कल्याण – येथील मुरबाड रस्त्यावरील स्टेट बँकेत एका भामट्याने एका मुलीला बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील दीड लाख लाख रुपये घेऊन बँकेतून पळ काढला. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन महात्मा फुले पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता बँकेत, बँकेच्या आवारात एटीएम केंद्राजवळ भुरटे चोर उजळ माथ्याने फिरत असल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून एटीएम कार्डमध्ये अदलाबदल करुन त्याच्या बँक खात्यावरील रक्कम काढून घेण्याचे प्रकार कल्याण, डोंबिवलीत वाढले आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीतील गुंडगिरी मोडण्यासाठी २४ जणांना मोक्का

पोलिसांनी सांगितले, ईशा एकनाथ फाटक (रा. रामदासवाडी, सिंडीगेट, कल्याण) या सोमवारी आपली मुलगी दुर्वा हिला घेऊन मुरबाड रस्त्यावरील स्टेट बँकेत दुपारच्या वेळेत गेल्या होत्या. बँकेत गेल्यानंतर तेथील एका व्यक्तीने ईशा यांना पैसे भरण्याच्या दोन पावत्या दिल्या. तो बँक कर्मचारी किंवा ग्राहक असावा असे ईशा यांना वाटले. ईशा यांना एक लाख ५० हजार रुपयांची रक्कम बँकेत भरणा करायची होती. पैसे भरण्याची एक पावती भरुन ईशा यांनी ती पावती आणि दीड लाख रुपये मुलगी दुर्वा हिच्या हातात दिले. तिला मंचकावर पैसे भरण्यास सांगितले. पैसे भरण्याच्या रांगेत दुर्वा उभी असताना भुरटा चोर तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. तिला तू पावतीवर पॅन कार्ड क्रमांक लिहिलेला नाही. तो आईकडे जाऊन लिहून घे. तोपर्यंत मी तुझे मंचकावर ठेवलेले पैसे सांभाळतो, असे म्हणाला. दुर्वा आईच्या दिशेने गेल्यानंतर भुरट्या चोराने दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन दुर्वाची नजर चुकवून बँकेतून पळ काढला.

हेही वाचा – ठाणे महापालिकेच्या मदत कक्षाचा दूरध्वनी अखेर सुरू

पावतीवर पॅन क्रमांक लिहून दुर्वा परत मंचकासमोर आली तर तिला तो व्यक्ती दिसला नाही. बँकेत, परिसरात पाहिल्यानंतर तो आढळून आला नाही. भुरट्या चोराने दीड लाख रुपये चोरून नेल्याने ईशा यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. बँकेत सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे असताना भुरटे चोर आता बँकेत घुसखोरी करू लागल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 5 lakh fraud with a woman in state bank of kalyan ssb
Show comments