Thane Dahi Handi 2023 दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरात गुरुवारी उंच-उंच थर रचण्याची गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागली होती. नौपाडा येथील मनसेच्या दहीहंडीत मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाचा दहा थर लावण्याचा प्रयत्न असफल ठरला. या पथकाने मनसेच्या तसेच वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीत नऊ थर रचून सलामी दिली. त्याचबरोबर कोकणनगर गोविंदा पथकानेही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीत नऊ थरांची सलामी दिली.
पावसातही गोविंदांचा उत्साह शिगेला होता. ठाण्यात थर रचताना विविध गोविंदा पथकांतील १७ जण जखमी झाले असून यातील एका महिलेच्या मणक्याला दुखापत झाल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शहरातील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध नेते, सिने कलाकारांनी उपस्थिती लावली.
हेही वाचा >>> “…जी कारवाई करायची आहे, ती माझ्यावर करा”, दहीहंडीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी केलेलं विधान चर्चेत
ठाणे शहरातील टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून, जांभळीनाका येथे ठाकरे गटाकडून, वर्तकनगर येथे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान, रहेजा गार्डन येथे आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान, डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह येथील चौकात भाजपचे नेते शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठान, बाळकुम येथे माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या साई जलाराम प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथक आणि कोकणनगर गोविंदा पथकाने नऊ थर रचले. तर, नौपाडा येथे जय जवान पथकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नऊ थर लावले. या ठिकाणी त्यांनी दहा थर लावण्याचा प्रयत्न केला. पण, तो असफल ठरला. त्यानंतर मनसेची हंडी जय जवान पथकाने फोडली. कल्याण- डोंबिवली येथेही विविध राजकीय पक्षांकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा >>> Dahi Handi 2023: “आगामी लोकसभेची हंडी पंतप्रधान मोदीच फोडतील”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान
शिंदे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन करण्यात आले होते. याच दहीहंडीपासून काही मीटर अंतरावर ठाकरे गटाने दहीहंडीचे आयोजन केले होते. उल्हासनगर, अबंरनाथ आणि बदलापूरमध्ये अनेक भागांत दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणीही उत्साह शिगेला होता. या दहीहंडीत विविध पथकांतील १७ गोविंदा जखमी झाले. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नऊ तर, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात चार गोविंदांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात चिराग नगर भागातील अनिकेत मेंढकर, मुलुंडमधील नरेंद्र वाल्मिक, अक्षय कडू आदींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रहेजा गार्डन येथील संकल्प प्रतिष्ठान दहीहंडीत शिवशाही गोविंदा पथकाने नऊ थर रचले. या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी जांभळी नाका येथे हंडी आयोजित केली होती. या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.
महत्त्वाचे रस्ते बंद..
या हंडी फोडण्यासाठी मुंबईसह आसपासच्या शहरातून विविध गोविंदा पथके ठाण्यात आली होती. दहीहंडी आयोजनामुळे शहरातील काही महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागला.