कल्याणमध्ये १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी १ लाख ३१ हजार ५७३ सुर्यनमस्कार घालण्याचा पराक्रम केला आहे. महापालिका आणि शहरातील विविध संस्थांनी एकत्र येऊन राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले होते. शहरामधील सुभेदारवाडा कट्टा, महिला बालकल्याण समिती, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना व क्रीडाभारती यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले.

कल्याण पश्चिम येथील अत्रे रंगमंदिराजवळील सुभाष मैदानामध्ये सकाळच्या सुमारास १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी १ लाख ३१ हजार ५७३ सुर्यनमस्कार घातले.

यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी व सर्व सदस्या उपस्थित होत्या.

Story img Loader