लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : पाचपाखाडी येथील सरोवर दर्शन टॉवरमधील वाहन तळात उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. या आगीत ११ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर, तीन कारचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
आणखी वाचा-धक्कादायक! टिटवाळा रेल्वे स्टेशनजवळ प्रवासी महिलेवर बलात्कार, रेल्वे पोलिसांनी आरोपीला केली अटक
सरोवर दर्शन टॉवरमध्ये एक मजली वाहन तळ आहे. या वाहन तळाच्या पहिल्या मजल्यावर १३ दुचाकी आणि तीन मोटारी उभ्या होत्या. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास वाहनांना अचानक आग लागली. या आगीत एका पाठोपाठ एक ११ दुचाकी जळून खाक झाल्या. घटनेची माहिती येथील रहिवाशांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला दिल्यानंतर पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण अस्पष्ट असल्याचे पथकाने सांगितले.