पनवेल महापालिकेत भाजपला दणदणीत विजय मिळवला आहे. पनवेलमध्ये यंदा पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक झाली. त्यामुळे पनवेल महापालिका कोण काबीज करणार, याबद्दल मोठी उत्सुकता होती. भाजपने ७८ जागांपैकी ५१ जागांवर विजय मिळवत पनवेल महापालिकेवर झेंडा फडकवला आहे.

पनवेल महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारली असताना शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीची मात्र घसरगुंडी उडाली आहे. महाआघाडीला अवघ्या २७ जागांवरच यश मिळवता आले आहे. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीला मात्र पनवेलमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी पनवेल महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमध्ये तीन सभा घेतल्या. त्याचाही मोठा फायदा भाजपला झाला.

Vanchit Bahujan Aghadis Ramtek Lok Sabha Constituency candidate Shankar Chahande joins Congress
अरे हे काय? वंचित आघाडीचे उमेदवार काँग्रेसमध्ये गेले…
BJP test, Congress, West Nagpur,
काँग्रेसच्या गडात भाजपची कसोटी, पश्चिम नागपूरमध्ये कडव्या झुंजीचे संकेत
Who is Sushil Rinku
केजरीवालांचा लोकसभेतला एकमेव खासदारही भाजपामध्ये; कोण आहेत सुशील रिंकू?
Chandrapur Lok Sabha
चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उघड तर भाजपमध्ये छुपी गटबाजी

पनवेलमध्ये एकूण ५३ टक्के मतदान झाले होते. पनवेलमध्ये भाजप विरुद्ध इतर पक्ष अशी लढत होती. भाजपला शहरी भागातून चांगले मतदान होईल, तर शेकाप महाआघाडीला ग्रामीण भागात चांगले यश मिळेल असा अंदाज होता. मात्र भाजपला शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजपने पनवेल महापालिकेवर कब्जा केला.

भिवंडी महापालिकेत काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला. भिवंडीत काँग्रेसने ९० पैकी ४७ जागांवर विजय मिळवत कसाबसा बहुमताचा आकडा गाठला. शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी अनेक प्रभागांमध्ये काँग्रेसला टक्कर दिली. भिवंडीत भाजपला १९ तर शिवसेनेला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. समाजवादी पक्षाने २ तर इतर पक्ष आणि अपक्षांना १० जागांवर यश मिळाले आहे.

भिवंडीतच चार प्रभागांच्या पॅनल पद्धतीने पहिल्यांदाच निवडणूक झाली. भिवंडीत एकूण ९० प्रभागांमध्ये ४५८ उमेदवार उभे होते. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. शिवसेना आणि भाजपला काँग्रेस इतक्याच जागांवर यश मिळताना दिसत होते. मात्र काही वेळानंतर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप मागे पडले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी निकालानंतर मिरवणुका काढण्यावर बंदी घातली आहे.

भिवंडी महापालिकेसाठी काँग्रेसचे ६५, भाजप + रिपाईचे ५७, शिवसेनेचे ५५, समाजवादी पक्षाचे ३६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३३, कोणार्क विकास आघाडीचे १६, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटचे १६ उमेदवार रिंगणात होते. यासोबतच १८० अपक्ष उमेदवारदेखील आपले नशीब आजमवत होते. भिवंडी महापालिकेत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. तर इतर सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत होते.

वाचा- Malegaon Results LIVE : मालेगावात मतमोजणीला सुरुवात; काँग्रेस आणि एमआयएम आघाडीवर

 

  • पनवेल, भिवंडीत मतमोजणीला सुरुवात
  • भिवंडीत ९० जागांसाठी मतदानाला सुरुवात
  • पनवेलमध्ये एका प्रभागात भाजपला आघाडी
  • भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला
  • पनवेल- शेकाप महाआघाडी २ जागी आघाडीवर
  • पनवेलमध्ये शेकाप आणि भाजप प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर
  • भिवंडी महापालिकेत भाजपला ५ जागांवर आघाडी
  • भिवंडीत भाजप ७, काँग्रेस ८, राष्ट्रवादी ४, शिवसेना एका जागेवर आघाडीवर
  • पनवेलमध्ये भाजप १९, शेकाप महाआघाडी ८ जागी आघाडीवर
  • पनवेलमध्ये भाजपची जोरदार मुसंडी
  • पनवेलमध्ये भाजपचे १७ क्रमांकाचे पॅनेल विजयी
  • पनवेलमध्ये भाजपच्या १४ क्रमांकाच्या पॅनेलमधील २ उमेदवार विजयी
  • पनवेलमध्ये भाजप २०, तर शेकाप ११ जागांवर आघाडीवर
  • पनवेलमध्ये भाजप १५ जागांवर विजयी
  • पनवेलमधील २५ टक्के जागांवर भाजपची आघाडी
  • पनवेल- प्रभाग क्र. १४ मध्ये भाजपच्या हेमलता म्हात्रे आघाडीवर
  • पनवेल- प्रभाग क्र. ११ मध्ये भाजपचे ३ उमेदवार  विजयी
  • पनवेल प्रभाग क्रमांक १४ ड मध्ये भाजपचे अब्दुल मुकीद काझी ६ हजार २३७ मतांनी विजयी
  • पनवेल प्रभाग क्रमांक १४ क मध्ये भाजपचे मनोहर म्हात्रे ६ हजार ८८५ मतांनी विजय्या
  • पनवेल प्रभाग क्रमांक १४ ब मध्ये शेकापच्या सारिका अतुल भगत  ७ हजार ५९ मतांनी विजयी
  • पनवेलमध्ये भाजप २३, तर शेकाप ११ जागांवर आघाडीवर
  • भिवंडीत भाजप १०, काँग्रेस ११ जागी आघाडीवर
  • भिवंडीत शिवसेना ७, राष्ट्रवादी ५ जागांवर आघाडीवर
  • पनवेलमध्ये भाजप २८ जागांवर आघाडीवर
  • पनवेलच्या कळंबोली प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपचे ४ उमेदवार विजयी
  • भिवंडीत भाजप, शिवसेना प्रत्येकी ८ जागांवर आघाडीवर
  • भिवंडीत काँग्रेस ९, राष्ट्रवादी ३ जागी आघाडीवर
  • भिवंडीत प्रभाग क्रमांक २ मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी
  • पनवेलमध्ये दिग्गजांना दणका; राष्ट्रवादीचे सुनील घरत यांच्या कन्या शिवानी घरत, शेकापचे संदीप पाटील, कॉंग्रेसचे लतीफ शेख  पराभूत
  • पनवेलमध्ये भाजप ३० तर शेकाप १५ जागांवर आघाडीवर
  • भिवंडीत काँग्रेस १४, शिवसेना १०, भाजप ८ जागांवर आघाडीवर
  • पनवेलच्या प्रभाग ८ मधून शेकाप पॅनल विजयी
  • पनवेलमध्ये भाजपचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा मुलगा विक्रांत पाटील प्रभाग क्र.१८ मधून विजयी
  • प्रभाग क्रमांक २ मधून शेकापचे चारही उमेंदवार विजयी
  • पनवेलच्या महापौर पदासाठी विद्या गायकवाड यांचे नाव आघाडीवर
  • भिवंडीत भाजप १९, शिवसेना १४, काँग्रेस ४३ जागांवर आघाडीवर