेच व्हॉइस कॉलही करता येतात.या अॅपचे वैशिष्टय़ म्हणजे वाय फाय सिग्नल कमी असला तरी आवाजाची गुणवत्ता चांगली असते. शिवाय तुम्हाला स्पीकर फोन, तसेच ब्लू टुथ हेडसेटही या अॅपसोबत वापता येतो.
या लेखात जरी ‘वाय फाय टॉकी फ्री’ या अॅपची माहिती दिलेली असली तरी यासारखे अनेक अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. त्यातील काही वाय-फाय तंत्रज्ञान वापरतात तर काही ब्लूटुथद्वारे एकमेकांशी संपर्क साधतात. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार त्याची निवड करावी. एकही पैसा खर्च न करता आपले फोन वॉकी-टॉकीसारखे वापरण्याचा खेळ करून पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
वायफाय टॉकी फ्री
या वाय-फायची रेंज ही फोन किंवा टॅबलेटमधील हार्डवेअरच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असते.
Written by मनाली रानडे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-05-2016 at 02:50 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wifi talk free