बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी होम प्लॅटफॉर्मवर गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. पैशांच्या वादातून एकाने मित्रावरच गोळीबार केल्याचे समोर आले. चौघे जण या ठिकाणी होते. त्यातील एकाने गोळी झाडत पळ काढला. मात्र फलाटावर उपस्थित सुरक्षा बलाच्या जवानांनी आरोपीला पकडले. यात एक जण जखमी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> अडीच तास विद्यार्थी बसमध्येच! विद्यार्थ्यांचा अर्धावेळ होतोय कोडींत खर्चीक

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बदलापूर स्थानकातील हॉल प्लॅटफॉर्मवर चौघे मित्र आले. त्यांच्यात पैशाच्या गोष्टीवरून वाद सुरू होते. त्यातील विकास पगारे याने शंकर संसारे नावाच्या मित्रावरच गोळी झाडली. त्यावेळी फलाटावर असलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांना नेमके काय सुरू आहे हे कळत नव्हते. गोळी झाडल्यानंतर आरोपीने रुळांवर उडी घेत पळ काढला. त्यावेळी फलाट क्रमांक एकवर असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून बंदुकही जप्त करण्यात आली. नंतर पोलिसांनी फलाटावर घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेतील इतर तीघे घटनास्थळावरून पळाले आहेत.